Bigg Boss 14 | बिग बॉसची ट्रॉफी कोण जिंकणार?, जाणून घ्या कुठे आणि कसे पाहाल ग्रँड फिनाले

'बिग बॉस 14' (Bigg Boss 14) आता अंतिम टप्प्यात आला आहे. आणि ग्रँड फिनाले होणार आहे. आता बिग बॉसच्या घरात असलेले रुबीना दिलैक, अली गोनी, राहुल वैद्य, राखी सावंत आणि निक्की तांबोळी फिनालेमध्ये पोहचले आहेत.

Bigg Boss 14 | बिग बॉसची ट्रॉफी कोण जिंकणार?, जाणून घ्या कुठे आणि कसे पाहाल ग्रँड फिनाले

मुंबई : ‘बिग बॉस 14’ (Bigg Boss 14) आता अंतिम टप्प्यात आले आहे आणि ग्रँड फिनाले होणार आहे. आता बिग बॉसच्या घरात असलेले रुबीना दिलैक, अली गोनी, राहुल वैद्य, राखी सावंत आणि निक्की तांबोळी फिनालेमध्ये पोहचले आहेत. या पाचपैकीच बिग बॉस 14 विजेता होणार आहे. चाहेत आपल्या आवडत्या सदस्याला जिंकवण्यासाठी प्रयत्न देखील करत आहेत. (Who will win the Bigg Boss trophy? Tomorrow will be the grand finale of Bigg Boss)

बिग बॉस 14 चा भव्य फिनाले रविवारी रात्री 9 वाजता होणार आहे. जर तुम्हाला ग्रँड फिनाले टिव्हीवर पाहाणे शक्य नसेल तर तुम्ही ग्रँड फिनाले मोबाईलवर देखील पाहू शकतात. तुम्हाला जर ग्रँड फिनाले मोबाईलवर बघायचा असेल तर जिओ टीव्ही अॅप तुम्हाला मोबाईलवर डाउनलोड करून घ्यावे लागेल मात्र, यासाठी तुमच्याकडं जियो क्रमांक असणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडं जियो क्रमांक नसेल तर तुम्ही वूट सिलेक्ट अॅप मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकतात.

देशाच्या कोणत्याही कोणात बसू आपण बिग बॉस 14 चा ग्रँड फिनाले बघू शकतो. या दोन्ही अॅपवर हा ग्रँड फिनाले लाईव दिसणार आहे. बिग बॉस संपण्यापूर्वी घरातील सर्व सदस्यांच्या बिग बॉसमधील सुरूवातीपासूनचा प्रवास घरातील सदस्यांना दाखवण्यात आला आहे. यावेळी घरातील सर्वजण भावूक झाले होते. यादरम्यान बिग बॉसने राखी सावंतला शोचे खरे एंटरटेमेंट म्हटले आहे.

राखीला बिग बॉस म्हणतात की, बिग बॉसची ओळख निर्माण करणारी व्यक्ती म्हणजे राखी सावंत आहे. राखी सावंतने खूप एंटरटेमेंट केलं आहे आणि इतर फक्त तिची कॉपी करतात. बिग बॉसचे हे बोलणे ऐकल्यानंतर राखी पुन्हा रडत म्हणते की, कोटि-कोटि प्रणाम बिग बॉस यानंतर रुबीनाचा प्रवास दाखविला जातो.

संबंधित बातम्या : 

Bigg Boss 14 | सलमान खानने राहुल वैद्य आणि अली गोनीला झापलं!

बिग बॉस-15ची घोषणा; होस्ट म्हणून सलमान खान घेणार इतकी मोठी रक्कम!

Bigg Boss 14 | राहुल वैद्यवर निक्की तांबोळी नाराज, वाचा काय घडलं

(Who will win the Bigg Boss trophy? Tomorrow will be the grand finale of Bigg Boss)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI