AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पायऱ्यांवरून चालताना काजोलचा पाय घसरला? बॉडीगार्डच्या वागण्यावरच प्रश्न उपस्थित

दुर्गा पूजेदरम्यानचा अभिनेत्री काजोलचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात तिचा पायऱ्यांवरून चालताना तिचा तोल गेला असं दिसत असून बॉडीगार्डने तिला वेळीच सावरले. पण काही युजर्सनी बॉडीगार्डच्या वागण्यावरच प्रश्न उपस्थित केले आहेत. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, काजोलच्या एक्सप्रेशन्सवरून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.

पायऱ्यांवरून चालताना काजोलचा पाय घसरला? बॉडीगार्डच्या वागण्यावरच प्रश्न उपस्थित
Video of Kajol slipping on stairs during Durga Puja goes viral, bodyguard saves herImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 02, 2025 | 8:03 PM
Share

बॉलिवूड अभिनेत्री काजोल सध्या तिच्या दु्र्गापूजेतील पंडालमुळे चर्चेत आहे. पंडालमध्ये काजोल, राणीसह सर्व मुखर्जी कुटुंबाची चर्चा झाली. तसेच अनेक सेलिब्रिटी देखील पूजेत दाखल झाले होते. या कार्यक्रमातील अनेक फोटो , व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. काजोल आणि तिच्या बहिणींच्या लूकची देखील बरीच चर्चा झाली.

पायऱ्या उतरत असताना अचानक तिचा तोल गेला

काल म्हणजे 2 ऑक्टोबर 2025 रोजी महानवमी होती आणि आज दसरा आहे. अभिनेत्री तिच्या कुटुंबाने सिंदूर खेळासाठी उभारलेल्या पंडालमध्ये पोहोचली होती. तिची मुलगी न्यासा देवगन देखील तिच्यासोबत होती. यादरम्यानचा काजोलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती पायऱ्या उतरत असताना अचानक तिचा तोल जातो. पण बॉडिगार्डमुळे ती पडता पडता वाचली.

बॉडिगार्ड तिला अडवले की वाचवले?

पण अनेकांनी असे म्हटले आहेत तिचा पाय घसरला नसून ती पायऱ्या उतरत असताना बॉडिगार्ड तिला अडवतो. शेवटी तो बॉडीगार्ड तिला अडवतो आणि तिचा हात धरतो. हे पाहून काजोलला धक्काच बसतो. तसेच तो तिचा हात धरून तिला नंतर तिथून पुन्हा माघारी जाण्यास सांगतो. त्यामुळे नक्की तो काय प्रसंग घडला आहे सांगता येत नसलं तरी काजोलचे यावेळेचे एक्सप्रेशन पाहून नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. नेटकऱ्यांच्या मते तिने जबरदस्तीचे एक्सप्रेशन दिले आहे.

काजोलच्या व्हायरल व्हिडिओवर कमेंट

काजोलचा व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर, काही इंटरनेट वापरकर्ते असा अंदाज लावत आहेत की ती पडली असावी, तर काहींना वाटत आहे की तिला अयोग्यरित्या स्पर्श करण्यात आला होता. उदाहरणार्थ, एका वापरकर्त्याने कमेंट सेक्शनमध्ये लिहिले, “त्याने हे जाणूनबुजून केले… बरोबर ना?” दुसऱ्या लिहिले, “‘बाहुबली’मध्येही असेच एक दृश्य दाखवण्यात आले होते. त्यानंतर त्याचा हात कापण्यात आला.” दुसऱ्या वापरकर्त्याने टिप्पणी केली, “तिला स्पर्श झाल्याने धक्का बसला. सुरक्षेमुळे नाही.”

व्हिडीओबाबत सोशल मीडियावर अनेक प्रश्न 

तर काहींच्या मते कदाचित तिचा तोल गेल्याने ती थोडी गोंधळली. कारण त्याने बाडिगार्डने जाणूनबुजून केलं असतं कर काजोल परत जाताना त्याच्या हाताचा आधार घेत पायऱ्या चढताना दिसत आहे, त्यामुळे काही नेटकऱ्यांच्या मते त्या बाडिगार्डने उलट तिची मदत केली असं म्हटलं जात आहे. त्यामुळे या व्हिडीओबाबत अनेक प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित केले जात आहेत.

राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.