Ved: रितेश-जिनिलिया जोडीची बॉक्स ऑफिसवर कमाल; ‘वेड’ची दोन आठवड्यांत जोरदार कमाई

Ved Box Office: दुसऱ्या आठवड्यातही 'वेड'च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये घसघशीत वाढ; आतापर्यंत कमावले इतके कोटी रुपये

Ved: रितेश-जिनिलिया जोडीची बॉक्स ऑफिसवर कमाल; 'वेड'ची दोन आठवड्यांत जोरदार कमाई
Ved MovieImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 15, 2023 | 7:53 AM

मुंबई: अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया डिसूझा देशमुख यांच्या जोडीने बॉक्स ऑफिसवर कमाल केली आहे. ‘वेड’ या चित्रपटाने पंधराव्या दिवशी 1.35 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तिसऱ्या आठवड्यातही या चित्रपटाची कमाई अशाच प्रकारे सुरू राहणार असल्याचा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषक वर्तवत आहेत. दिग्दर्शक म्हणून रितेशचा ‘वेड’ हा पहिलाच चित्रपट आहे आणि जिनिलियाने बऱ्याच वर्षांनंतर चित्रपटात कमबॅक केलं आहे. त्यामुळे या जोडीविषयी प्रेक्षकांना खूप उत्सुकता होती.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने दिलेल्या माहितीनुसार, ‘वेड’ने आतापर्यंत 42.20 कोटी रुपये कमावले आहेत. त्यामुळे तिसऱ्या आठवड्यात हा चित्रपट 50 कोटींचा आकडा गाठण्याची शक्यता आहे. ‘वेड’ची कमाई ही 65 कोटींचा टप्पा पार करणार असल्याचंही म्हटलं जात आहे. असं झाल्यास, मराठी चित्रपटाच्या दृष्टीने ही अत्यंत सकारात्मक बाब आहे.

हे सुद्धा वाचा

रितेश-जिनिलियाच्या या चित्रपटाचं बजेट 15 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे. हा चित्रपट 30 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसापासून हा चित्रपट हाऊसफुल होता. समिक्षकांकडूनही त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

या चित्रपटात रितेश आणि जिनिलियाशिवाय जिया शंकर, शुभंकर तावडे, अशोक सराफ, विद्याधर जोशी, विक्रम गायकवाड, खुशी हजारे आणि विनीत शर्मा यांच्याही भूमिका आहेत. चित्रपटातील जिनिलियाचा सहज अभिनय आणि प्रसन्न वावर प्रेक्षकांना खूपच भावला. प्रेमात माणूस वेडा होतो की जगावेगळी माणसं असं वेडं प्रेम करतात, अशा दोन्ही पद्धतीचं प्रेम ‘वेड’ चित्रपटात पहायला मिळतं.

‘वेड’ने दुसऱ्या आठवड्यात नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ या चित्रपटाचा विक्रम मोडला होता. प्रदर्शनाच्या दुसऱ्या रविवारी रितेश-जिनिलियाच्या ‘वेड’ने 5.70 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. कमाईच्या या आकड्यासह चित्रपटाने सुपरहिट ‘सैराट’चा विक्रम मोडला होता.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.