AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: आधी ‘कच्चा बदाम’मुळे व्हायरल, आता क्लबमध्ये… अंजली पैशांसाठी थायलंडमध्ये काय करते?

Viral Video: अभिनेत्री कंगान रणौतच्या रिअॅलिटी शो लॉक अप आणि व्हायरल गाणे कच्चा बादाममुळे लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री अंजली अरोरा सध्या चर्चेत आहे. अंजली पैशांसाठी थायलंडमध्ये करत असलेल्या कामामुळे सर्वांना धक्का बसला आहे. तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Video: आधी 'कच्चा बदाम'मुळे व्हायरल, आता क्लबमध्ये... अंजली पैशांसाठी थायलंडमध्ये काय करते?
Anjali AroraImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Aug 25, 2025 | 2:16 PM
Share

कच्चा बदाम या व्हायरल झालेल्या गाण्यामुळे अंजली अरोरा रातोरात स्टार झाली. तिला प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन पोहोचवले. त्यानंतर अंजली अभिनेत्री कंगान रणौतचा रिअॅलिटी शो लॉक अपमध्ये सहभागी झाली. अंजली अरोरा रातोरात स्टार बनली. पण सध्या अंजली एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. अंजलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अंजली थायलंडमधील एका क्लबमध्ये डान्स करताना दिसत आहे. तिच्या या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

व्हायरल व्हिडीओ आणि करिअर बदलाची चर्चा

या व्हिडीओमध्ये अंजली क्लबच्या डान्स फ्लोअरवर ओ साकी साकी या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. तिने चमकदार पेस्टल रंगाचा हॉल्टर-नेक क्रॉप टॉप आणि हाय-स्लिट स्कर्ट परिधान केला आहे. व्हिडीओमध्ये तिच्यासोबत काही बॅकग्राऊंड डान्सर्सही दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक सोशल मीडिया युजर्सनी असा अंदाज लावला आहे की, अंजलीने हाय-एंड क्लब्समध्ये डान्सिंग हे करिअर म्हणून स्वीकारले आहे. मात्र, अंजलीने या करिअर बदलाच्या दाव्यांवर अद्याप कोणतेही प्रतिक्रिया दिलेले नाही.

वाचा: अमाल मलिक ते प्रणित मोरे; पाहा बिग बॉस 19मध्ये दिसणाऱ्या कलाकारांची यादी

सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया

या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही युजर्सनी तिच्या कथित करिअर बदलावर टीका केली आहे, तर काहींनी तिच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. एका युजरने लिहिले, “जेव्हा दुआ लिपा डान्स करते, तेव्हा कोणी काही बोलत नाही, उलट तिचे कौतुक केले जाते. पण जेव्हा आपली रॉकस्टार अंजली अरोरा पटायामधील क्लबमध्ये डान्स करताना दिसते, तेव्हा आपण आपले डोके नको तिकडे लावतो. का? ही वसाहतिक मानसिकता आहे का?”

दुसऱ्या एका युजरने X (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिले, “व्हायरल फेमची शेल्फ लाइफ फक्त 1-2 वर्षे असते. त्यातून जास्तीत जास्त फायदा मिळवून व्यवसाय सुरू करावा किंवा आदरणीय करिअर निवडावे लागते. अन्यथा दुबईच्या फ्लाइट्स किंवा पट्टायामध्ये डान्स करणे हेच उपजीविकेचे मार्ग उरतात.”

याउलट, अंजलीच्या समर्थनार्थ एका युजरने लिहिले, “तुम्हाला नेमके तिला काय करायला सांगायचे आहे? आणि तिने तुमच्यासारख्या अपयशी व्यक्तीचे ऐकावे का? तुम्ही तुमच्या आयुष्यात काय साध्य केले आहे की कोणाला उपदेश द्यावा? ती प्रामाणिकपणे उपजीविका करत आहे. कोणालाही कोणत्याही प्रकारे हानी पोहोचवत नाही. डान्स हे तिचे सर्वोत्तम कौशल्य आहे. ती आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करत आहे.”

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.