The Vaccine War | विवेक अग्निहोत्री यांनी दिले प्रेक्षकांना मोठे गिफ्ट, थेट डबल धमाका करत…
विवेक अग्निहोत्री हे कायमच चर्चेत असतात. विवेक अग्निहोत्री हे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. विषय कोणताही असो विवेक अग्निहोत्री हे आपले मत मांडताना फार काही विचार करत नाहीत. विवेक अग्निहोत्री यांची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते.

मुंबई : विवेक अग्निहोत्री हे कायमच चर्चेत असतात. विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांच्या द काश्मीर फाइल्स या चित्रपटाला प्रेक्षकांनी मोठे प्रेम दिले. इतकेच नाही तर द काश्मीर फाइल्स हा बाॅलिवूडचा सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट (Movie) आहे. द काश्मीर फाइल्स या चित्रपटाची मोठी क्रेझ चाहत्यांमध्ये बघायला मिळाली. द काश्मीर फाइल्स चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. द काश्मीर फाइल्स चित्रपटामध्ये अनुपम खेर हे मुख्य भूमिकेत धमाका करताना दिसले. या चित्रपटाला अनेक पुरस्कार देखील मिळाले.
द काश्मीर फाइल्सनंतर आता विवेक अग्निहोत्री यांचा द वॅक्सिन वॉर हा चित्रपट मोठा धमाका करताना दिसतोय. विशेष म्हणजे विवेक अग्निहोत्री यांचा हा चित्रपट 28 सप्टेंबर रोजी रिलीज झालाय. ओपनिंग डेला या चित्रपटाने मोठा धमाका केला. नाना पाटेकर द वॅक्सिन वॉर हा चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसत आहेत. चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
द वॅक्सिन वॉर चित्रपटाला रिलीज होऊन चार दिवस झाले. रिलीजच्या तिसऱ्या दिवशी चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर तगडी कमाई केलीये. आता विवेक अग्निहोत्री यांनी प्रेक्षकांना एक अत्यंत मोठे गिफ्ट दिलंय. विवेक अग्निहोत्री यांनी मोठी घोषणा केलीये. विवेक अग्निहोत्री यांनी केलेल्या या घोषणेनंतर चाहत्यांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळतोय.
द वॅक्सिन वॉर चित्रपटाच्या एका तिकिटावर दोन व्यक्ती चित्रपट पाहू शकणार आहेत. म्हणजेच काय तर एका तिकिटावर दुसरे तिकिट फ्री मिळणार आहे. विवेक अग्निहोत्री यांनी याबद्दलची एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत आपल्या चाहत्यांसोबत ही मोठी माहिती शेअर केलीये. यामुळे चाहते आनंदी आहेत.
विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, मित्रांनो, आज रविवार आणि सोमवारी गांधी जयंतीच्या सुट्टीच्या निमित्ताने तुमच्या कुटुंबासोबत #द वॅक्सिन वॉर चित्रपट पाहा आणि मोफत तिकिटे मिळवा. तुमच्या कुटुंबातील महिला किंवा मुलीला हे मोफत तिकीट द्या ते आणि तुम्ही मजा करा.
पुढे विवेक अग्निहोत्री यांनी म्हटले की, आपल्यामध्ये असे कोणीही नाही ज्याच्या शरीरात ही लस नाहीये. आपण काही गोष्टी अगदी सहज विसरतो. हा चित्रपट आपल्या शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांची, त्यागाची, संघर्षाची आणि यशाची आठवण करून देणारा आहे. त्यांच्यामुळेच आज आपण सर्वजण जिवंत आहोत. म्हणजे काय तर आता विवेक अग्निहोत्री यांनी चाहत्यांमध्ये मोठे गिफ्ट दिसतंय.
