AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vijay Deverakonda | 500 रुपयांपासून केली करियरला सुरुवात, आता महिन्याला कमावतो इतके कोटी, संपत्ती हैराण करणारी

विजय देवरकोंडा याच्या संपत्तीचा आकडा थक्क करणारा, भव्य घर, महागड्या गाड्या, प्रायव्हेट जेट आणि बरंच काही... 500 रुपयांपासून करियरला सुरुवात केल्यानंतर अभिनेता महिन्याला कमावतो इतके कोटी

Vijay Deverakonda | 500 रुपयांपासून केली करियरला सुरुवात, आता महिन्याला कमावतो इतके कोटी, संपत्ती हैराण करणारी
| Updated on: Aug 22, 2023 | 3:00 PM
Share

मुंबई | 22 ऑगस्ट 2023 : झगमगत्या विश्वात असे अनेक अभिनेते आहेत, ज्यांनी फार कमी कालावधीत स्वतःची ओळख निर्माण केली. सुरुवातीला फार कमी मानधन असलेले काही अभिनेते आज महिन्याला कोट्यवधी रुपये कमावतात. अशाच अभिनेत्यांपैकी एक म्हणजे अभिनेता विजय देवरकोंडा… विजय देवरकोंडा याच्या चाहत्यांची संख्या फक्त भारतात नाही तर, परदेशात देखील फार मोठी आहे. अभिनय क्षेत्रात यश मिळावल्यानंतर अभिनेत्याने स्वतःचा मोर्चा निर्मिती क्षेत्राकडे वळवला… काही वर्षांपूर्वी अभिनेत्याने हैदराबाद येथील जुबली हिल्स याठिकाणी भव्य घर खरेदी केलं. यंग स्टाईल आयकॉन असल्याने, विजय याने २०१८ मध्ये Myntra च्या सहकार्याने राउडी क्लब नावाचे स्वतःचे फॅशन लेबल लाँच केलं.

गेल्या काही वर्षांमध्ये ब्रँडने स्वतःला भारतातील अग्रगण्य स्थानावर पोहोचवलं आहे. एवढंच नाही तर, अभिनेत्याकडे महागड्या गाड्यांचं देखील कलेक्शन देखील आहे. अभिनेत्याकडे मर्सिडीज बेंज GLC (Mercedes Benz) आहे. या कारची किंमत जवळपसा ६८ लाख रुपये आहे. वोल्वो XC90 SUV देखील अभिनेत्याकडे आहे ज्याची किंमत १.३१ कोटी आहे.

एवढंच नाही तर, अभिनेत्याकडे, रेंज रोव्हर (Land Rover Range Rover), फोर्ड मस्टैंग (Ford Mustang) आणि बीएमडब्ल्यू 5-सीरीज (BMW 5-Series) यांसारख्या महागड्या गाड्यांचं कलेक्शन आहे. महागड्या गाड्याच नाही तर, अभिनेत्याकडे स्वतःचं प्रायव्हेट जेट देखील आहे. प्रायव्हेट जेटमधून अभिनेता कुटुंबासोबत फिरायला जात असतो.

एवढंच नाही तर, यावर्षी, विजय देवरकोंडा याने हैदराबाद ब्लॅकहॉक्स व्हॉलीबॉल संघाचा मालक देखील झाला आहे. अभिनेत्याने १६० कोटी रुपयांमध्ये व्हॉलीबॉलची टीम खरेदी केली आहे. पण विजय देवरकोंडा याच्या पहिल्या कमाईबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याची पहिली कमाई फक्त ५०० रुपये होती.

एका मुलाखतीत अभिनेता म्हणाला, अभिनेता एक ट्यूशन टीचर होता. तेव्हा अभिनेत्याला फक्त ५०० रुपये मिळायचे. त्यानंतर अभिनेत्याने अनेकांना अभिनयाचं प्रशिक्षण देण्याची सुरुवात केली. तेव्हा अभिनेत्याला ३५ हजार रुपये मिळायचे.

२०१३ मधील अभिनेत्याची अंदाजे संपत्ती सुमारे ६५ कोटी रुपये इतकी आहे. याशिवाय तो काही ब्रँड्सची जाहिरातही करतो. ज्यामुळे त्यांच्या उत्पन्नात भर पडते. विजयने करण जोहरच्या ‘लायगर’मधून अनन्या पांडेसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अभिनेता एका सिनेमासाठी जवळपास १२ कोटी रुपये मानधन घेतो.

विजय देवरकोंडा याच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता लवकरच समंथा रुथ प्रभू हिच्यासोबत ‘खुशी’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणरा आहे. सिनेमा १ सप्टेंबर रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.