तासाभरापूर्वी इन्स्टाग्रामवर स्टोरी केली पोस्ट; नंतर 12 सेकंदात पतीने गोळ्या झाडून इन्फ्लुएन्सरची केली हत्या

राजस्थानमध्ये एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. अनामिका बिश्नोई असं तिचं नाव असून तिच्या पतीनेच तिच्यावर गोळ्या झाडल्या आहेत. हत्येची ही घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे.

तासाभरापूर्वी इन्स्टाग्रामवर स्टोरी केली पोस्ट; नंतर 12 सेकंदात पतीने गोळ्या झाडून इन्फ्लुएन्सरची केली हत्या
अनामिका बिश्नोईImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 27, 2024 | 8:28 AM

राजस्थान : 27 फेब्रुवारी 2024 | राजस्थानमधील फलोदी याठिकाणी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अनामिका बिश्नोईची गोळी झाडून हत्या करण्यात आली. तिची हत्या करणारा दुसरा तिसरा कोणी नसून तिचा पती महिरामच होता. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अनामिका एका दुकानातून काही सामान घेत होती, त्याचवेळी तिच्या पतीने शोरुममध्ये घुसून तिच्यावर गोळ्या झाडल्या. ही संपूर्ण घटना फलोदीमधील नगौर याठिकाणी असलेल्या नारी कलेक्शन शोरुममध्ये घडली असून तिथल्या सीसीटीव्हीत हत्येची घटना कैद झाली आहे. अनामिकाच्या हत्येचा सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये अनामिकाचा पती शोरुममध्ये घुसून आधी पत्नीशी बोलण्याचा प्रयत्न करतो. मात्र अनामिका त्याला दुकानातून जाण्यास सांगतो. त्याचवेळी रागाच्या भरात पती तिच्यावर दोन-तीन गोळ्या झाडतो. या घटनेचा तपास राजस्थान पोलीस करत आहेत. अनामिकाच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर अनेकजण तिच्या अकाऊंटला सर्च आणि फॉलो करत आहेत. तिच्या निधनानंतर इन्स्टाग्राम फॉलोअर्सची संख्या काही हजारांनी वाढली आहे.

हे सुद्धा वाचा

अनामिकाला गोळ्या झाडल्यानंतर तिचा पती फरार झाला आहे. घटनेच्या 36 तासांनंतरही त्याला ताब्यात घेण्यास पोलिसांना यश मिळालं नाही. अनामिकाचं लग्न महिरामशी 13 वर्षांपूर्वी झालं होतं. मात्र गेल्या तीन वर्षांपासून अनामिका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनली आहे. तिची हीच गोष्ट पतीला पसंत नसल्याचं म्हटलं जात आहे. अनामिकाचा सोशल मीडियावर अन्नी बिश्नोई या नावाने अकाऊंट आहे. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत.

अनामिकाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे बरेच फोटो आणि व्हिडीओ पहायला मिळतात. राजस्थानमधील डान्स, भटकंती, पारंपरिक पोशाखातील विविध व्हिडीओ आणि फोटो तिने पोस्ट केले आहेत. सोशल मीडियावर तिच्या रिल्सना लाखो व्ह्यूज मिळायचे.

'...मी त्यांचा श्रीकृष्ण व्हायला तयार', अभिजीत बिचुकलेंचं मोठं वक्तव्य
'...मी त्यांचा श्रीकृष्ण व्हायला तयार', अभिजीत बिचुकलेंचं मोठं वक्तव्य.
शिंदेंचा लहान फोटो, धनुष्यबाण गायब, माजीमंत्र्याच्या जाहिरातीची चर्चा
शिंदेंचा लहान फोटो, धनुष्यबाण गायब, माजीमंत्र्याच्या जाहिरातीची चर्चा.
पतीकडून पत्नीची हत्या अन् बनवला व्हिडीओ... कारण ऐकून बसेल धक्का
पतीकडून पत्नीची हत्या अन् बनवला व्हिडीओ... कारण ऐकून बसेल धक्का.
नालासोपाऱ्यातील 41 इमारतींवर हातोडा, कित्येक कुटुंब बेघर
नालासोपाऱ्यातील 41 इमारतींवर हातोडा, कित्येक कुटुंब बेघर.
'बाळासाहेब नसते तर काय झालं असतं?' 'सामना' अग्रलेखात नेमकं काय म्हटलं?
'बाळासाहेब नसते तर काय झालं असतं?' 'सामना' अग्रलेखात नेमकं काय म्हटलं?.
'बाळासाहेबांना भारतरत्न द्या', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची मागणी
'बाळासाहेबांना भारतरत्न द्या', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची मागणी.
नितेश राणेंची सैफच्या हल्ल्यावर शंका, 'मला संशय, खरंच चाकू मारला की..'
नितेश राणेंची सैफच्या हल्ल्यावर शंका, 'मला संशय, खरंच चाकू मारला की..'.
ट्रम्पच्या नव्या धोरणामुळे अमेरिकेतील 20 हजार भारतीय मायदेशी परतणार?
ट्रम्पच्या नव्या धोरणामुळे अमेरिकेतील 20 हजार भारतीय मायदेशी परतणार?.
वाल्मिक कराडला आर्थर जेलमध्ये ठेवा, दमानियांची मागणी, तर जरांगे म्हणता
वाल्मिक कराडला आर्थर जेलमध्ये ठेवा, दमानियांची मागणी, तर जरांगे म्हणता.
Saif Ali Khan Attacked : 'सैफवर जीवघेणा हल्ला तर 'तो' इतका फिट कसा?'
Saif Ali Khan Attacked : 'सैफवर जीवघेणा हल्ला तर 'तो' इतका फिट कसा?'.