AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rakhi Sawant : त्यांनी आता लग्नाबाबत … विजय-त्रिशाबद्दल हे काय बोलून बसली राखी सावंत ?

थलपती विजयच्या निवडणुकीतील यशानंतर अभिनेत्री तृषासोबतच्या त्याच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर राखी सावंतने धक्कादायक प्रतिक्रिया दिली आहे. विजय आणि तृषाने आता लग्नच करावे, असे राखीचे म्हणणे आहे. तिने दोघांबाबत भाष्य करत, विजयच्या राजकीय यशाचेही कौतुक केले असून, त्यांच्या आगामी चित्रपटांची माहिती दिली आहे.

Rakhi Sawant : त्यांनी आता लग्नाबाबत ... विजय-त्रिशाबद्दल हे काय बोलून बसली राखी सावंत  ?
राखी सावंत हे काय बोलून गेली ?
| Updated on: May 09, 2026 | 8:01 AM
Share

थलपथी विजय सध्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीतील आपल्या विजयाचा आनंद साजरा करत आहे. मात्र तर दुसरीकडे अभिनेत्री त्रिशा आणि त्याच्या डेटिंगच्या चर्चांना भलताच जोर चढला आहे. तामिळनाडू निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर, त्या दोघांचे जुने व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. याच दरम्यान, आता राखी सावंतने त्यांच्या डेटिंगच्या अफवांवर प्रतिक्रिया दिली आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, राखी सावंतने ‘घिल्ली’ स्टार्सच्या डेटिंगच्या अफवांवर भाष्य केलं. . एवढंच नव्हे तर त्यांनी लग्न करावं असंही तिचं म्हणणं आहे. मी त्रिशाला ओळखते, कारण आम्ही दोघींनी आमच्या करिअरची सुरुवात एकत्र केली होती असा दावाही राखी सावंतने केला आहे.

काय म्हणाली राखी सावंत ?

फिल्मी मंत्रा मीडियाशी बोलताना राखी, त्रिशा- वियबद्दल बोललाी. “मला वाटतं त्यांनी लग्न करावं. विजय आणि त्रिशाने लग्न करावं, आम्ही त्यांच्या मेहंदी समारंभाला जाऊ.” असं विधान राखीने केलं. यावेळी राखीने तामिळनाडू निवडणुकीतील विजयच्या विजयाबद्दलही आपलं मत व्यक्त केलं. ती म्हणाली, “तामिळनाडूमध्ये इतक्या जागा जिंकणारे ते पहिले ख्रिश्चन आहेत. त्यामुळे, ते मला वैयक्तिकरित्या आवडतात आणि विजयसोबत एक गाणं करणे हे माझं स्वप्न होते, पण मला ती संधी मिळाली नाही. मात्र, आता मला वाटतं की मी त्यांच्या पक्षात सामील व्हायला हवे.” असं म्हणत राखीने पक्षप्रवेशाची इच्छाही व्यक्त केली.

तृषा-विजयबद्दल काय म्हणाली राखी ?

मी तृषाला ओळखते, त्यांची जोडी खूप चांगली आहे, असं तृषा-विजय यांच्याबद्दल बोताना राखी पुढे म्हणाली. मी आणि तृषा, दोघींनी बॉलिवूडमध्ये एकत्र सुरूवात केली होती, पण नंतर तृषा साऊथला गेली आणि तिथे चित्रपटांत काम करू लागली. ‘ते (विजय) येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात, त्यामुळे त्याचा विजय निश्चित होता’ असंही शेवटी राखी म्हणाली.

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचे निकाल 4 मे 2026 रोजी जाहीर झाले, आणि योगायोगाने तोच त्रिशाचा वाढदिवस होता. जेव्हा मतमोजणी सुरू होती आणि विजय आघाडीवर होते, तेव्हा त्रिशाने त्याच्या घरी भेटही दिली होती. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या नात्याच्या अफवा पसरत असल्या तरी, विजय किंवा त्रिशा या दोघांनीही त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

विजय – तृषाचे आगामी चित्रपट

तामिळनाडू निवडणुकीत थलपती विजयच्या यशानंतर, त्यांचे चाहते आता त्याच्या ‘जननायक’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा विजय यांचा (अभिनेता म्हणून) शेवटचा चित्रपट असण्याची शक्यता असून, तो लवकरच प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, त्रिशा ‘करुप्पू’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे, जो 15 मे 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे.

Follow Us
प्रतीक्षा संपली! मुंबईत अखेर पावसाची दमदार एन्ट्री; हवामान...
Mumbai Rain Update | प्रतीक्षा संपली! मुंबईत अखेर पावसाची दमदार एन्ट्री; हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी!
पक्षप्रवेश करणाऱ्या 6 खासदारांची खासदारकी जाणार? शिंदेंनी एका झटक्यातच
Big Breaking | पक्षप्रवेश करणाऱ्या 6 खासदारांची खासदारकी जाणार? शिंदेंनी एका झटक्यातच दिलं उत्तर; कायदेशीर...
ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिवसेने जाहीर पक्षप्रवेश; पत्रकार परिषदेच्या..
ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिवसेने जाहीर पक्षप्रवेश; पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच शिंदेंचं ओमराजेंबाबत मोठं विधान
गेल्या दोन तासांपासून बैठक सुरु; 6 फुटीर खासदार Y. B. चव्हाण सेंटरवर
गेल्या दोन तासांपासून बैठक सुरु; 6 फुटीर खासदार Y. B. चव्हाण सेंटरवर पोहोचण्याआधीच...
हुबेहुब रुपाली चाकणकर! महाराष्ट्रभर गाजलेल्या खरात प्रकरणावरील चित्रपट
हुबेहुब रुपाली चाकणकर! महाराष्ट्रभर गाजलेल्या खरात प्रकरणावरील चित्रपटाचा First Look समोर
6 खासदार गेलेच, आता ते 3 आमदारही नाराज? ठाकरेंच्या बैठकीला मारली दांडी
मोठी घडामोड! 6 खासदार गेलेच, आता ते 3 आमदारही नाराज? उद्धव ठाकरेंच्या बैठकीला मारली दांडी!
पक्ष प्रवेशापूर्वीच शिंदेकडून ओमराजेंना मोठं गिफ्ट? थेट दिल्लीत...
Omraje Nimbalkar | पक्ष प्रवेशापूर्वीच मोठं घडलं; शिंदेकडून ओमराजेंना मोठं गिफ्ट? थेट दिल्लीत...
शिंदे-मींदे बाळंत झालेत, 6 गद्दारांना जन्म दिला; राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut | शिंदे-मींदे बाळंत झालेत, 6 गद्दारांना जन्म दिला, नंदनवनात पाळणा...शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसलेलेही त्यांनी फसवतायेत? बड्या नेत्याच्या
उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसलेलेही त्यांनी फसवतायेत? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ऑपरेशन टायगर 2 पण होणार, शिंदेंच्या बड्या नेत्याने दिले मोठे संकेत
मोठी बातमी! 6 खासदारांनंतर आणखी मोठा धक्का; ऑपरेशन टायगर 2 पण होणार, शिंदेंच्या शिवसेनेच्या बड्या नेत्याने दिले मोठे संकेत