AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

करिश्मा कपूरच्या पूर्व पतीच्या संपत्तीवरून वाद; सावत्र लेकीमुळे नवा ट्विस्ट, मोठा गेम समोर?

दिवंगत बिझनेसमन संजय कपूरच्या तीस हजार कोटींच्या संपत्तीच्या वादात नवा ट्विस्ट आला आहे. आता त्याच्या सावत्र लेकीने मोठा खेळ खेळल्याचं म्हटलं जात आहे. संजयची तिसरी पत्नी प्रिया सचदेवच्या पहिल्या लग्नातून झालेली ही सफिरा मुलगी आहे.

करिश्मा कपूरच्या पूर्व पतीच्या संपत्तीवरून वाद; सावत्र लेकीमुळे नवा ट्विस्ट, मोठा गेम समोर?
करिश्मा कपूर, संजय कपूर, सफिरा आणि प्रिया सचदेवImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 05, 2025 | 12:36 PM
Share

अभिनेत्री करिश्मा कपूरचा पूर्व पती आणि बिझनेसमन संजय कपूरचं 12 जून रोजी इंग्लंडमध्ये पोलो खेळताना हार्ट अटॅकने निधन झालं. संजय कपूरच्या अकस्मात निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. आता त्याच्या 30 हजार कोटी रुपयांच्या संपत्तीवरून वाद सुरू आहे. एकीकडे संजयच्या आईने ब्रिटिश सरकारकडे त्याच्या निधनाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी संजयच्या हत्येचा संशय व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे संपत्तीच्या वादादरम्यान संजयची सावत्र मुलगी सफिराचं नाव चर्चेत आलं आहे. संजयच्या निधनानंतर सफिराला त्याच्या संपत्तीतून वाटा मिळणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. अशातच सफिराने तिच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरून खऱ्या वडिलांचं आडनाव काढून टाकलं आहे.

कोण आहे सफिरा?

सफिरा, ही संजय कपूरची तिसरी पत्नी प्रिया सचदेवच्या पहिल्या लग्नातून झालेली मुलगी आहे. प्रिया सचदेवने हॉटेल बिझनेसमन विक्रम चटवालशी लग्न केलं होतं. या दोघांना सफिरा ही मुलगी आहे. त्यानंतर 2017 मध्ये प्रियाने संजय कपूरशी लग्न केल्यानंतर सफिरा त्यांच्या कुटुंबाचा भाग बनली.

संजय कपूरने सफिराला घेतलं दत्तक?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, संजय कपूरने प्रियाशी लग्न केल्यानंतर सफिराला कायदेशीर पद्धतीने दत्तक घेतलं होतं. यामुळे ती कायदेशीररित्या वारस बनली. परंतु तरीही असा दावा केला जात आहे की सफिरा तिचे खरे वडील विक्रम यांचं आडनाव लावायची. परंतु आता काही दिवसांपूर्वीच तिने वडिलांचं ‘चटवाल’ हे आडनाव काढून टाकलं आहे. यामुळे संजय कपूरच्या संपत्तीत तिला वाटा मिळण्यावरून चर्चा सुरू झाली आहे. परंतु याबाबत अद्याप अधिकृत अशी कोणतीच माहिती समोर आली नाही.

असाही दावा केला जात आहे की सफिराच्या आधी तिची आई आणि संजय कपूरची तिसरी पत्नी प्रिया सचदेवनेही तिच्या नावापुढे ‘कपूर’ असं आडनाव जोडलं आहे. तिने इन्स्टाग्रामवर तिचं नाव प्रिया एस. कपूर असं लिहिलं आहे. विशेष म्हणजे ती आता ‘सोना कॉमस्टार’ या कंपनीच्या बोर्डातही सहभागी झाली आहे. या कंपनीच्या अध्यक्षपदी संजय कपूर होता. आता त्याच्या 30 हजार कोटींच्या संपत्तीतून प्रिया, सफिरा आणि करिश्मा कपूरच्या मुलांना काय मिळणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था