AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“मी कधीच राजकारण्याशी लग्न..”; खासदार राघव चड्ढा यांच्याशी लग्नाच्या चर्चांदरम्यान परिणीतीचा व्हिडीओ व्हायरल

लग्नाच्या चर्चांदरम्यान परिणीती आणि राघव हे रविवारी मुंबई विमानतळावर एकत्र दिसले. दुसरीकडे परिणीतीची चुलत बहीण आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रासुद्धा भारतात आली आहे. पती निक जोनास आणि मुलगी मालती मेरी जोनाससोबत ती मुंबईत आली आहे.

मी कधीच राजकारण्याशी लग्न..; खासदार राघव चड्ढा यांच्याशी लग्नाच्या चर्चांदरम्यान परिणीतीचा व्हिडीओ व्हायरल
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 03, 2023 | 9:03 AM
Share

मुंबई : अभिनेत्री परिणीती चोप्रा गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा यांच्याशी ती लवकरच लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे. यावर अद्याप परिणीती किंवा राघव यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र आधी ‘आप’चे खासदार आणि त्यानंतर एका पंजाबी गायकाने या दोघांना सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्यानंतर लग्नाच्या चर्चांनी आणखी जोर धरला आहे. या सर्व चर्चांदरम्यान सध्या परिणीतीचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त परिणीतीने ही मुलाखत दिली होती. “मी कधीच राजकारण्याशी लग्न करणार नाही”, असं परिणीती या व्हिडीओत म्हणतेय.

परिणीती चोप्रा आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे ‘हंसी तो फंसी’ या चित्रपटाचं प्रमोशन करत होते, तेव्हाचा हा व्हिडीओ आहे. या मुलाखतीतील रॅपिड फायर प्रश्नांदरम्यान परिणीतीला अशा सेलिब्रिटींची नावं विचारली गेली, ज्यांच्याशी ती लग्न करू इच्छिते. या प्रश्नाचं उत्तर देताना परिणीतीने हॉलिवूड अभिनेता ब्रॅड पिटचं नाव घेतलं. त्यानंतर तिला राजकारण्यांची नावं विचारली गेली. तेव्हा ती म्हणाली, “समस्या अशी आहे की मला कोणत्याच राजकारण्याशी लग्न करायचं नाही. खरंतर बरेच चांगले पर्याय आहेत पण मला कधीच राजकारण्याशी लग्न करायचं नाही.”

परिणीतीच्या या व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. त्यावर विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. ‘म्हणून असं म्हणतात की कधीच नाही म्हणू नये’, असं एकाने लिहिलंय. तर ‘म्हणजे साखरपुड्याची चर्चा खोटी का’, असा सवाल दुसऱ्या युजरने केला. या मुलाखतीत परिणीताला तिच्या पार्टनरमध्ये कोणते तीन गुण असावेत, असा प्रश्न विचारला गेला. त्यावर तिने सांगितलं, “त्याची विनोदबुद्धी चांगली असायला हवी, त्याने माझा आदर करावा आणि त्याच्याजवळ चांगला सुगंध यावा.” स्वत:च्या हिंमतीवर करिअर करणारी मुलं मला आवडतात, असंही ती म्हणाली.

View this post on Instagram

A post shared by TAHIR JASUS007 (@tahirjasus)

लग्नाच्या चर्चांदरम्यान परिणीती आणि राघव हे रविवारी मुंबई विमानतळावर एकत्र दिसले. दुसरीकडे परिणीतीची चुलत बहीण आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रासुद्धा भारतात आली आहे. पती निक जोनास आणि मुलगी मालती मेरी जोनाससोबत ती मुंबईत आली आहे. त्यामुळे परिणीतीच्या साखरपुड्याची चर्चा होत आहे.

राघव आणि परिणीती हे एकमेकांना युकेमध्ये असल्यापासून ओळखतात. परिणीतीने मँचेस्टर बिझनेस स्कूलमध्ये शिक्षण घेतलंय. तर राघवने लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधून शिक्षण पूर्ण केलंय. परिणीतीने 2011 मध्ये ‘लेडीज व्हर्सेस रिकी बहल’ या चित्रपटात सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका साकारून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचं प्रेक्षक-समिक्षकांकडून कौतुक झालं. त्यानंतर ती ‘इशकजादे’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकली. अर्जुन कपूरसोबत तिची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडली. परिणीतीने ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘हसी तो फसी’, ‘दावत ए इश्क’, ‘किल दिल’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.