‘शाहरुखसोबत माझे शारीरिक संबंध…’; विवेक वासवानीने स्पष्टच सांगितलं, धक्कादायक माहिती समोर
बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खानच्या चित्रपटांची, त्यांच्या यशस्वी आयुष्याची नेहमीच चर्चा होताना दिसते.पण शाहरूख खानबद्दल एक धक्कादायक माहिती समोर आली होती ती म्हणजे की विवेक वासवानी आणि शाहरुख खान यांच्या शारीरिक संबंधांच्या बातम्या. अखेर विवेकने एका मुलाखतीत सत्य सांगून टाकलं.

बॉलिवूडमध्ये चित्रपट कलाकारांचे अफेअर. घटस्फोट तसेच विवाहबाह्य संबंधांच्या बातम्या येतच असतात आणि ते आता सर्वांसाठीच सामान्य झालं आहे. पण शाहरूख खानबद्दल अशी एक बातमी समोर आली की त्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली. शाहरुख नेहमीच स्वतःला ‘One woman man’ म्हणत असला तरी, त्याचे नाव कधी प्रियांका चोप्रासोबत तर कधी करण जोहरसोबत जोडले गेले. असा दावाही करण्यात आला होता की शाहरुखचे करणसोबत शारीरिक संबंध होते. एवढंच नाही तर शाहरुखचे नाव त्याचा जवळचा मित्र विवेक वासवानीसोबतही जोडले गेले होते. पण खरंच असं होतं का? विवेक वासवानी स्वत:च त्याच्या मुलाखतीत याबद्दलचा खुलासा केला आहे. सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत वासवानी यांनी शाहरुख आणि त्याच्या नात्याच्या बातम्यांवर अखेर मौन सोडलं.
विवेक वासवानी आणि शाहरुख खान यांच्या शारीरिक संबंधांच्या अनेक बातम्या आल्या होत्या
विवेक वासवानी आणि शाहरुख खान यांच्या शारीरिक संबंधांच्या अनेक बातम्या आल्या होत्या. या मुलाखतीत विवेकला विचारण्यात आलं की त्याचे कधी शाहरुख खानसोबत संबंध होते का? तेव्हा तो म्हणाला, ‘नाते? म्हणजे नक्की काय?सेक्शुअल रिलेशनशिप का? तर नाही. शाहरूख अजिबातच तसा नाही.’
‘शाहरुखसोबत शारीरिक संबंध…’
विवेक वासवानी पुढे म्हणाला, ‘ही अफवा कुठून आली हे मला माहित नाही. मी घरी होतो. आई आणि बाबा देखील तिथेच होते. तणाव होता. करिअर होते. त्याला लवकरच गौरीशी लग्न करायचे होते. त्यात नाते कसे असेल? विवेक वासवानी म्हणाला की ती फक्त मैत्री होती. शाहरूखसोबत शारीरिक संबंधाचा मी विचारही करू शकत नाही.”
शाहरुखच्या करण जोहरसोबतच्या नात्याची बातमी…
विवेकने शाहरुख आणि करण जोहरसोबतच्या शारीरिक संबंधांनाही नकार दिला. तो म्हणाला, ‘शाहरुखच्या करणसोबतच्या नात्यामुळे अनेकांनी ही अफवा उठवण्याचा प्रयत्न केला. पण जसजसे तुम्ही मोठे स्टार बनता तसतसे तुमचा दर्जा वाढतो, लोक सर्व प्रकारच्या गोष्टी बोलू लागतात. पण हे सर्व खरे नाही.’ हे सर्व सांगत विवेकने या सर्व गोष्टींना फक्त एक अफवा आणि खोट्या चर्चा असल्याचं स्पष्ट केलं.
विवेक वासवानी आणि शाहरुख त्यांच्या संघर्षाच्या काळात एकाच घरात एकत्र राहत होते,
हे फार कमी जणांना माहित असेल की विवेक वासवानी आणि शाहरुख त्यांच्या संघर्षाच्या काळात एकाच घरात एकत्र राहत होते, तेव्हा लोक असा अंदाज लावू लागले की दोघांमध्ये काहीतरी चालू आहे. असाही दावा केला जात होता की विवेक शाहरुखच्या संघर्षाच्या काळात त्याचा खर्च उचलत असे. इतकेच नाही तर तो शाहरुखला लोकांना भेटण्यासाठी सोबत घेऊन जात असे. पण ती फक्त एक मैत्री होती असं विवेकने मुलाखतीत स्पष्ट केलं.
प्रियांका आणि करण यांच्यातील अफेरची बातमी
विवेक वासवानी यांनीही शाहरुखच्या प्रियांका चोप्रासोबतच्या अफेअरच्या चर्चेबाबतही खुलासा केला. ‘डॉन २’ चित्रपटात एकत्र काम करताना शाहरुख आणि प्रियांकाचं नावं जोडलं गेलं होतं. काही वृत्तांतांमध्ये असा दावा करण्यात आला होता की प्रियांकासोबतच्या अफेअरमुळे शाहरुखचे गौरीशी भांडण झाले होते. मात्र विवेक वासवानी यांनी या अफेअरच्या बातम्या खोट्या असल्याचे म्हटलं आहे. ते म्हणाले, ‘हे खरे नाही. जेव्हापासून मी त्याला ओळखतो तेव्हापासून तो ‘One woman man’आहे. त्याच्या आणखी किती अफेअर्सबद्दल तुम्ही ऐकले आहे? असा प्रश्न देखील विवेकने मिश्किलपणे विचारला.
