AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विराट कोहलीची खिल्ली उडवणं युट्यूबरला पडलं महागात; द्यावं लागलं स्पष्टीकरण

क्रिकेटर विराट कोहलीची खिल्ली उडवणं एका प्रसिद्ध युट्यूबरला चांगलंच महागात पडलं आहे. ट्रोलिंगनंतर अखेर त्याने स्पष्टीकरण दिलं आहे. या युट्यूबरने त्याच्या एका स्किटमध्ये विराटची खिल्ली उडवल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलंय.

विराट कोहलीची खिल्ली उडवणं युट्यूबरला पडलं महागात; द्यावं लागलं स्पष्टीकरण
Virat KohliImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 24, 2024 | 12:56 PM
Share

देशातील सर्वांत मोठा युट्यूबर अजय नागर उर्फ कॅरी मिनाटीला सध्या सोशल मीडियावर खूप ट्रोल केलं जातंय. कारण हे प्रकरण क्रिकेटर विराट कोहलीशी संबंधित आहे. कॅरी मिनाटीने नुकत्याच त्याच्या एका व्हिडीओमध्ये विराटची खिल्ली उडवली होती. त्यानंतर आरसीबीचे (RCB) चाहते त्याच्या विरोधात उभे राहिले. ट्विटरवर ‘Shame on Carryminati’ ट्रेंड होऊ लागलं. या ट्रोलिंगनंतर अखेर युट्यूबरला स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे. एक्सवर (ट्विटर) कॅरी मिनाटीचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये कॅरी म्हणतोय, “विराटने यासाठी गोड खाणं बंद केलंय कारण त्याला कधीच सेलिब्रेट करण्याची संधी मिळत नाही. रोहितकडे पहा, जेव्हा माणूस जिंकतो तेव्हा त्याला डाएट करण्याची गरजच पडत नाही. विराट तू ऐकतोयस ना.” या व्हिडीओवरून विराट आणि RCB चे चाहते प्रचंड नाराज झाले आहेत. त्यांनी कॅरी मिनाटीला ट्रोल करत त्याला माफी मागण्यास सांगितलं आहे. अखेर वाढती ट्रोलिंग पाहता कॅरी मिनाटीने पोस्ट लिहित स्पष्टीकरण दिलं आहे.

कॅरी मिनाटीचं स्पष्टीकरण-

‘मी आताच ट्विटर पाहिलं तर समजलं की लोकांचा थोडा गैरसमज झाला आहे. मी एक शो करतोय आणि त्यामधील एका स्किटवरून लोक रागावले आहेत. मात्र संपूर्ण प्रकरण समजून घेण्यासाठी कृपया तो स्किट पूर्ण पहा. मी खऱ्या आयुष्यात विराट कोहलीचा अनादर का करेन? तो फक्त एक स्किट होता आणि त्याचा उद्देश कोणाचाही अनादर करण्याचा नव्हता. आम्ही काही भूमिका साकारत होतो आणि त्यात मी RCB च्या पॅरडीची भूमिका साकारतोय. यापेक्षा अधिक काहीच नाही. त्याच स्किटमधील माझा हा क्लिप इथे शेअर करतोय, ज्यामध्ये मी त्याचा चाहता आहे. बाकी तुमची मर्जी, तुम्ही प्रेक्षक आहात, मला तुमच्याशी जिंकायचं नाहीये’, असं त्याने स्पष्ट केलंय.

कॅरीमिनाटी या नावाने प्रसिद्ध असलेल्या या युट्यूबरचं खरं नाव अजय नागर आहे. तो युट्यूबर, स्ट्रीमर आणि रॅपरसुद्धा आहे. इतरांना रोस्ट करणारे व्हिडीओ, कॉमेडी स्किट्स यांसाठी तो ओळखला जातो. याआधीही कॅरीमिनाटीचे काही व्हिडीओ वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. नियम मोडल्याने युट्यूबने त्याचे व्हिडीओ काढून टाकले होते.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.