‘मी घाईत लग्न केलं, चुकी माझी, कारण…’, मनिषा कोईरालाचं खासगी आयुष्याबद्दल मोठं वक्तव्य
Manisha Koirala Marriage Life: 'मी लग्नाचं स्वप्न पाहिलं होतं पण...', लग्न, वैवाहिक आयुष्य आणि घटस्फोटाबद्दल मनिषा कोईराला हिचं मोठं वक्तव्य, मनिषा कोईराला कायम असते तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत
‘सौदागर’, ‘1942: ए लव स्टोरी’, ‘बॉम्बे’, ‘अग्नि साक्षी’, ‘गुप्त’ आणि ‘मन’ यांसारख्या अनेक सिनेमांच्या माध्यमातून मनिषा कोईराला हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. नुकताच, अभिनेत्री ‘हीरामंडी’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली आणि मिषाने पुन्हा चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. प्रोफेशनल आयुष्यात मनिषा यशाच्या शिखरावर चढली, पण अभिनेत्रीला खासगी आयुष्यात अनेक कठीण संकटांचा सामना करावा लागला. अभिनेत्रीने 19 जून 2020 मध्ये उद्योजक सम्राट दहल याच्यासोबत लग्न केलं. पण अभिनेत्रीचं लग्न फार काळ टिकलं नाही.
लग्नाच्या दोन वर्षानंतर मनिषा आणि सम्राट यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 2012 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. याच दरम्यान अभिनेत्रीला कॅन्सर झाल्याची माहिती समोर आली आणि अभिनेत्री उपचारासाठी परदेशात गेली. उपचार घेवून भारतात परतल्यानंतर अभिनेत्रीने खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला होता.
एका मुलाखतीत मनिषा हिने लग्नाबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं.’लग्नबद्दल माझं एक स्वप्न होतं. जर तुम्ही कोणत्या वाईट नात्यामध्ये असाल तर, लवकरात-लवकर अशा नात्यातून बाहेर निघायला हवं. यामध्ये वाईट असं काहीही नाही. मी घाईमध्ये लग्न केलं, मी म्हणाली होती घाईत लग्न करण्याची सर्व जबाबदारी मी घेते…’
घटस्फोटानंतर अभिनेत्रीने एका मुलाखतीत ‘माझ्या आयुष्यात पुरुषाचं प्रेम नाही…’ असं म्हणत अपयशी ठरलेल्या लग्नाबद्दल मोठा खुलासा केला होता. सांगायचं झालं तर, लग्नाआधी देखील मनिषाने एक दोन नाहीतर, तब्बल 12 सेलिब्रिटींना डेट केलं होतं. पण कोणत्याच सेलिब्रिटीसोबत अभिनेत्रीचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही.
मनिषा कोईराला हिचे बॉयफ्रेंड्स
एक काळ असा होता जेव्हा अभिनेत्रीच्या नावाची चर्चा दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्यासोबत देखील झाली होती. पण नाना पाटेकर तेव्हा विवाहित होते. नाना पाटेकर यांच्याशिवाय मनिषाचं नाव विवेक मुशरान, डिजे हुसैन, सेसिल एंथनी , आर्यन वेद, प्रशांत चौधरी, क्रिस्पिन कॉनरॉय, तारिक प्रेमजी, राजीव मूलचंदानी क्रिस्टोफर डोरिस यांच्यासोबत जोडण्यात आलं.