रिटेकमुळे विधू विनोद चोप्राने संतापून माझ्या पत्नीच्या हाताचा चावा घेतला; मनोज वाजपेयीने सांगितला धक्कादायक अनुभव
वारंवार चुकीचा सीन देत असल्यामुळे संतापून दिग्दर्शक विधू विनोद चोप्राने अभिनेत्रीच्या हाताचा जोरदार चावा घेतला होता. हा प्रसंग मनोज वाजपेयी आणि बॉबी देओलने सांगत नाराजी व्यक्त केली. कोण होती ती अभिनेत्री माहितीये?

बॉलिवूडमध्ये सेलिब्रिटींबद्दल जशी चर्चा होत असते तशी दिग्दर्शक आणि निर्मात्यांबद्दलही चर्चा होताना दिसते. त्यात असे काही ठराविक दिग्दर्शक असतात ज्यांच्यासोबत काम करणे सेलिब्रिटींचे स्वप्न असतं. अशीच काहीशी चर्चा होत असते एका दिग्दर्शकाबद्दल पण त्याच्या रागामुळे आणि कलाकारांसोत वागण्या-बोलण्याच्या सवयींमुळे.
वारंवार चुकीचा सीन दिल्याने संतापून अभिनेत्रीच्या हाताचा चावा घेतला
नाना पाटेकरांचेही या दिग्दर्शकासोबत प्रचंड वाद झाले होते. अर्थातच तुमच्या लक्षात आलं असेलच की हा दिग्दर्शक नक्की कोण आहे ते. हा दिग्दर्शक म्हणजे विधू विनोद चोप्रा. विधू विनोद चोप्रांचे अनेक किस्से ऐकले आहेत. पण एका अभिनेत्रीसोबत त्यांनी जे केलं ते अतिशय भयानक होतं. वारंवार चुकीचा सीन देत असल्यामुळे त्याने संतापून तिच्या हाताचा चावा घेतला होता.
असा धक्कादायक प्रकार ज्या अभिनेत्रीसोबत केला होता ती अभिनेत्री म्हणजे शबाना रझा. जी बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयीची पत्नी देखील आहे. लग्नानंतर शबानाचे नाव बदलून नेहा ठेवण्यात आलं आहे. नेहा वाजपेयी नावानेच ती आता ओळखली जाते. 1998 मध्ये करीब चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटात तिच्यासह बॉबी देओल मुख्य भूमिकेत होता. 2009 मध्ये तिने चित्रपटांमध्ये काम करणं बंद केलं.
मनोज वाजपेयीने पत्नीबद्दलचा तो सीन सांगितला
दरम्यान नुकतंच एका मुलाखतीत मनोज वाजपेयीने पत्नीसोबत घडलेला हा किस्सा सांगितला. तो म्हणाला “तिने चित्रपटांमध्ये काम करणं बंद केलं नाही, तर काही कारणास्तव तिला काम मिळणं बंद झालं. येथे खूप राजकारण आहे. ती बाहेरुन आली असून, येथे तिचा कोणी मेंटॉरही नाही,” असं मनोज वाजपेयीने सांगितलं.
View this post on Instagram
पुढे मनोज वाजपेयीने विधू विनोद चोप्राचा तो किस्सा सांगत प्रतिक्रिया दिली आहे. हा प्रसंग सांगताना तो म्हणाला, “शबानाकडे कोणतंही चित्रपट प्रशिक्षण नाही. यामुळे गाण्याच्या शुटिंगदरम्यान ती सतत चुकीचा हात वर करत होती. त्या सीनमध्ये तिने डावा हात वर करणं अपेक्षित होतं. पण ती वारंवार उजवा हात वरती करत होती. यामुळे तिने न चुकता डावा हात वर करावा यासाठी विधू विनोद चोप्राने हाताचा चावा घेतला होता. माझ्यासह असं करण्याची हिंमत कोणी करणार नाही”.
विधू विनोद चोप्राने अत्यंत चुकीचं केलं…
पुढे त्याने सांगितलं की, “विधू विनोद चोप्रा यांच्या या कृत्यामुळे ती गोंधळात पडली होती. ती तेव्हा चित्रपटांमध्ये नवीन होती आणि तिला इंडस्ट्रीबद्दल फार माहिती नव्हतं. ती नवी असल्याने जे काही झालं ते योग्य झालं की नाही हे तिला समजत नव्हतं. तिला वाटलं दिग्दर्शक अशाच प्रकारे वागतात. तिला वाटलं असेल हे सगळे वेडे हुशार आहेत. ते काहीही करण्यात सक्षम आहेत”. असं म्हणत त्यानेही याबाबत नाराजी व्यक्त केली होती.
बॉबी देओलनेही हा प्रसंग सांगत व्यक्त केली नाराजी
दरम्यान शबानाचा पहिला चित्रपट करीब हा विधू विनोद चोप्रा यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात तिच्यासोबच बॉबी देओलही होता. बॉबी देओलनेही काही वर्षांपूर्वी हा किस्सा सांगितला होता.
हा किस्सा सांगताना त्याने म्हटलं होतं की, “ते सतत तिच्यावर ओरडत असत. एका सीनमध्ये नेहाला डोंगरावरुन खाली येत तिने तिचा डावा हात मला द्यायचा होता. पण ती सतत गोंधळत होती. वारंवार टेक घेतल्यानंतरही जेव्हा ती बरोबर करत नव्हती, तेव्हा विधू यांनी तिच्या उजव्या हाताचा चावा घेतला. पण तरीही पुढच्या सीनमध्ये ती चुकली. 20 टेकनंतर विधू यांचा संताप झाला. मग त्याने तिच्या डाव्या हाताचाही चावा घेतला. हे पाहून मला धक्का बसला होता. मला यावर काय प्रतिक्रिया द्यावी हे समजत नव्हतं” असं म्हणत बॉबी देओलनेही हा प्रकार गैर असल्याचं म्हटलं होतं.
