Good News : अमृता राव बनली आई, गोंडस मुलाला दिला जन्म

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, आई आणि मूल दोघेही बरे आहेत.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 23:00 PM, 1 Nov 2020

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अमृता राव आई झाली आहे. तिने एका गोड मुलाला जन्म दिला आहे. रविवारी सकाळी अमृताने एका गोड बाळाला जन्म दिला. यावेळी तिचा नवरा आरजे अनमोल हा पूर्ण वेळ तिच्यासोबत ऑपरेशन थिएटरमध्ये हजर होता. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, आई आणि मूल दोघेही बरे आहेत. (amrita rao gave birth to baby boy rj anmol become parents)

अमृताने स्वतः एक फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांना आपण गर्भवती असल्याची आनंदाची बातमी दिली होती. त्यानंतर आज तिला मुलगा झाला आहे. अमृताने गर्भवती असल्याची बातमी चाहत्यांना अगदी 9 महिन्यात दिली होती. आतापर्यंत अमृताने ही बातमी लपवली होती, मात्र अखेर व्हायरल झालेल्या फोटोनंतर तिने स्वतःच याचा खुलासा केला.

अमृताने आपला पती आरजे अनमोलसोबत एक फोटो शेअर केला होता. यात तिने म्हटलं होतं की, ‘तुमच्यासाठी हा 10 वा महिना आहे, पण आमच्यासाठी हा 9 वा महिना आहे. सरप्राईज, सरप्राईज, सरप्राईज… अनमोल आणि मी आमच्या नवव्या महिन्यात आहोत.’

आपली एक्साईटमेंट सांगताना अमृताने सांगितलं होतं, ‘हो गुडन्यूज माझ्या चाहत्यांना आणि मित्रांना सांगताना मी खूप एक्सायटेड आहे. इतके दिवस ही बातमी पोटात लपवून ठेवण्यासाठी सॉरी, पण हे खरं आहे. लवकरच बाळ येणार आहे’. असं तिने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं होतं आणि आज तिने एका गोड मुलाला जन्म दिला आहे.

प्रेग्नंसीप्रमाणेच अमृताने आपलं लग्न देखील असंच सिक्रेट ठेवलं होतं. त्यांनी 2016 मध्ये आरजे अनमोलसोबत अगदी मोजक्या जवळच्या लोकांच्या उपस्थितीत लग्न केलं होतं. लग्नाआधी दोघांनी एकमेकांना जवळपास 7 वर्षे डेट केलं होतं. अमृताने 2002 मध्ये ‘अब के बरस’ या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. हा चित्रपट हिट झाला नाही, मात्र अमृताने आपल्या अभिनयातून सर्वांची मनं जिंकली.

इतर बातम्या –

ICICI बँकेच्या नफ्यामध्ये मोठी वाढ, कोरोनाच्या संकटातही 6 पटीनं झाला फायदा

हेल्मेट न घातल्याने पोलिसांनी फाडली 2 मीटर लांब पावती, दंडाची रक्कम पाहून हादराल

(amrita rao gave birth to baby boy rj anmol become parents)