2026 चा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट, थिएटरबाहेर चप्पल काढून लोक बघत आहेत चित्रपट, कमाई थक्क करणारी

ना प्रमोशन, ना मोठा खर्च, 2 कोटींचे बजेट असणाऱ्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर घातलाय प्रचंड धुमाकूळ. लोक थिएटरमध्ये चप्पल बाहेर सोडून बघत आहेत चित्रपट. कमाई पाहून सर्वच थक्क.

2026 चा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट, थिएटरबाहेर चप्पल काढून लोक बघत आहेत चित्रपट, कमाई थक्क करणारी
Image Credit source: Social media
| Updated on: Sep 02, 2026 | 3:32 PM

इंडस्ट्रीमध्ये चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्यांच्या प्रमोशनसाठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला जातो. चित्रपटातील कलाकार अनेक ठिकाणी जाऊन प्रमोशन करतात. तसेच रिअॅलिटी शोमध्ये देखील ते अनेकदा हजेरी लावतात, सोशल मीडियावर मोठमोठे कॅम्पेन राबवले जातात. मात्र, 2026 मधील सर्वाधिक नफा कमावणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरलेल्या ‘हनुमान अंश’ने यापैकी काहीच केलं नाही. कोणताही मोठा गाजावाजा न करता प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर थक्क करणारी कामगिरी केली आहे.

प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भंडारकर यांनीही ‘हनुमान अंश’च्या यशाचे कौतुक करत हा चित्रपट फिल्म इंडस्ट्रीसाठी एक ‘केस स्टडी’ असल्याचे म्हटले आहे. सुरुवातीच्या आठवड्यात फ्लॉप समजून दुर्लक्षित करण्यात आलेला हा चित्रपट हळूहळू प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. आधी सरप्राईज हिट, त्यानंतर सुपरहिट आणि आता ब्लॉकबस्टर असा या चित्रपटाचा प्रवास झाला आहे.

चित्रपटाच्या सेटवर होते कडक नियम

दिग्दर्शक विशाल चतुर्वेदी यांच्या म्हणण्यानुसार, सध्या हा चित्रपट देशभरातील 700 हून अधिक स्क्रीनवर प्रदर्शित होत आहे. विशेष म्हणजे, चित्रपट पाहताना प्रेक्षक भावूक होत असल्याचेही त्यांनी सांगितले. काही ठिकाणी प्रेक्षक थिएटरमध्ये चप्पल-बूट बाहेर काढून चित्रपट पाहत आहेत तर काही ठिकाणी ‘हनुमान चालीसा’चे पठण करत असल्याचेही समोर आले आहे. चित्रपटाला CBFC कडून ‘U’ प्रमाणपत्र मिळाले आहे.

‘हनुमान अंश’च्या निर्मितीदरम्यानही अनेक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. दिग्दर्शकांनी दिलेल्या माहितीनुसार, शूटिंगच्या सेटवर शिव्या, भांडण किंवा वादाला परवानगी नव्हती. सेटवर केवळ शाकाहारी जेवण दिले जात होते. मद्यपान तसेच मांसाहाराला पूर्णपणे बंदी होती. दररोज हनुमान चालीसाचे पठण केल्यानंतरच शूटिंगला सुरुवात केली जात होती आणि दिवसाचा शेवटही त्याच पद्धतीने केला जात होता.

हटके प्रमोशन ठरले फायदेशीर

चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मोठा खर्च करण्याइतके पैसे निर्मात्यांकडे नव्हते. मात्र, त्यांनी हीच गोष्ट वेगळ्या पद्धतीने हाताळली. नीम करोली बाबांचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोठ्या जाहिरात मोहिमेऐवजी त्यांनी सुमारे आठ भंडारे आयोजित केले आणि त्यातून लोकांना चित्रपटाबद्दल माहिती दिली.

मोठे स्टार्स, कोट्यवधींचे प्रमोशन आणि भव्य कॅम्पेन नसतानाही केवळ आशय, श्रद्धा आणि प्रेक्षकांच्या तोंडी प्रसिद्धीच्या जोरावर 2 कोटींच्या चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा गाठणे ही बाब सध्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us