अमिताभ बच्चन गंभीर आजाराच्या विळख्यात अडकलेले तेव्हा…, उठणं – बसणं झालेलं कठीण, आजाराचं नाव सांगत म्हणाले…
महानायक अनेक आरोग्याच्या समस्या आहेत.. पण जेव्हा ते गंभीर आजाराच्या विळख्यात अडकले होते, तेव्हा त्यांना उठणं - बसणं कठीण झालेलं... अनेक महिने उपचार केल्यानंतर अखेर..., बिग बी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असतात चर्चेत

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन 83 वर्षांचे झाले आहे. पण आज देखील बिग बी त्याच उत्साहाने काम करतात. अमिताभ बच्चन आजच्या पिढीसाठी एका प्रेरणेपेक्षा कमी नाही… आज देखील अमिताभ बच्चन यांना मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. पण सर्वांचं मनोरंजन करणारे बिग बी अनेक आजारांनी ग्रासलेले आहे.. पण त्याचा परिणाम कधीच त्यांनी स्वतःच्या कामावर होऊ दिला नाही. बिग बींना अनेक आरोग्याच्या समस्या आहे… पण एक काळ असा होता, जेव्हा अमिताभ बच्चन गंभीर आजाराचा सामना करत होते. टीबी सारख्या गंभीर आजारावर अमिताभ बच्चन यांनी मात केली आहे. याबद्दल स्वतः अमिताभ बच्चन यांनी मोठा खुलासा केलेला. अनेक महिने उपचार घेतल्यानंतर अमिताभ बच्चन यांची प्रकृती स्थिर झाली. 2000 मध्ये अमिताभ बच्चन यांनी टीबीची लागण झालेली.
अमिताभ बच्चन यांनी अनेक वर्षांपूर्वी ‘जागतिक टीबी दिना’च्या दिवशी त्यांच्या गंभीर आजाराची कहाणी सांगितली होती. अमिताभ बच्चन यांना मणक्यात टीबी झालेला. ज्यामुळे त्यांना प्रचंड वेदना सहन कराव्या लागल्या, अमिताभ बच्चन म्हणाले, ‘2000 मध्ये मला टीबी आजार झालेला. मी जवळपास वर्षभर कठोर उपचार घेतले. ज्या दिवशी मी ‘कौन बनेगा करोडपती’ शो सुरू करणार होतो, मला पाठीच्या कण्याचा टीबी होता. तो खूप वेदनादायी होता.’ असं बिग बी म्हणालेले.
पुढे अमिताभ बच्चन म्हणालेले, ‘मला उठता देखील येत नव्हतं आणि झोपता देखील येत नव्हतं. दिवसाला मी 8 – 10 गोळ्या खात होतो… मला कोणत्याही प्रकारे फक्त जिवंत राहायचं होतं… अनेक लोक मला विचारतात वैद्यकीय कर्यात का पुढाकार घेता… तर माझा स्वतःचा वैद्यकिय इतिहास आहे… मी टीबीच्या कामात सहभागी होण्याचं एक मुख्य कारण म्हणजे, मी स्वतः त्यातून बाहेर आलोय आणि बरा झालोय…’
याच वेळी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या चाहत्यांना मोठा सल्ला दिला आहे.. टीबीया आजाराकडे गांभीर्याने लक्ष द्या… या आजारावर उपचार घेण्यास मागे पुढे पाहू नका… लवकर उपचार होणं फार गरजेचं आहे… सांगायचं झालं तर, अमिताभ बच्चन यांच्यासारख्या अनेकांनी टीबी सारख्या गंभीर आजारावर मात दिली आहे… हा आजार बरा होणारा आहे.. असं देखील बिग बी म्हणालेले.
