AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जुही चावलाचं ते गाणं ऐकून विनोद खन्ना रडले, झाली होती विचित्र अवस्था, आजही लाखो चाहत्यांचं फेवरेट

1989 मधील अत्यंत वेदनादायक गाणं. जे ऐकून विनोद खन्ना यांची रडून रडून झाली होती प्रचंड वाईट अवस्था. आजही प्रेक्षक त्या गाण्याचे आहेत वेडे.

जुही चावलाचं ते गाणं ऐकून विनोद खन्ना रडले, झाली होती विचित्र अवस्था, आजही लाखो चाहत्यांचं फेवरेट
| Updated on: Jan 09, 2026 | 1:03 PM
Share

1989 मध्ये प्रदर्शित झालेला यश चोप्रा दिग्दर्शित ‘चांदनी’ हा चित्रपट आजही हिंदी चित्रपटसृष्टीतील एक क्लासिक चित्रपट मानला जातो. या चित्रपटात प्रेम, सौंदर्य आणि भावना यांचा सुरेख संगम पाहायला मिळाला. या चित्रपटातील जवळपास प्रत्येक गाण्याने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवले. मात्र, या चित्रपटातील एक गाणं असं होतं, ज्याने दुःख, वेदना आणि तुटलेल्या मनाची भावना इतक्या प्रभावीपणे मांडली की ते गाणं आजही अजरामर ठरलं आहे.

हे गाणं विनोद खन्ना, श्रीदेवी आणि जूही चावला यांच्यावर चित्रित करण्यात आलं होतं. यामधील प्रसंग प्रेक्षकांच्या मनावर खोल परिणाम करून जातो. गाण्यात विनोद खन्ना आपल्या मृत पत्नीची आठवण काढताना दिसतात. चित्रपटात जूही चावला यांनी त्यांच्या पत्नीची भूमिका साकारलेली असते. मात्र, तिचा अचानक मृत्यू होतो. पत्नीच्या आठवणींनी व्याकूळ झालेला नवरा, तिच्या आठवणीत अक्षरशः रडत आहे असं त्यामध्ये दाखवलेलं आहे. हे दृश्य अत्यंत हृदयद्रावक आहे.

या गाण्याचे बोल इतके वेदनादायक आहेत की ते ऐकताना कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल. प्रेम हरवल्याची वेदना, एकटेपणा आणि न लागणारे मन या सगळ्या भावना या गाण्यातून ठळकपणे व्यक्त होतात. या गाण्यातील विनोद खन्ना यांचा अभिनय इतका प्रभावी आहे की प्रेक्षक त्यांच्या दुःखाशी सहजपणे एकरूप होतात.

लाखो चाहत्यांचं आवडतं गाणं

विशेष म्हणजे, या गाण्यात श्रीदेवी पावसात भिजताना दिसत आहेत. पण विनोद खन्नांच्या मनात मात्र सतत त्यांच्या पत्नीची म्हणजेच जूही चावलाची प्रतिमा फिरत असते. श्रीदेवी समोर असतानाही त्यांचे मन भूतकाळात अडकलेले असते. ही भावनिक गुंतागुंत यश चोप्रांनी अतिशय सुंदर पद्धतीने दाखवली आहे.

‘चांदनी’ चित्रपटामधील हे गाणं केवळ एक गाणं नसून ते प्रेम आणि विरहाची एक कविता आहे. संगीत, शब्द, अभिनय आणि दृश्यरचना यांचा परिपूर्ण मेळ या गाण्यात पाहायला मिळतो. त्यामुळेच आज अनेक वर्षांनंतरही हे गाणं ऐकलं की त्या काळातील भावना, दुःख आणि आठवणी पुन्हा एकदा ताज्या होतात.

यश चोप्रां यांची हीच खासियत होती. प्रेमकथा सांगताना भावनांना शब्दांपलीकडे नेणे आणि ‘चांदनी’ चित्रपटामधील हे दुःखद गाणं त्याचे सर्वोत्तम उदाहरण मानले जाते.

सामंतांच्या बॅगेची आयोगाकडून तपासणी, बॅगेत काय-काय? मंत्र्यानच सांगितल
सामंतांच्या बॅगेची आयोगाकडून तपासणी, बॅगेत काय-काय? मंत्र्यानच सांगितल.
...मग आम्ही काय बांगड्या भरल्यात का? अजितदादांवर ऐकरी भाषा अन्...
...मग आम्ही काय बांगड्या भरल्यात का? अजितदादांवर ऐकरी भाषा अन्....
नितेश राणेंचे व्हिडीओ 11 तारखेला व्हायरल करू, सचिन अहिर यांचा निशाणा
नितेश राणेंचे व्हिडीओ 11 तारखेला व्हायरल करू, सचिन अहिर यांचा निशाणा.
मी टोपी फेकली, राऊतांनी दोघांच्या डोक्यात घातली... फडणवीसांचा हल्लाबोल
मी टोपी फेकली, राऊतांनी दोघांच्या डोक्यात घातली... फडणवीसांचा हल्लाबोल.
कल्याण-डोंबिवलीचा महापौर महायुतीचाच... शिंदेंकडून विजयाचा विश्वास
कल्याण-डोंबिवलीचा महापौर महायुतीचाच... शिंदेंकडून विजयाचा विश्वास.
घरच्या माणसांनी घरच्यांसाठीच... फडणवीसांचा ठाकरेंच्या मुलाखतीवरून टोला
घरच्या माणसांनी घरच्यांसाठीच... फडणवीसांचा ठाकरेंच्या मुलाखतीवरून टोला.
..म्हणून मी काँग्रेस सोबत गेलो होतो, ठाकरेंचा भाजपच्या युतीवरून घणाघात
..म्हणून मी काँग्रेस सोबत गेलो होतो, ठाकरेंचा भाजपच्या युतीवरून घणाघात.
1500 रूपये कुठ टिकणार? लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरेंनी सरकारला घेरलं
1500 रूपये कुठ टिकणार? लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरेंनी सरकारला घेरलं.
मला आज आनंद होतोय, कारण माझा भाऊ...उद्धव ठाकरे सभेत नेमकं काय म्हणाले?
मला आज आनंद होतोय, कारण माझा भाऊ...उद्धव ठाकरे सभेत नेमकं काय म्हणाले?.
लाकूडतोड्या बरा होता, तपोवनवरून राज ठाकरे यांचा गिरीश महाजनांना टोला
लाकूडतोड्या बरा होता, तपोवनवरून राज ठाकरे यांचा गिरीश महाजनांना टोला.