AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कथा रुपात ऐकता येणार यशवंतराव चव्हाणांचे ‘कृष्णाकाठ’, प्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या भारदस्त आवाजात होणार रेकॉर्ड!

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र ‘कृष्णाकाठ’ आणि त्यांनी विविध प्रसंगांच्या निमित्ताने दिलेल्या भाषणांचा संग्रह असणारे ‘भूमिका’ हे पुस्तक स्टोरीटेलवर एकाचवेळी प्रकाशित होत आहे.

कथा रुपात ऐकता येणार यशवंतराव चव्हाणांचे ‘कृष्णाकाठ’, प्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या भारदस्त आवाजात होणार रेकॉर्ड!
कृष्णाकाठ
| Updated on: Apr 30, 2021 | 5:07 PM
Share

मुंबई : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan)यांचे आत्मचरित्र ‘कृष्णाकाठ’ आणि त्यांनी विविध प्रसंगांच्या निमित्ताने दिलेल्या भाषणांचा संग्रह असणारे ‘भूमिका’ हे पुस्तक स्टोरीटेलवर एकाचवेळी प्रकाशित होत आहे. एक मे रोजी साजऱ्या केल्या जाणाऱ्या 60व्या महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ही दोन्ही ऑडिओबुक्स रोहन प्रकाशनाच्या सहकार्याने रसिकांसाठी ‘स्टोरीटेल’वर सादर केली जाणार आहेत. सुप्रसिध्द अभिनेते सचिन खेडेकर (Sachin Khedekar) यांनी या दोन्ही पुस्तकांचे अभिवाचन केले आहे (Yashwantrao Chavan biography Krishnakath audiobooks on storytel).

यशवंतराव चव्हाण यांचे ‘कृष्णाकाठ’ हे आत्मचरित्र मराठी साहित्यातील एक महत्वाचा ठेवा मानला जातो. सातारा जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातून कार्यकर्ता म्हणून आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरूवात करून महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून मंगलकलश आणण्याचा मान मिळवणारे आणि भारताचे उपपंतप्रधानपदी पोहचणारे यशवंतराव चव्हाण यांची राज्यातील आणि केंद्रातील कारकीर्द अतिशय प्रेरणादायी आहे. त्यांच्या आत्मचरित्रातुन महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय आणि स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास समजतो. तसेच ग्रामीण भागातील तरूणांना सामाजिक व राजकीय कार्याची प्रेरणाही मिळते.

ऐकायला मिळणार यशवंतरावांचे दूरगामी विचार

‘भूमिका’ या पुस्तकात यशवंतराव चव्हाण यांनी विविध ठिकाणी दिलेल्या भाषणांचा संग्रह आहे. ही भाषणे ऐकताना महाराष्ट्राच्या विकासाबद्दलचे यशवंतराव यांचे चिंतन आणि विचार किती दूरगामी होते याचे दर्शन घडते. महाराष्ट्रातील शैक्षणिक, राजकीय आणि सामाजिक विकासावर यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा मोठा पगडा आहे. त्यामुळे आजही महाराष्ट्रातील प्रश्नांबद्दल भूमिका घेताना हे पुस्तक मार्गदर्शनपर ठरते (Yashwantrao Chavan biography Krishnakath audiobooks on storytel).

वाचायला वेळ नाही? हरकत नाही..

‘स्टोरीटेल’च्या निमित्ताने मराठीतच नव्हे तर सर्व भारतीय भाषांमध्ये ऑडिओबुक्सची निर्मिती केली जात आहे आणि त्याला साहित्यप्रेमी वाचक श्रोत्या रसिकांचा अमाप प्रतिसाद मिळू लागला आहे. गुगलप्ले स्टोअर किंवा ॲपस्टोअरवर जाऊन ‘स्टोरीटेल’ हे ॲप सहज डाऊनलोड करता येते किंवा www.storytel.com या वेबसाईटवर जाऊन हे ॲप डाऊनलोड करणे खूपच सोपे आहे. ऑडिओबुक्स कुठेही, कितीही व कधीही ऐकता येतात. ‘यशवंतराव चव्हाण’ यांची ऑडिओबुक्स ऐकण्यास सुरूवात करून खऱ्या अर्थाने ‘महाराष्ट्र दिन’ साजरा करता येईल, असे ‘स्टोरीटेल’च्या संस्थापकांनी म्हटले आहे.

(Yashwantrao Chavan biography Krishnakath audiobooks on storytel)

हेही वाचा :

ऋषी कपूर यांच्या आठवणीने नीतू कपूर झाल्या भावूक, म्हणाल्या ‘तुमच्याशिवाय आयुष्य आता…’

Dil De Diya : ‘दिल दे दिया’ गाणं प्रदर्शित!, जॅकलिन आणि सलमान खानचा ऑनस्क्रिन जलवा

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.