‘छावा’ सिनेमाचा सर्वत्र बोलबाला, सिनेमाची रेकॉर्ड ब्रेक कमाई, वर्षातील पहिला हीट सिनेमा
Chhaava Box Office: 'छावा' सिनेमाचा व्यवसाय वाढता वाढता वाढे..., पाच दिवसांत सिनेमाची रेकॉर्ड ब्रेक कमाई, ठरलाय यंदाच्या वर्षातील पहिला हीट सिनेमा

Chhaava Box Office: अभिनेते विकी कौशल स्टारर ‘छावा’ सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवसागणिक वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र फक्त आणि फक्त ‘छावा’ सिनेमाची चर्चा सुरु आहे. फक्त चार दिवसांमध्ये सिनेमाने बजेटपेक्षा अधिक कमाई केली आहे. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर पाचव्या दिवशी सिनेमाने बॉक्स ऑफिसचे अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. ‘छावा’ सिनेमा आता येत्या दिवसांत किती कोटींपर्यंत मजल मारेल पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचे चरित्र दाखवणारा हा सिनेमा सर्वांच्या हृदयाला भिडणारा आहे. या सिनेमात विकी कौशलने संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. सिनेमासाठी विकीने प्रचंड मेहनत घेतली आहे. शिवाय अभिनेत्याच्या अभिनयाचं देखील सर्वच स्तरातून कौतुक होच आहे. या सिनेमामुळे विकीच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीत मोठी वाढ झाली आहे.
सिनेमाच्या कमाईबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमाने सोमवारपेक्षा मंगळवारी अधिक कमाई केली आहे. जवळपास 130 कोटी रुपयांमध्ये तयार झालेल्या ‘छावा‘ सिनेमाने देशात 165.00 कोटींची कमाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी सिनेमाने 24.50 कोटींची कमाई केली. तर सोमवारी सिनेमाने 24 कोटींची कमाई केली.
View this post on Instagram
‘छावा’ सिनेमाच्या जगभरातील कलेक्शनबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमाने 230 कोटींची कमाई केली आहे. चौथ्या दिवशी हे आकडे 195.60 कोटींच्या आसपास होते. थिएटरमधील प्रेक्षकांच्या गर्दीबद्दल बोलायचं तर रात्रीच्या शोमध्ये सर्वाधिक ऑक्युपन्सी दिसून आली.
‘छावा’ या सिनेमाने मुंबई आणि पुण्यात सर्वाधिक कमाई केली आहे. पाचव्या दिवशी, मुंबईत चित्रपटाची व्याप्ती 54.00% होती, तर पुण्यात ती 69.00% होती, जी इतर शहरांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. आता येत्या दिवसांत सिनेमा किती कोटींची कमाई करेल पाहवं महतत्वाचं ठरणार आहे.
सिनेमातील कलाकार
‘छावा’ सिनेमात विकी कौशलशिवाय रश्मिका मंदान्ना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा, विनीत कुमार सिंग, दिव्या दत्ता, डायना पेंटी, नील भूपालम आणि प्रदीप रावत यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.