AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CIDमधील ACP प्रद्युम्न यांचा प्रवास खरंच संपणार? शिवाजी साटम यांनीच सांगितलं सत्य…

CIDचे ACP प्रद्युम्न म्हणजेच शिवाजी साटम हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. सीआयडीमध्ये त्यांचा ट्रॅक आता बंद करणार असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे आता या शोमध्ये ACP प्रद्यूम्न दिसणार नाहीत. मात्र आता या बातम्यांबद्दल खुद्द ACP प्रद्यूम्न अर्थात शिवाजी साटम यांनी मौन सोडत प्रतिक्रिया दिली आहे. खरं काय तेही त्यांनी सर्वांना सांगितलं.

CIDमधील ACP प्रद्युम्न यांचा प्रवास खरंच संपणार? शिवाजी साटम यांनीच सांगितलं सत्य...
ACP प्रद्युम्न यांचा प्रवास खरंच संपणार?
| Updated on: Apr 05, 2025 | 10:56 AM
Share

CID मालिकेला वेगळ्या परिचयाची गरज नाही. सुमारे 20 वर्षांपासून सुरू असलेला हा प्रसिद्ध हिट थ्रिलर शो प्रत्येकाच्या आयुष्याचा एक भाग आहे. खरे तर या शोमधील सर्वच पात्रांचे लोकांच्या हृदयात स्वतःचे वेगळे स्थान आहे. पण प्रत्येक मुलाला सीआयडीचे एसीपी प्रद्युम्न हे खूप आवडतात. पण या मालिकेतील CIDचे ACP प्रद्युम्न म्हणजेच शिवाजी साटम यांच्या व्यक्तिरेखेचा ट्रॅक मालिकेमध्ये संपणार असल्याची अटकळ अलीकडे बांधली जात होती. या बातमीने चाहत्यांची निराशा झाली होती. मात्र आता यावर खुद्द शिवाजी साटम यांनीच या वृत्तांवर मौन सोडले आहे.

एका वृत्तपत्राशी बोलताना, शिवाजी साटम यांनी सीआयडीमध्ये एसीपी प्रद्युम्न यांच्या व्यक्तिरेखेचा ट्रॅक संपण्याबाबतच्या बातम्यावर प्रतिक्रिया दिली. माझा ट्रॅक संपणार आहे का, याबाबत मला कोणतीही माहिती नाही, असे शिवाजी साटम यांनी सांगितलं. मी शोमधून ब्रेक घेतला आहे आणि या शोमध्ये पुढे काय होईल हे मेकर्सनाच माहीत आहे. मी प्रत्येक गोष्ट माझ्या स्वभावानुसारही घ्यायला शिकलो आहे, आणि जर (मालिकेतला) माझा ट्रॅक संपला तरी मला काहीच प्रॉब्लेम नसेल, असंही त्यांनी नमूद केलं.

शिवाजी साटम यांचा CID तून ब्रेक

सीआयडी सुरू झाल्यापासूनचया शोचा एक भाग असलेले शिवाजी साटम म्हणाले की, मला ट्रॅकच्या शेवटाविषयी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. ते सध्या शोचे शूटिंग करत नाहीयेत. शिवाजी साटम यांच्या सांगण्यानुसार, त्यांनी सध्या त्यांच्या मुलासोबत वेळ घालवण्यासाठी मे महिन्यात सुट्टी घेतली आहे. गेल्या 22वर्षांपासून मी एसीपी प्रद्युम्न यांची भूमिका साकारण्याचा आनंद घेत आहे, मला या मालिकेने बरंच काही दिलं, असं ते म्हणाले.

कुटुंबासह घालणावर वेळ

सध्या मी फक्त ब्रेक घेतला आहे आणि माझ्या आयुष्याचा आनंद लुटणार आहे. मी कठोर परिश्रम केले आहेत आणि प्रत्येकाजण विश्रांतीसाठी पात्र असतो, असं त्यांनी सांगितलं. आता माझं पात्र (एसीपी प्रद्युम्न) हे मालिकेत पुन्हा दिसेल की नाही याबाबत मला खात्री नाही, असं त्यांनी नमूद केलं. एका रिपोर्टनुसार, सीआयडीमध्ये बॉम्बस्फोटानंतर मृत्यू झाल्यानंतर शिवाजी साटम यांचं एसीपी प्रद्युम्न यांच्या पात्राचा ट्रॅक (मालिकेत) संपणार आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा