AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एका युगाचा अंत! दिग्गज अभिनेते सुदेश कुमार यांचं निधन; चित्रपटसृष्टीवर शोककळा

दिग्गज अभिनेते आणि निर्माते सुदेश कुमार यांच्या निधनाने बॉलिवूड इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केलं होतं. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

एका युगाचा अंत! दिग्गज अभिनेते सुदेश कुमार यांचं निधन; चित्रपटसृष्टीवर शोककळा
Sudesh KumarImage Credit source: Instagram
| Updated on: May 03, 2026 | 11:49 AM
Share

हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळात अनेक हिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपट देणारे ज्येष्ठ अभिनेते सुदेश कुमार यांचं निधन झालं आहे. 1 मे रोजी वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुदेश कुमार यांना श्वासाशी संबंधित समस्यांमुळे सोमवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु काही उपचारानंतर त्यांना पुन्हा घरी नेण्यात आलं आणि शुक्रवारी त्यांनी घरीच अखेरचा श्वास घेतला. सुदेश कुमार यांची पत्नी जया धवन यांनी याबद्दलची माहिती दिली. “त्यांच्या इच्छेनुसार आम्ही गुरुवारी त्यांनी घरी परत आणलं होतं. त्यांच्यासाठी आम्ही एक मेडिकल युनिटसुद्धा तयार केलं होतं, परंतु शुक्रवारी सकाळीच त्यांची प्राणज्योती मालवली”, असं त्या ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना म्हणाल्या.

भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी 1931 मध्ये पेशावरमध्ये सुदेश कुमार यांचा जन्म झाला होता. ते लहान असतानाच त्यांचं कुटुंब मुंबईला आलं होतं. त्यानंतर मुंबईतच ते लहानाचे मोठे झाले. एल्फिंस्टन कॉलेजमध्ये त्यांनी विज्ञान शाखेतून पदवी घेतली. त्यांनी डॉक्टर बनावं, असं त्यांच्या वडिलांचं स्वप्न होतं. परंतु सुदेश यांना फिल्म इंडस्ट्रीत रस होता. सुदेश कुमार यांचं कपूर घराण्याशी संबंध होते. कपूर कुटुंबीयांचे ते दूरचे नातेवाईक होते. त्यामुळे इंडस्ट्रीत त्यांची थोडीफार ओळख होती. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी पृथ्वीराज कपूर यांच्या थिएटर ग्रुपमध्ये प्रवेश घेतला. त्यांच्या सुरुवातीच्या चित्रपटांमध्ये पृथ्वीराज कपूर यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘पैसा’ या चित्रपटाचा समावेश होता.

सुदेश कुमार यांनी अनेक चित्रपटांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या होत्या. परंतु त्यांना 1959 मध्ये ‘छोटी बहन’ या चित्रपटातून प्रचंड लोकप्रियता मिळाली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. त्यानंतर त्यांनी ‘भरोसा’ (1963), ‘गृहस्थी’ (1963), ‘खानदान’ (1965) आणि ‘गोपी’ (1970) यांसारख्या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या होत्या.

हिरो म्हणून त्यांना ज्या चित्रपटाने स्टार बनवलं, तो 1961 मध्ये प्रदर्शित झालेला रोमँटिक अॅक्शन ड्रामा ‘सारंगा’ होता. या चित्रपटामुळे ते रातोरात स्टार बनले होते. त्यानंतरही ते बऱ्याच चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिकेत झळकले होते. सुदेश कुमार यांनी निर्मिती क्षेत्रातही हात आजमावला होता. सत्तरच्या दशकात त्यांनी ‘मन मंदिर’, ‘उलझन’, ‘बदलते रिश्ते’ यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली होती.

Follow Us
6 खासदारांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंचा मोठा निर्णय; आराखडा तयार आता फक्त.
Uddhav Thackeray | विश्वासू खासदारांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंचा मोठा निर्णय; आराखडा तयार आता फक्त...
रेवती सुळेंच्या लग्नाला शरद पवार व्हीलचेअरवरून हजर, सुनेत्रा पवारांचीह
रेवती सुळेंच्या लग्नाला शरद पवार व्हीलचेअरवरून हजर, सुनेत्रा पवारांचीही उपस्थिती
कल्याणमध्ये जमीन घोटाळ्याने खळबळ; माजी नगरसेवकांसह 7 जणांवर गुन्हा
kalyan | कल्याणमध्ये जमीन घोटाळ्याने खळबळ; माजी नगरसेवकांसह 7 जणांवर गुन्हा
भर मंचावर झाला मोठा घोळ! कोल्हापूरच्या कार्यक्रमात शिंदेंचं नाव...
भर मंचावर झाला मोठा घोळ! कोल्हापूरच्या कार्यक्रमात शिंदेंचं नाव... मुख्यमंत्र्यांनी सूत्रसंचालकाला मध्येच अडवलं अन्...
6 बंडखोर खासदारांविरोधात ठाकरेंचा मास्टरप्लॅन! थेट मतदारसंघात उतरणार
Uddhav Thackeray | 6 बंडखोर खासदारांविरोधात उद्धव ठाकरेंचा मास्टरप्लॅन! थेट मतदारसंघात उतरणार
ओमराजे निर्णय घेण्याआधीच शिंदेंचे खासदार... शिंदेच्या कार्यकर्त्यांचा
ओमराजे निर्णय घेण्याआधीच शिंदेंचे खासदार... शिंदेच्या कार्यकर्त्यांचा घराबाहेर गराडा; पुण्यातील राजकीय हालचालींना वेग
परभणीच्या हनुमान मंदिरात मोठी दुर्घटना, बांधकाम सुरु असताना छत कोसळला
Parbhani| परभणीच्या हनुमान मंदिरात मोठी दुर्घटना, बांधकाम सुरु असताना छत कोसळला, अनेकजण जखमी
शिंदे गट नाही, आता एकच शिवसेना!; अमित शाहांच्या विधानाने चर्चांना उधाण
Amit Shah | शिंदे गट नाही, आता एकच शिवसेना!; अमित शाहांच्या विधानाने चर्चांना उधाण
शिंदेंच्या शिवसेनेत जाणार? ओमराजेंचं मोठं विधान, 2 दिवसांत अंतिम...
Omraje Nimbalkar | शिंदेंच्या शिवसेनेत जाणार? ओमराजेंचं मोठं विधान, 2 दिवसांत अंतिम निर्णय घेणार!
शिंदेंच्या सेनेतील बडा नेता ओमराजेंच्या भेटीला; पुण्याच्या निवासस्थानी
शिंदेंच्या सेनेतील बडा नेता ओमराजेंच्या भेटीला; पुण्याच्या निवासस्थानी... राजकारणातील घडामोडींना वेग