ज्या घरात लग्न केले तेच घर सोनाक्षी सिन्हाने का काढले विकायला? इतकी कोटी आहे किंमत
Sonakshi Sinha : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने मुंबईतील वांद्रे येथील एका आलिशान अपार्टमेंटमध्ये झहीर इक्बालसोबत लग्न केले. आता लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यांतच ती हे घर विकत असल्याच्या बातम्या येत आहेत.

सोनाक्षी सिन्हाने आपला मुंबईतील वांद्रे येथील आलिशान अपार्टमेंट विक्रीसाठी काढला आहे. तिने अचानक तिचे हे घर का विकायला काढले असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. ती घर का विकत आहे. जेव्हा तिने अलीकडेच त्याच अपार्टमेंटमध्ये अभिनेता झहीर इक्बालशी लग्न केले आहे. अपार्टमेंट विकणार असल्याची माहिती तेव्हा समोर आली जेव्हा घराचा व्हिडिओ रिअल इस्टेट इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला गेला. इंस्टाग्राम पोस्टमध्ये वांद्रे रेक्लेमेशनच्या प्रतिष्ठित 81 ओरियट इमारतीमधील एक आलिशान समुद्राभिमुख अपार्टमेंट असे अपार्टमेंटचे वर्णन केले आहे.
प्रशस्त 4200 चौरस फूट ओशनफ्रंट वॉक-इन अपार्टमेंट मूळत: 4 BHK आहे. जे डेकसह प्रशस्त 2 BHK मध्ये रूपांतरित केले गेले आहे. त्यात अनेक सुविधा आहेत. या अपार्टमेंटची किंमत आता २५ कोटी रुपये आहे. सोनाक्षीनेही ही पोस्ट ‘लाइक’ केली आहे.
यामुळे अभिनेत्रीच्या चाहत्यांमध्ये यामागचे कारण जाणून घेण्याची उत्सुकता वाढली आहे. अनेकांनी त्यांचे विचार कमेंट बॉक्समध्ये शेअर केले आहेत.सप्टेंबर 2023 मध्ये अशी बातमी आली होती की सोनाक्षीने बांद्रा रेक्लेमेशन, वांद्रे पश्चिम येथे 81 ओरियटच्या 26 व्या मजल्यावर एक अपार्टमेंट खरेदी केला आहे. तिची आई पूनम सिन्हा यांनी केलेल्या करारानुसार अपार्टमेंटचे कार्पेट एरिया 4,210.87 स्क्वेअर फूट आहे आणि त्याची किंमत 11 कोटी रुपये आहे. समुद्राभिमुख असलेल्या या घरातून माहीम खाडी आणि वांद्रे-वरळी सी लिंकचे दृश्य दिसते.
View this post on Instagram
सोनाक्षी सिन्हाच्या या आलिशान अपार्टमेंटची किंमतही पोस्टमध्ये नमूद करण्यात आली आहे. त्यानुसार हे घर 25 कोटींना विकण्यास तयार आहे. स्वतः सोनाक्षी सिन्हाने घर विकण्याबाबत सांगितलेले नाही. मात्र तिची ही पोस्ट लाईक करताना तिची बेस्ट फ्रेंड हुमा कुरेशीचा भाऊ साकिब सलीम याने प्रतिक्रिया दिली असून हे घर फक्त सोनाक्षीचेच असल्याचे स्पष्ट केले आहे. व्हिडिओवर कमेंट करताना अभिनेता साकिब सलीमने लिहिले – ‘मला ही इमारत माहित आहे.’
