AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

The Kerala Story | फेम अभिनेत्रीच्या वडिलांना सतावतेय मुलीची चिंता; म्हणाली “माझे वडील घाबरून..”

द केरळ स्टोरी या चित्रपटावर पश्चिम बंगालमध्ये बंदी घालण्यात आली आहे. त्याचप्रमाणे तमिळनाडूमध्येही चित्रपटाविरोधात निदर्शनं झाली. "निर्माते त्यासाठी लढणार आहेत. ज्या लोकांना खरंच हा चित्रपट पाहायचा आहे, त्यांना तो पहायला मिळू दे एवढीच माझी इच्छा आहे", असं ती म्हणाली.

The Kerala Story | फेम अभिनेत्रीच्या वडिलांना सतावतेय मुलीची चिंता; म्हणाली माझे वडील घाबरून..
the kerala story
| Updated on: May 13, 2023 | 7:55 AM
Share

मुंबई : ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करतोय. यामध्ये अदा शर्मासोबतच योगिता बिहानी, सिद्धी इदनानी, सोनिया बलानी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. यापैकी योगिकाने तिच्या करिअरची सुरुवात टेलिव्हिजनपासून केली. त्यानंतर ती चित्रपटांकडे वळली. ‘एके वर्सेस एके’ आणि ‘विक्रम वेधा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने भूमिका साकारल्या आहेत. आता ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटातील तिच्या अभिनयाचं कौतुक होत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत योगिता तिच्या प्रवासाविषयी आणि चित्रपटानंतर कुटुंबीयांच्या प्रतिक्रियेविषयी व्यक्त झाली.

“मी आणि अदा याविषयी बोलत होतो. आम्ही फार प्रामाणिकपणे हा चित्रपट बनवला आहे. आमच्यासाठी हा जणू एक कॉलेज प्रोजेक्ट होता. तो आम्ही मेहनतीने बनवल्यानंतर सुपूर्द केला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहून आम्ही थक्क आहोत”, असं ती म्हणाली. एकीकडे बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई होत असतानाच दुसरीकडे ठराविक वर्गाकडून चित्रपटाला विरोध होत आहे.

‘द केरळ स्टोरी’वरून सुरू असलेल्या वादामुळे वडिलांना फार चिंता वाटते आणि त्यामुळेच मी त्यांना फक्त सकारात्मक गोष्टीच सांगते, असंही ती म्हणाली. “माझे वडील माझ्यासाठी घाबरलेले आहेत. या वादामुळे ते सतत मला विचारतात की तू ठीक आहेस का? त्यांची चिंता पाहून मी त्यांना फक्त सकारात्मक गोष्टीच सांगते. सर्वकाही ठीक होईल असं मी त्यांना आश्वासन देते”, असं योगिताने सांगितलं. इतकंच नव्हे तर कुटुंबीयांना चित्रपट दाखवण्याआधी त्यांना नीट समजावं लागलं होतं, असंही ती म्हणाली.

‘द केरळ स्टोरी’ला प्रचारकी म्हणणाऱ्यांनाही योगिताने उत्तर दिलं. “आम्ही हा चित्रपट या तीन मुलींची कथा सांगण्यासाठी बनवला आहे. आम्हाला लोकांमध्ये ही जागरूकता निर्माण करायची आहे की असं काही होऊ शकतं. त्या घटनेतून ज्यांची सुटका झाली किंवा ज्यांनी त्रास सहन केला, त्यांना आम्हाला सक्षम बनवायचं आहे. आम्ही तुमचं ऐकतोय आणि तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी इथे आहोत, याची त्यांना खात्री द्यायची आहे. याव्यतिरिक्त जे लोकांना वाटतं, त्याचं उत्तर मी देऊ शकत नाही. कारण या चित्रपटाचा तो अजेंडाच नाही. प्रत्येकाची मतं वेगवेगळी असतात आणि आम्ही त्यांचा आदर करतो. जर त्यांना चित्रपट पाहायचा असेल तर ते पाहतील. जर पाहायचा नसेल, तरीसुद्धा आम्ही त्यांचा आदर करतो. आम्ही इतरांची मतं बदलू शकत नाही. पण हा चित्रपट आम्ही का बनवला, याबद्दल आम्हाला स्पष्टता आहे. आम्हाला फक्त आमच्या मुलींना वाचवायचं आहे”, असं उत्तर योगिताने दिलं.

द केरळ स्टोरी या चित्रपटावर पश्चिम बंगालमध्ये बंदी घालण्यात आली आहे. त्याचप्रमाणे तमिळनाडूमध्येही चित्रपटाविरोधात निदर्शनं झाली. “निर्माते त्यासाठी लढणार आहेत. ज्या लोकांना खरंच हा चित्रपट पाहायचा आहे, त्यांना तो पहायला मिळू दे एवढीच माझी इच्छा आहे”, असं ती म्हणाली.

Follow Us
अंधारेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; रंग बदलू फडणवीस! म्हणत बावनकुळे...
Sushma Andhare on Bawankule | सुषमा अंधारेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; रंग बदलू फडणवीस! म्हणत बावनकुळे अन् मोदींनाही घेरलं
माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
BJP Protest Against Amit Thackeray : माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
50 लाखांच्या फॉर्च्युनर, HSRP प्लेट नाही! पडळकरांच्या गाड्यांवरून वाद
Gopichand Padalkar | 50 लाखांच्या फॉर्च्युनर, पण HSRP प्लेट नाही! गोपीचंद पडळकरांच्या गाड्यांवरून नवा वाद; व्हिडीओ होतोय व्हायरल
सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सौरभ दास यांची घोषणा
CJP Protest | सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर सौरभ दास यांची मोठी घोषणा
बुरखा घातलेल्या महिलांना कूपर रुग्णालयाने प्रवेश नाकारला...
Mumbai Hospital | बुरखा घातलेल्या महिलांना कूपर रुग्णालयाने प्रवेश नाकारला? व्हिडीओ व्हायरल; प्रशासन म्हणतं, रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न...
देवेंद्र फडणवीस फक्त एका जातीचे मुख्यमंत्री आहेत का? हाकेंचा थेट सवाल
Laxman Hake | देवेंद्र फडणवीस फक्त एका जातीचे मुख्यमंत्री आहेत का? लक्ष्मण हाकेंचा थेट सवाल; ओबीसी आरक्षणावरून घमासान
महागाई-बेरोजगारी-भ्रष्टाचार… राज्य चालवायला सरकार अपयशी ठरलंय का?
Supriya Sule | महागाई-बेरोजगारी-भ्रष्टाचार… राज्य चालवायला सरकार अपयशी ठरलंय का?; सुप्रिया सुळे यांचा सरकारला थेट सवाल
ऑपरेशन टायगर तुम्हाला सांगून होणार नाही! उदय सामंतांचा सूचक इशारा
Uday Samant | ऑपरेशन टायगर तुम्हाला सांगून होणार नाही! उदय सामंतांचा सूचक इशारा; महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या उलथापालथीचे संकेत
मंत्रिमंडळ बैठकीला एकनाथ शिंदेंची दांडी; थेट दिल्लीला रवाना
Cabinet Meeting Update | मंत्रिमंडळ बैठकीला एकनाथ शिंदेंची दांडी; थेट दिल्लीला रवाना, सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीपूर्वी मोठी खलबतं!
सुभाष चंद्रा यांना मोठा झटका! 22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरील...
Subhash Chandra | सुभाष चंद्रा यांना मोठा झटका! 22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरील NCLTचा आदेश रद्द