जेव्हा ‘या’ निर्मात्याने छापली मनिषा कोईराला हिच्या निधनाची बातमी; बॉलिवूडमध्ये माजली होती खळबळ
आज मनिषा कोईराला बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी असते सर्वत्र चर्चेत. दिग्दर्शकाने अभिनेत्रीच्या मृत्यूची बातमी छापली, तेव्हा माजली होती सर्वत्र खळबळ... तेव्हा नक्की झालं तरी काय होतं.... 'तो' किस्सा तुम्हाला माहिती आहे?

मुंबई | 3 नोव्हेंबर 2023 : झगमगत्या विश्वात कधी काय होईल सांगता येत नाही. आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींच्या निधनाची बातमी इंटरनेटवर तुफान पसरली. ज्यामुळे सेलिब्रिटींना आणि त्यांच्या कुटुंबियांना अनेक गोष्टींचा सामना करावा लगला. पण एका निर्मात्याने अभिनेत्री मनिषा कोईराला जिवंत असताना तिच्या निधनाची बातमी छापली होती. ज्यामुळे अभिनेत्रीच्या चाहत्यांच नाही तर, संपूर्ण बॉलिवूडला मोठा धक्का बसला होता. कारण तेव्हा मनिषा बॉलिवूडच्या अव्वल अभिनेत्रींपैकी एक होती. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनावर आणि बॉलिवूडवर राज्य केलं. असं असताना निर्मात्याने तिच्या निधनाची बातमी का छापली असावी असा प्रश्न प्रत्येकाला पडला होता.
मनिषा हिच्या निधनाची बातमी छापणारे निर्माते दुसरे तिसरी कोणी नाही तर, मुकेश भट्ट् होते. त्यांनी सिनेमाच्या प्रमोशनसाठी इतका मोठा निर्णय घेतला होता. रिपोर्टनुसार, 1994 साली प्रदर्शित झालेल्या ‘क्रिमिनल’ सिनेमाच्या प्रमोशनसाठी मुकेश भट्ट यांनी मनिषा हिच्या निधनाची बातमी छापण्यापूर्वी कोणताही विचार केला नाही.
‘क्रिमिनल’ सिनेमासाठी मुकेश यांनी मोठा निर्णय घेतला. पण त्याचा कोणताही फायदा झाला नाही. अखेर सिनेमा बॉक्स ऑफिस फेल ठरला. एवढंच नाही तर, अशा प्रकारे सिनेमाचं प्रमोशन केल्यामुळे मुकेश भट्ट यांच्यावर टीका देखील करण्यात आली. मुकेश भट्ट यांनी छापलेल्या बातमीमुळे चाहत्यांसह सेलिब्रिटींना देखील मोठा धक्का बसला होता. पण मनिषा हिने यावर कधीही स्पष्टीकरण दिलं नाही.
‘क्रिमिनल’ सिनेमाचं दिग्दर्शन दिग्दर्शक महेश भट्ट यांनी केलं होतं. सिनेमात मनिषा कोईराला हिच्यासोबत, राम्या कृष्णन आणि जॉनी लीवर (Johnny Lever) यांनी मुख्य भूमिका साकारली होतीच. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मनिषा कोईराला हिची चर्चा रंगली आहे.
अभिनेत्री मनिषा काईराला आज बॉलिवूडपासून दूर एकटं आयुष्य जगत आहे. पैसा, प्रसिद्ध, संपत्ती सर्वकाही असताना देखील अभिनेत्रीला खरं प्रेम मिळालं नाही. अभिनेत्रीचं नाव अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं. पण कोणासोबत देखील अभिनेत्रीचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. अखेर अभिनेत्री एका उद्योजकासोबत लग्न केलं.
उद्योजकासोबत लग्न केल्यानंतर लग्नाच्या दोन वर्षात त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. ‘माझ्या आयुष्यात पुरुषाचं प्रेम नसतं…’ असं देखील अभिनेत्री एका मुलाखतीत म्हणाली होती.. आज अभिनेत्री बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते…
