AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अफगाणिस्तानविरुद्धची वनडे मालिका जिंकताच कर्णधार गिलने वर्ल्डकप 2027चा प्लान सांगितला, म्हणाला..

भारताने अफगाणिस्तानविरुद्धची वनडे मालिका 3-0 ने खिशात घातली. आता टीम इंडियाचा वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेच्या दिशेने प्रवास सुरू झाला आहे. असं असताना शुबमन गिलने पुढचा प्लान काय असेल? याबाबत सांगितलं.

अफगाणिस्तानविरुद्धची वनडे मालिका जिंकताच कर्णधार गिलने वर्ल्डकप 2027चा प्लान सांगितला, म्हणाला..
अफगाणिस्तानविरुद्धची वनडे मालिका जिंकताच कर्णधार शुबमन गिलने वर्ल्डकप 2027चा प्लान सांगितला, म्हणाला..Image Credit source: BCCI
| Updated on: Jun 20, 2026 | 9:46 PM
Share

वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी आतापासूनच टीम इंडियाची पायाभरणी सुरू झाली आहे. या स्पर्धेसाठी संघाची बांधणी केली जात आहे. त्या दृष्टीने अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेकडे पाहिलं जात होतं. टीम इंडियाने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत अफगाणिस्तानला 3-0 ने मात दिली. मालिका विजयानंतर कर्णधार शुबमन गिलने आपलं मत व्यक्त केलं. या मालिकेत तुम्ही किती गोष्टी साध्य केल्या आहेत? या प्रश्नावर शुबमन गिल म्हणाला की, ‘नक्कीच बऱ्याच. मला वाटतं की बऱ्याच गोष्टी साध्य झाल्या आहेत. आम्ही मधल्या षटकांमध्ये तीव्रता टिकवून ठेवण्याबद्दल बोललो आणि आम्ही ज्या काही गोष्टींवर चर्चा केली त्या म्हणजे गोलंदाजी आणि फलंदाजी युनिट म्हणून आपण मधल्या षटकांमध्ये संधी कशा निर्माण करत राहू शकतो, मधल्या षटकांमध्ये अतिरिक्त धावांसाठी जोर कसा लावू शकतो. आणि मला वाटतं की त्यापैकी बऱ्याच गोष्टी साध्य झाल्या आहेत.’

तुमच्या आगामी कार्यक्रमांपैकी तुम्ही कशाची आतुरतेने वाट पाहत आहात? या प्रश्नावर उत्तर देताना वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या तयारीबात शुबमन गिलने सांगितलं. शुबमन गिल म्हणाला की, ‘इंग्लंडला जाताना तिथली परिस्थिती दक्षिण आफ्रिकेतील परिस्थितीसारखीच असेल, अगदी तशीच नाही, पण तरीही जवळपास तशीच असेल. त्यामुळे तिथे आम्ही ज्या प्रकारचा संघ खेळवण्याचा विचार करत आहोत, त्यासाठी आशा आहे की आमचे सर्व खेळाडू तंदुरुस्त आणि तयार असतील, ही आमच्यासाठी आणखी एक उत्तम मालिका ठरेल.’ वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धा दक्षिण अफ्रिकेत होणार आहे. त्यामुळे इंग्लंडचा दौरा महत्त्वाचा असल्याचं शुबमन गिलने अधोरेखित केलं.

भारतीय संघ जुलै महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. त्यामुळे या मालिकेसाठी आता असलेला संघच खेळण्याची शक्यता आहे. विराट कोहलीसाठी एखाद दुसरी जागा केली जाण्याची शक्यता आहे. भारत इंग्लंड वनडे मालिका 14 जुलैपासून सुरू होणार आहे. पहिला वनडे सामना 14 जुलै, दुसरा वनडे सामना 16 जुलै आणि तिसरा वनडे सामना 19 जुलैला होणार आहे.

Follow Us
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
रुपाली चाकणकर यांच्या विधानामुळे संताप, नेमकं काय म्हणाल्या?
Video : सावित्रीबाई फुलेंनीही 200 वर्षांपूर्वी…. रुपाली चाकणकर यांच्या विधानामुळे संताप, नेमकं काय म्हणाल्या?
सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश
Video: सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश, कुलकर्णी कुटुंबाचा 150 वर्षांच्या गौरवशाली इतिहासाचा देखावा