AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Disha Salian : 14 व्या मजल्यावरुन खाली पडली पण…, शेवटच्या क्षणी सतत काय बोलत होती दिशा? कोणी केला धक्कादायक दावा

Disha Salian : . 14 व्या मजल्यावरून पडून दिशा हिने स्वतःचं आयुष्य संपवलं.. पण 14 व्या मजल्यावरून पडून देखील तिच्या चेहऱ्यावर एकही जखम नव्हती... जाणून घ्या शेवटच्या क्षणी सतत काय बोलत होती दिशा? 

Disha Salian : 14 व्या मजल्यावरुन खाली पडली पण..., शेवटच्या क्षणी सतत काय बोलत होती दिशा? कोणी केला धक्कादायक दावा
Disha Salian,
| Updated on: Sep 02, 2026 | 4:06 PM
Share

Disha Salian : दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची मॅनेजर दिशा सालियान हिच्या मृत्यूचं रहस्य अद्यापही उलगडलेलं नाही. दिशा सालियन प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून सतत आरोप केली जात आहेत. त्यातच आता कोर्टाने थेट दिशा सालियन प्रकरणाचा तपास हा सीबीआयने करावा असं म्हटलं आहे. दिशा हिने जून 2020 मध्ये अखेरचा श्वास घेतला. 14 व्या मजल्यावरून पडून दिशा हिने स्वतःचं आयुष्य संपवलं.. पण 14 व्या मजल्यावरून पडून देखील तिच्या चेहऱ्यावर एकही जखम नव्हती… असा प्रश्न काही दिवसांपूर्वी झालेल्या सुनावणीत न्यायमुर्तींनी उपस्थित केला.

आता पुन्हा दिशा सालियान प्रकरण चर्चेत आलं आहे. त्यामुळे दिशाच्या मृत्यूच्या वेळी काय घडलं होतं? याची कसून चौकशी होत आहे. 9 जून 2020 रोजी दिशा हिने अखेरचा श्वास घेतला. 14 व्या मजल्यावरून पडून देखील दिशा हिच्या चेहऱ्याला देखील काहीच झालं नव्हतं… असा खुलासा दिशाच्या एका मित्राने केला. 9 जून रोजी दिशा बॉयफ्रेंड आणि काही मित्रांसोबत पार्टी करत होती. त्यावेळी दिशाने दारू प्यायलेली.

पुढे मित्र म्हणाला, सर्व काही सुरळीत सुरु असताना दिशा बेडरुममध्ये गेली. ती बाहेरच येत नव्हती. अखेर ती बाहेर येत नाही म्हणून मित्रांनी दरवाजा ठोठावला. पण कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. अखेर दरवाजा तोडण्यात आला. तेव्हा दिशाने बाल्कनीतून उडी मारल्याचं कळलं. पण खाली पडलेली असताना तिच्या मित्रांनी पाहिलं तेव्हा ती जिवंत होती. ती सतत बोलायची ‘कोणालाच कोणाची काळजी नसते…’ अखेर दिशा हिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेव्हा डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

रिपोर्टनुसार, दिशा हिचा मॉडेल आणि अभिनेता रोहन राय याच्यासोबत लग्न करणार होती. पण लग्नाच्या काही दिवस आधीच दिशाचा मलाड येथील उच्चभ्रू इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून पडल्यामुळे दिशाचा मृत्यू झाला.  दिशाच्या आत्महत्येच्यानंतर आमच्यात काही भांडण झालं होतं का, हे तपासण्यासाठी पोलिसांनी माझे कपडेही काढायला लावले… असं देखील रोहन राय म्हणाला होता.

Follow Us
ठाकरे गटाची धाकधूक वाढली? शिंदे गटाच्या वकिलाचा तोडीस तोड युक्तिवाद;
ठाकरे गटाची धाकधूक वाढली? शिंदे गटाच्या वकिलाचा तोडीस तोड युक्तिवाद; थेट निवडणूक आयोग....
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीदरम्यान मोठा ट्विस्ट! शिंदेंच्या वकिलांनी...
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीदरम्यान मोठा ट्विस्ट! शिंदेंचे वकिल फिरवणार डाव? नेमक्या मुद्यावर युक्तिवाद
1600 हून अधिक शिक्षकांच्या पदांसाठी भरती; सविस्तर जाणून घ्या
Mega Bharti | 1600 हून अधिक शिक्षकांच्या पदांसाठी भरती; सविस्तर जाणून घ्या माहिती
वाशिममध्ये पावसाने दडी मारली; सोयाबीन-तूर सुकू लागली! शेतकऱ्यांवर...
वाशिममध्ये पावसाने दडी मारली; सोयाबीन-तूर सुकू लागली! शेतकऱ्यांवर मोठं संकट, 4-5 दिवसांत पाऊस नाही तर...
हैदराबादचं गॅझेट नाही, बाबासाहेबांचं संविधान चालणार!
Laxman Hake | हैदराबादचं गॅझेट नाही, बाबासाहेबांचं संविधान चालणार! लक्ष्मण हाकेंनी GR जाळून सरकारला सुनावलं
ठाकरेंचे नगरसेवक आमच्या संपर्कात... एकीकडे कोर्टात सुनावणी दुसरीकडे
ठाकरेंचे नगरसेवक आमच्या संपर्कात... एकीकडे कोर्टात सुनावणी दुसरीकडे पुन्हा ठाकरे गटाला खिंडार पडणार? भाजपा नेत्याचा दावा काय?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा निकाल कधी? असीम सरोदे यांचं भाकीत काय?
Asim Sarode | शिवसेना पक्ष-चिन्हाचा निकाल कधी? असीम सरोदे यांचं भाकीत काय?
भुजबळांसह 3 मंत्र्यांचा ओबीसी उपसमितीच्या बैठकीतून बहिष्कार
OBC Reservation | ओबीसी उपसमितीच्या बैठकीत मोठा राडा! भुजबळांसह 3 मंत्र्यांचा बैठकीतून बहिष्कार; निधीवरून सरकारला घेरलं
शिवसेना कुणाची? आज शिंदे गटाचे वकील युक्तिवाद करणार; थेट...
शिवसेना कुणाची? आज शिंदे गटाचे वकील युक्तिवाद करणार; थेट...
महागाईचा भडका कष्टकऱ्यांचं कंबरडं मोडलं; सुळेंनी सरकारला घेरलं
Supriya Sule | सण तोंडावर, महागाईचा भडका! कष्टकऱ्यांचं कंबरडं मोडलं; सुप्रिया सुळेंनी सरकारला घेरलं