प्रसिद्ध यूट्यूबर भूवन बामला कोरोनाची लागण, कोरोनाला सहज न घेण्याचं आवाहन

प्रसिद्ध यूट्यूबर भूवन बामला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन त्याने ही माहिती दिली आहे. भूवनची प्रकृती मागील काही दिवसांपासून ठीक नव्हती.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 23:20 PM, 1 Nov 2020

मुंबई : प्रसिद्ध यूट्यूबर भूवन बामला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन त्याने ही माहिती दिली आहे. भूवनची प्रकृती मागील काही दिवसांपासून ठीक नव्हती. कोरोनाची लक्षणं आढळल्यामुळे त्याने स्वत:ची चाचणी करुन घेतली. त्यानंतर त्याला कोरोनाची लागण झाल्याचं समजलं. (youtuber bhuvan bam tested corona positive)

भूवन बामने कोरोना झाल्याची माहिती इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन दिली आहे. त्याला कोरोनाची लागण झाल्याचे समजल्यानंतर त्याने आपल्या चाहत्यांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. तसेच करोनाला सहज घेऊ नका; मास्क वापरा. हात, शरीर वेळोवेळी सॅनिटाईझ करा असंदेखील त्याने सांगितलं आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचा सल्लही त्याने त्याच्या चाहत्यांना दिला आहे.

 

दरम्यान, भूवन बाम यूट्यूबच्या दुनियेतलं एक नावाजलेलं नाव आहे. त्याच्या ‘बिबी की वाईन्स’ या यूट्यूब चॅनेलला लाखोंच्या संख्येने सबस्क्राईबर्स आहेत. भूवन एक चांगला गायकही आहे. हीर रांझा, सफर, बस मै अशी काही गितं त्याने स्वत: गायली असून या गाण्यांनादेखील मोठ्या प्रमाणात लाईक्स आहेत. आपल्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून त्याला चांगली प्रसिद्धी मिळालेली आहे. यूट्यूबमार्फत तो चांगले पैसेदेखील कमवतो.

संबंधित बातम्या :

Good News : अमृता राव बनली आई, गोंडस मुलाला दिला जन्म

जेम्स बाँड साकारणारे शॉन कॉनरी काळाच्या पडद्याआड

Bigg Boss 14 | ‘बिग बॉस’च्या घरात पवित्रा पुनियाच्या एकतर्फी प्रेमाची चर्चा!

(youtuber bhuvan bam tested corona positive)