विराट कोहली लग्नापूर्वी ‘या’ अभिनेत्रीला करत होता डेट, आज आहे दोन मुलांची आई
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीनेही अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत लग्ल केलं आहे. मात्र तो लग्नापूर्वी एका दुसऱ्या अभिनेत्रीला डेट करत होता अशी माहिती समोर आली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री आणि क्रिकेटपटू हे नाते खूप जुने आहे. अनेक खेळाडू अभिनेत्रींना डेट करत असल्याच्या बातम्या समोर येत असतात. पुढे जाऊन अनेक खेळाडू अभिनेत्रींशी लग्नही करतात. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीनेही अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत लग्ल केलं आहे. हे जोडपं एक परिपूर्ण जोडपं म्हणून ओळखले जातात. दोघांनी 2017 मध्ये लग्न केले आणि आज त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अनुष्का आणि विराट एका जाहिरातीच्या शूटिंग दरम्यान एकमेकांना भेटले होते. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. मात्र हे दोघे एकमेकांच्या आयुष्यात येण्यापूर्वी दोघांचीही नावे इतरांशीही जोडली गेली होती. अनुष्काचे नाव शाहिद कपूर, अर्जुन कपूर, रणवीर सिंग आणि रणबीर कपूरशी जोडले गेले होते. मात्र विराट कोहलीच्या अफेअर बद्दल खुप कमी लोकांना माहिती आहे.
विराट या अभिनेत्रीला करत होता डेट
पिंकव्हिलाच्या एका बातमीनुसार, अनुष्काला भेटण्यापूर्वी आणि तिच्याशी लग्न करण्यापूर्वी विराट कोहली आणखी एका बॉलीवूड अभिनेत्रीला डेट करत होता. या अभिनेत्रीने खूप कमी बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. या अभिनेत्रीचे नाव इसाबेल लीट आहे. ती ब्राझिलची आहे. इसाबेलने तीन बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम केले. मात्र तिच्या तिन्ही चित्रपटांनी काही खास कामगिरी केली नाही. अनुष्का आणि विराटप्रमाणेच इसाबेल आणि विराटचीही एका जाहिरातीच्या शूट दरम्यान भेट झाली होती अशी माहिती समोर आली आहे.
जाहिरातीच्या शूट दरम्यान भेट
समोर आलेल्या माहितीनुसार, विराट आणि इसाबेल यांची भेट सिंगापूरमध्ये झाली होती. दोघे एका जाहिरातीच्या शूटसाठी भेटले होते. भेटीनंतर दोघांची मैत्री झाली आणि त्यानंतर दोघांना अनेक वेळा एकत्र पाहण्यात आले होते. मात्र दोघांनीही एकमेकांशी असलेल्या नात्याची माहिती दिली नाही. मात्र हे दोघे सुमारे 2 वर्षे एकत्र होते. त्यानंतर 2012 मध्ये दोघांचे ब्रेकअप झाले. ब्रेकअपच्या दोन वर्षांनी एका मुलाखतीत इसाबेलने विराटसोबतच्या नात्याची आणि ब्रेकअप झाल्याची कबुली दिली होती.
दोन मुलांची आई
इसाबेल सध्या तिचा पती आणि दोन मुलींसह कतारच्या दोहा येथे राहते. दोघेही खूप आनंदी आहेत. इसाबेल अनेकदा जाहिराती आणि मॉडेलिंगचे फोटो शेअर करत असते. तिने 2020 मध्ये विजय देवरकोंडाच्या ‘वर्ल्ड फेमस लव्हर’ या चित्रपटातही काम केले होते.
