AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर विकीने घेतलं झुकतं माप; सर्वांसमोर गुडघ्यावर बसून मागितली अंकिता लोखंडेची माफी

बिग बॉसच्या घरात पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी काहींनी विकीला अंकिता लोखंडेवरून रोखठोक प्रश्न विचारले. या प्रश्नांची विकीनेही त्याच्या अंदाजात उत्तरं दिली. अखेर त्याने झुकतं माप घेत सर्वांसमोर गुडघ्यांवर बसून पत्नी अंकिताची माफी मागितली.

अखेर विकीने घेतलं झुकतं माप; सर्वांसमोर गुडघ्यावर बसून मागितली अंकिता लोखंडेची माफी
Bigg Boss 17: अखेर विकीचा अहंकार मोडला? Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 23, 2024 | 8:17 AM
Share

मुंबई : 23 जानेवारी 2024 | टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय शो ‘बिग बॉस 17’चा लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. येत्या 28 जानेवारी रोजी या शोचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. सध्या बिग बॉसच्या घरात फक्त सहा स्पर्धक राहिले आहेत. या सहा जणांमध्ये विजेतेपदासाठी चुरस रंगली आहे. ग्रँड फिनालेपूर्वी शोचा प्रत्येक एपिसोड रंजक करण्याचा निर्मात्यांचा प्रयत्न आहे. नुकतंच बिग बॉसच्या घरात पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पत्रकारांनी स्पर्धकांना विविध प्रश्न विचारले. बिग बॉसच्या स्पर्धकांना पत्रकारांच्या रोखठोक प्रश्नांचा सामना करावा लागला. यावेळी काहींनी विकी जैनला पत्नी अंकिता लोखंडेसोबतच्या वागणुकीविषयी प्रश्न विचारण्यात आले.

“तू तुझ्या पत्नीची बाजू का घेत नाहीस”, असा एक प्रश्न विकीला विचारण्यात आला. त्यावर तो म्हणतो, “जेव्हा दोन बोलके लोक चर्चा करू लागतात, तेव्हा ती चर्चा वाढतच जाते.” यानंतर एक पत्रकार विकीला विचारतो, “बिग बॉसचा शो संपल्यानंतर तू आणि अंकिता मिळून कपल थेरपी घेणार का?” या प्रश्नाचं उत्तर देताना विकी म्हणतो, “थेरपी इथेच आहे. आताच मी गुडघ्यावर बसून तिची माफी मागतो.” यानंतर तो सर्व पत्रकारांसमोर गुडघ्यांवर बसतो आणि अंकिताला म्हणतो, “सॉरी मंकू, माझी चूक झाली, मला माफ कर.”

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

यापुढे विकी म्हणतो, “मी खरंच सांगू इच्छितो की घरात आम्ही दोघंच राहतो. त्यावेळी तुमच्या चुका सांगणारी कोणीच तिसरी व्यक्ती नसते. त्यामुळे तुम्हाला तुमच्या चुका लक्षातही येत नाहीत. या 100 दिवसांत आज जेव्हा पहिल्यांदा सर्वजण मला एकच प्रश्न विचारत आहेत, तेव्हा मी माझ्या सर्व जुन्या चुकांकडे लक्ष देतोय. या चुका मला याआधी कधी लक्षात आल्या नाहीत. आम्हा दोघांमध्ये चुकीचं काहीतरी घडलंय, जे घडायला नाही पाहिजे होतं.”

या पत्रकार परिषदेत एकाने विकीला मुनव्वर फारकीबद्दलही प्रश्न विचारला. “तू मुनव्वरला म्हणालास की मी तुझ्यासारख्या 200 जणांना कामावर ठेवलंय. तर तुला कोणत्या गोष्टीचा घमंड आहे”, असं त्याला विचारलं जातं. त्यावर विकी रोखठोक उत्तर देतो की, “मला माझी पत्नी अंकिता लोखंडे आणि आमच्या कोळशाच्या खाणींवर घमंड आहे.”

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...