निधनाच्या 6 दिवसांनंतरही अंत्यसंस्कार झाले नाहीत, कुठे आहे संजय कपूरचे पार्थिव? कुटुंबियांनी देखील बाळगले मौन
करिश्मा कपूरचा पूर्व पती संजय कपूरचे सहा दिवसांपूर्वी निधन झाले आहे. मात्र, त्याच्या पार्थिवावर अद्याप अंत्यसंस्कार करण्यात आलेले नाही. तसेच कुटुंबीयांनी देखील मौन बाळगले आहे.

करिश्मा कपूरचा पूर्व पती आणि उद्योजक संजय कपूरचे 12 जून रोजी इंग्लंडमध्ये पोलो खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. संजय कपूरवर भारतात अंत्यसंस्कार होणार होते. मात्र, सहा दिवस उलटूनही त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आलेले नाहीत. त्याचबरोबर, संजयच्या निधनानंतर त्याच्या तिसऱ्या पत्नीबाबतही कोणतीही माहिती समोर आलेली नाही. आता संजय कपूरचे पार्थिव शरीर नेमके कुठे आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
करिश्माचा पूर्व पती संजय कपूरचे पार्थिव शरीर कुठे आहे?
करिश्मा कपूरचा पूर्व पती संजय कपूरच्या निधनाला सहा दिवस झाले आहेत. मात्र, त्याच्यावर अंत्यसंस्कार अद्याप झालेले नाहीत. असे सांगितले जात आहे की, त्याचा पार्थिवावर अंत्यसंस्कार दिल्लीत होणार आहेत आणि अमेरिकन नागरिकत्वामुळे कायदेशीर औपचारिकतांमुळे त्यांचे पार्थिव शरीर भारतात आणण्यास थोडा विलंब होत आहे. पण आश्चर्याची बाब म्हणजे, गेल्या सहा दिवसांत संजय कपूरच्या अंत्यसंस्काराबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही आणि त्यांचे पार्थिव शरीर कुठे आहे याबाबतही कोणती माहिती उपलब्ध झालेली नाही.
प्रश्न उपस्थित होत आहेत की:
- कायदेशीर कारवाईमुळे संजयचे पार्थिव शरीर अजूनही लंडनमध्येच अडकले आहे का?
- कायदेशीर अडचणींमुळेचे अंत्यसंस्कार लंडनमध्येच झाले आहेत का?
- की भारतात आणून संजय कपूरचे अंत्यसंस्कार गुपचूपपणे पार पाडले गेले आहेत का?
संजय कपूरच्या अंत्यसंस्काराबाबत नेटकऱ्यांचे प्रश्न
संजय कपूरच्या अंत्यसंस्काराबाबत नेटकरी अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत. पण या प्रकरणी कुटुंबाने मौन बाळगले आहे. असे सांगितले जात आहे की, संजयकडे अमेरिकन नागरिकत्व असल्याने काही कायदेशीर अडचणी येत आहेत, ज्यामुळे त्याचे पार्थिव शरीर भारतात आणण्यास विलंब होत आहे. मात्र, यानंतर संजय कपूरच्या अंत्यसंस्काराबाबत कुटुंबाने कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही.
तिसरी पत्नी प्रिया सचदेवची कोणतीही खबर नाही
संजयच्या निधनानंतर त्याची तिसऱ्या पत्नी प्रिया सचदेव देखील माध्यमांसमोर आलेली नाही. तिच्याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही की त्या सध्या कुठे आहे. तिने तिचे सोशल मीडिया खातेही खासगी केले आहे. विशेष म्हणजे, संजय कपूरचे कुटुंब दिल्लीत राहते. त्याच्या कुटुंबात पत्नी प्रिया सचदेव, मुलगा आजरियस, सावत्र मुलगी सफीरा आणि आई राणी कपूर यांचा समावेश आहे. त्याला दोन बहिणीही आहेत, ज्या परदेशात राहतात. त्याचे वडील सुरेंद्र कपूर यांचे निधन 2015 मध्ये झाले होते.
