AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नाच्या 6 महिन्यांनंतर रश्मिका-विजयमध्ये कोणत्या कारणावरून होते भांडण? अभिनेत्रीने सांगितलं कारण

लग्नाच्या 6 महिन्यानंतर रश्मिका मंदाना- विजय देवरकोंडा कोणत्या विषयावर भांडतात? नॅशनल क्रशने रश्मिकाने सांगूनच टाकलं.

लग्नाच्या 6 महिन्यांनंतर रश्मिका-विजयमध्ये कोणत्या कारणावरून होते भांडण? अभिनेत्रीने सांगितलं कारण
Image Credit source: Social media
| Updated on: Oct 05, 2026 | 5:24 PM
Share

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांची जोडी चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केल्यानंतर दोघांच्या नात्याला सुरुवात झाली आणि आता दोघेही वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत आहेत. नुकतेच दोघे त्यांच्या आगामी ‘राणाबली’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांच्या नात्याबद्दल आणि वैवाहिक आयुष्याबद्दल मोकळेपणाने बोलले.

शुभांकर यांनी रश्मिका आणि विजय यांना त्यांच्या भांडणांबद्दल विचारलं. यावर रश्मिकाने मजेशीर उत्तर देत सांगितलं की, दोघेही एकत्र अनेक गोष्टी करत असल्याने त्यांच्यात भांडण होण्याची फारशी संधीच मिळत नाही. कपल म्हणून ते एकमेकांसोबत वेळ घालवण्याचा आणि वेगवेगळ्या गोष्टी एन्जॉय करण्याचा आनंद घेतात.

‘विजय स्वयंपाक करण्याचा प्रयत्नही करत नाहीत’

रश्मिकाने यावेळी विजयची मजेशीरपणे पोलखोलही केली. ती म्हणाली की, ती विजयपेक्षा चांगला स्वयंपाक करते. विजय स्वयंपाक करण्याचा प्रयत्नही करत नाहीत, त्यामुळे आपल्यालाच स्वयंपाक करावा लागतो, असं रश्मिकाने सांगितलं. मात्र, तिने हेही स्पष्ट केलं की ती केवळ ‘सर्व्हायव्हल’साठी आवश्यक तेवढा स्वयंपाक करू शकते.

विजयने त्यांच्या नात्याबद्दल बोलताना सांगितलं की, दोघांनी सेटवर एकत्र बराच वेळ घालवला आहे. ते जिममध्ये एकत्र जायचे, एकत्र जेवायचे आणि बराच वेळ एकमेकांसोबत घालवायचे. मात्र, रश्मिका सेटवर नसताना विजयला तिची उणीव जाणवायची. याच काळात आपल्याला तिच्याबद्दल प्रेम असल्याची जाणीव झाल्याचं विजयने सांगितलं.

रश्मिकाचं समजूतदारपण विजयला भावतं

विजयने पत्नी रश्मिकाचं कौतुक करताना ती अत्यंत समजूतदार असल्याचं सांगितलं. कामामुळे आपण व्यस्त असतो आणि तिला वेळ देता येत नाही, असं सांगितल्यावर रश्मिका परिस्थिती लगेच समजून घेते, असं विजय म्हणाला.

दरम्यान, रश्मिका विजयला प्रेमाने ‘विजू’ या नावाने हाक मारते. याबद्दल बोलताना तिने आणखी एक मजेशीर किस्सा सांगितला. ती म्हणाली की, प्रेमाने ‘विजू-विजू’ म्हणून हाक मारली तर विजय अनेकदा ऐकत नाहीत; मात्र ती रागाने त्यांना हाक मारते तेव्हा तो लगेच प्रतिसाद देतो. दोघांच्या या गोड आणि मजेशीर संवादामुळे त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या वैवाहिक नात्यातील बॉन्डिंगची खास झलक पाहायला मिळाली आहे.

Follow Us
मविआत ठरलं नाही अन् ठाकरे गटाने उमेदवार उतरवला; काँग्रेस-उबाठा...
Vidhan Parishad Election : मविआत ठरलं नाही अन् ठाकरे गटाने उमेदवार उतरवला; अमरावतीत काँग्रेस-उबाठा आमनेसामने
एल निनोचा धोका, सरकारचा मास्टर प्लॅन नेमका काय?
Maharashtra Drought : एल निनोचा धोका, महाराष्ट्रात पाण्याचं मायक्रो प्लॅनिंग; सरकारचा मास्टर प्लॅन नेमका काय?
कर्जमाफीवर संजय शिरसाटांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, एकही शेतकरी....
Sanjay Shirsat : कर्जमाफीवर संजय शिरसाटांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, एकही शेतकरी....
फुटीरवादी नेत्यांमुळे आंबेडकरी चळवळीचं नुकसान; सचिन खरातांचा....
Sachin Kharat On Abhijeet Dipake : फुटीरवादी नेत्यांमुळे आंबेडकरी चळवळीचं नुकसान; सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर थेट निशाणा, पण खरात असं का म्हणाले?
कोल्हापूर अंबाबाई मंदिरात आज दिवसभर देवीच्या मूर्तीचे दर्शन बंद
कोल्हापूर अंबाबाई मंदिरात आज दिवसभर देवीच्या मूर्तीचे दर्शन बंद
जिल्हा बँक निवडणुकीत राम शिंदेंचा मोठा निर्णय; म्हणाले, पदाची निष्पक्ष
Ahilyanagar Election : जिल्हा बँक निवडणुकीत राम शिंदेंचा मोठा निर्णय; म्हणाले, पदाची निष्पक्षता जपण्यासाठी...
राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला; आदित्य यांच्या पासपोर्ट जप्तीची मागणी
राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला; आदित्य यांच्या पासपोर्ट जप्तीची मागणी
'राऊतांना मोदींवर टीका करण्याचा अधिकार नाही', परिणय फुकेंचं वक्तव्य
Video :
मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शहाजी बापू पाटलांचा यू-टर्न
मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शहाजी बापू पाटलांचा यू-टर्न, विरोध मागे घेऊन प्रचारात सक्रिय
Video: ट्रिपल इंजिन सरकार विरोधात टोळीयुद्ध सुरू - हर्षवर्धन सपकाळ
Video: ट्रिपल इंजिन सरकार विरोधात टोळीयुद्ध सुरू - हर्षवर्धन सपकाळ