AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“इतकी मोठी गोष्ट असताना..”; अंकितासोबतच्या भांडणादरम्यान सुशांतबद्दल हे काय बोलून गेला विकी?

अंकिता आणि सुशांत सिंह राजपूत यांचं नातं जगजाहीर होतं. आता याच नात्यावरून पती विकी जैनने अंकिताला सुनावलं आहे. बिग बॉसच्या घरात पुन्हा एकदा विकी-अंकिताच्या नात्यातील संयमाचा बांध सुटला. यावेळी विकीने सुशांतचा उल्लेख करत अंकिताला सवाल केला आहे.

इतकी मोठी गोष्ट असताना..; अंकितासोबतच्या भांडणादरम्यान सुशांतबद्दल हे काय बोलून गेला विकी?
Ankita Lokhande, Vicky Jain and Sushant Singh RajputImage Credit source: Instagram
| Updated on: Jan 17, 2024 | 12:54 PM
Share

मुंबई : 17 जानेवारी 2024 | सलमान खानचा ‘बिग बॉस 17’ हा शो सध्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. हा शो संपण्यासाठी अवघे दोन आठवडे शिल्लक राहिले आहेत. येत्या 28 जानेवारी रोजी या सिझनचा विजेता घोषित होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन या दोघांमधील भांडणं हा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून या दोघांमध्ये भांडण होताना दिसत आहे. या भांडणादरम्यान दोघं एकमेकांना बरंवाईट बोलून जातात. अंकिताने तर थेट घटस्फोटाचाही उल्लेख केला होता. अशातच एका भांडणादरम्यान आता विकीने अंकिताची पोलखोल करण्याची धमकी दिली आहे. त्याचसोबत दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचं नाव घेत त्याने अंकिताला सुनावलं आहे.

नेमकं काय घडलं?

अंकिता गार्डन एरियामध्ये झोपलेली असते आणि विकी मन्नारासोबत गप्पा मारत असतो. त्यानंतर विकी अंकिताला कॉफी घेणार का विचारतो आणि किचनमध्ये कॉफी बनवण्यासाठी जातो. थोड्या वेळानंतर अंकिता जेव्हा आत जाते, तेव्हा तिला मन्नाराच्या हातात कॉफीचा कप पहायला मिळतो. हे पाहून ती विकीला प्रश्न विचारते की, तू माझ्यासाठी कॉफी आणायला गेला होतास ना? त्यावर विकी म्हणतो, “तू झोपली होतीस. म्हणून मी कॉफी आणली नाही. थांब मी तुझ्यासाठी कॉफी बनवतो.” हे ऐकून अंकिता चिडते आणि तिथून निघून जाते. अंकिताचं हे वागणं विकीला अजिबात आवडत नाही.

अंकिताला विकीने सुनावलं

विकी अंकिताला तिच्या वागणुकीवरून सुनावतो. “मी आता सर्वकाही करून थकलोय”, असं तो म्हणतो. हे ऐकून अंकिता म्हणते, “मीसुद्धा थकली आहे.” त्यावर विकी ओरडून म्हणतो, “तू काहीच केलं नाहीस. जर मी आता खरं बोलायला लागलो तर तू ऐकू शकणार नाही. तू हे सर्व फालतू नाटक करू नकोस. इथेच आता सर्व खरं बोलून टाकावं अशी माझी इच्छा आहे. मी खरं बोललो तर तू ऐकू शकशील का? कृपया माझ्याबद्दल हे नरेटिव्ह बनवणं बंद कर. मी तुझ्यासाठी जे काही केलं, तुझ्यासोबत खंबीरपणे उभा राहिलो. ते सर्व मला स्पष्ट आठवतंय. जेव्हा तू अशी वागतेस, तेव्हा मला खूप वाईट वाटतं.”

यापुढे बोलताना विकी सुशांतचा उल्लेख करतो. “सुशांतचं प्रकरण इतकं मोठं होतं. इतक्या सगळ्या गोष्टी होत्या. तेव्हा मी तुझ्यासोबत उभा होतो. तुला जितक्या मुलाखती द्यायच्या होत्या, जे तुला बोलायचं होतं ते मी तुला बोलू दिलं. मी कधीच त्यामध्ये आलो नाही. तुझ्यासोबत बसून मी स्वत: सर्व गोष्टी लिहून काढायचो की तुला काय करावं लागेल आणि काय नाही. तुझ्या प्रत्येक लढाईत मी तुझ्यासोबत होतो. कधीच कोणते प्रश्न उपस्थित केले नाहीत. आज मी काहीही केलं तरी तुझं तोंड वाकडं होतं. तू मला प्रश्न विचारतेस. हे सर्व काय आहे”, असा सवाल तो अंकिताला करतो.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.