मुंबई : ‘मसान’, ‘राजी’, आणि ‘उरी द सर्जिकल स्टाईक’ यांसारख्या चित्रपटातून लाखो चाहत्यांच्या हृदयात घर केलेला अभिनेता विकी कौशलचा (Vicky Kaushal) आज वाढदिवस आहे. त्याने खुप कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. लहानपणापासूनच अभिनयाची आवड असलेल्या विकीने नोकरी सोडून बॉलिवूडमध्ये (Bollywood) एन्ट्री केली. आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आणि चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या विकीला आज कुठल्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. डिसेंबर 2021 मध्ये विकी कौशलने सुप्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफसोबत (Katrina Kaif) लग्नगाठ बांधली. लग्नानंतरचा विकीचा हा पहिला वाढदिवस आहे. त्यामुळे कतरिना विकीला काय गिफ्ट देणार याची उत्सुकता या दोघांच्याही चाहत्यांना लागली आहे.