AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कंगना रनौतला कानशिलात लगावणाऱ्या महिला CISF जवानाला काय होणार शिक्षा?

slapping MP Kangana Ranaut : अभिनेत्री कंगना राणौतला दिल्लीला जात असताना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) महिला कॉन्स्टेबलने चंदीगड विमानतळावर कथितपणे थप्पड मारली.

कंगना रनौतला कानशिलात लगावणाऱ्या महिला CISF जवानाला काय होणार शिक्षा?
shailesh musale
shailesh musale | Updated on: Jun 07, 2024 | 9:34 PM
Share

बॉलीवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणौतने हिमाचलच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. तिने काँग्रेसचे उमेदवार विक्रमादित्य सिंह यांचा पराभव केलाय. कंगनाने 74 हजार 755 मतांच्या फरकाने ही निवडणूक जिंकली. पण कंगना विजयाचा आनंद साजरा करत असतानाच एका महिला CISF जवानाने तिला कानशिलात लगावली. खासदार कंगना राणौत चंदीगड विमानतळावर असताना तिला महिला CISF जवानाने कानशिलात लगावली. कंगनावर हल्ला करणाऱ्या गार्डचे नाव कुलविंदर कौर आहे. कंगना भाजपच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी विमानाने दिल्लीला येत असताना ही घटना घडली.

कंगनावर का केला हल्ला

ड्युटीवर असलेल्या कुलविंदर कौरने कंगनाच्या कानशिलात लगावली. आरोपी महिला शिपायाचे म्हणणे आहे की, कंगना राणौतने शेतकरी आंदोलनावर केलेल्या वक्तव्यामुळे तिला खूप राग होता. कंगनाने देखील तिच्या सोशल मीडियावर अकाऊंटवरुन पोस्ट शेअर करत घडलेली  घटना सांगितली. या महिला सीआयएसएफ जवानाने दिला शिवीगाळही केल्याचा आरोप कंगनाने केला आहे. या प्रकरणी महिला कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आले आहे. कुलविंदर कौलच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या मुद्द्यावर काही शेतकरी नेत्यांनी राजकारण सुरू केले आहे. जेव्हा कोणी खासदारावर हल्ला करतो किंवा गैरवर्तन करतो तेव्हा त्याला शिक्षेची तरतूद काय आहे. जाणून घेऊयात.

कायदा काय म्हणतो?

भारतात कुणाला कानशिलात मारणे हे गुन्ह्याच्या श्रेणीत येते, त्यासाठी शिक्षेची तरतूद आहे. अशा प्रकरणांमध्ये, पोलीस आयपीसी कलम 323 अंतर्गत गुन्हा नोंदवतात. आयपीसीच्या कलम 323 अंतर्गत, जर एखाद्याने स्वेच्छेने एखाद्याला दुखापत किंवा हानी पोहोचवली, तर असे केल्यास त्याला 1 वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो. याशिवाय 1000 रुपये दंड किंवा दोन्हीही होऊ शकतात. घटनेच्या वेळी कोणीतरी गैरवर्तन केले आणि नंतर घटना घडवून आणली हे सिद्ध झाल्यास, न्यायालय शिक्षेत बदल देखील करू शकते.

जर एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला धमकावण्यासाठी गुन्हेगारी शक्ती किंवा प्रतिकात्मक हल्ला केला आणि त्याला कोणतीही हानी झाली नाही परंतु पीडित घाबरली तर कलम 358 अंतर्गत आरोपी दोषी मानला जाईल. भारतीय दंड संहिता (IPC) चे कलम 352 म्हणते की, जर एखाद्या व्यक्तीने कोणत्याही चिथावणीशिवाय पीडितेवर हल्ला केला किंवा गुन्हेगारी बळाचा वापर केला, तर अशा प्रकरणांमध्ये तीन महिन्यांपर्यंत कारावास आणि 500 ​​रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. मात्र, तपास अहवाल समोर आल्यानंतर कोणती कलमे लावायची हे ठरवता येते. दुसरीकडे, कंगनाला थप्पड मारणाऱ्या CISF महिला शिपायावरही सेवेशी संबंधित कारवाई केली जाऊ शकते.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा