‘छावा’ सिनेमाला मोठा फटका, 18 व्या दिवशी प्रेक्षकांनी फिरवली पाठ, कमाईचा आकडा इतक्या कोटींनी मंदावला

Chhaava Box Office Collection Day 18: 'छावा' सिनेमाचा वेग मंदावला आहे. 18 व्या दिवशी प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचं चित्र दिसून आलं. 18 व्या दिवशी कमाईचा आकडा इतका कमी? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त छावा सिनेमाची चर्चा...

छावा सिनेमाला मोठा फटका, 18 व्या दिवशी प्रेक्षकांनी फिरवली पाठ, कमाईचा आकडा इतक्या कोटींनी मंदावला
| Updated on: Mar 04, 2025 | 8:24 AM

Chhaava Box Office Collection Day 18: अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिता मंदाना स्टारर ‘छावा’ सिनेमा गेल्या 18 दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. सिनेमाची कमाई दिवसागणिक वाढत असताना, 18 व्या दिवशी म्हणजे सोमवारी सिनेमाच्या कमाईचा आकडा अचानक मंदावला आहे. सिनेमाने 17 व्या दिवशी 25 कोटींची कमाई केली आहे. तर शनिवारी सिनेमाने जवळपास 22 कोटींची कमाई केली आहे. सलग तीन आठवडे सिनेमा चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसत आहे. पण सोमवारी फार कमी कमाई केल्याची माहिती समोर येत आहे.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यावर आधारलेला सिनेमाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी दमदार कामगिरी केली आणि सिनेमा नवीने विक्रम रचेल असं स्पष्ट झालं… तसं झालं देखील… ‘छावा’ सिनेमाचा फक्त भारतात नाही तर, जगभरात देखील बोलबाला पाहायला मिळत आहे.

सांगायचं झालं तर, गेल्या तीन आठवड्यापासून बक्कळ कमाई करणाऱ्या सिनेमाचा वेग मंदावला आहे. पहिल्या आठवड्यात सिनेमाने 219.25 कोटींची कमाई केली. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात सिनेमाने 180.25 कोटींची कमाई केली. सिनेमाने 17 व्या दिवशी 25 कोटींची कमाई केली आहे. 18 व्या दिवशी मात्र सिनेमाच्या कमाईचा वेग मंदावला आहे. 18 व्या दिवशी सिनेमाने फक्त 8.5 कोटींची कमाई केली आहे. म्हणजे 18 दिवसांमध्ये सिनेमाने भारतात 467.25 कोटींची कमाई केली आहे.

 

 

एवढंच नाहीतर, 18 व्या दिवशी 8 कोटींची कमाई करत ‘छावा’ सिनेमाने इतर हीट सिनेमांचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. ‘पद्मावत’ सिनेमाने 18 व्या 8 कोटींची कमाई केली आहे. ‘बाहुबली’ सिनेमाने 18 व्या दिवशी 7.95 कोटींची कमाई केली होती.

‘ॲनिमल’ सिनेमाने 18 व्या दिवशी 5.25 कोटींची कमाई केली. ‘गदर 2’ सिनेमाने 4.6 कोटींची कमाई केली तर, ‘पिके’ सिनेमाने 18 व्या दिवशी 4.42 कोटी रुपयांची कमाई केली.

जगभरातील ‘छावा’ सिनेमाची कमाई

‘छावा’ सिनेमाच्या जगभरातील सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमाने 600 कोटींचा टप्पा पार केला आहे. परदेशात सिनेमाने शनिवारी 75 कोटींची कमाई केली. रविवारपर्यंत सिनेमाने जगभरात 620 कोटींची कमाई केल्याची माहिती समोर येत आहे.