AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुस्लीम असून हिंदू पद्धतीनुसार आईवर अंत्यसंस्कार का? अखेर जायेद खानने सोडलं मौन

सुझान खान आणि जायेद खान यांची आई झरीन खान यांचं गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात निधन झालं होतं. त्या मुस्लीम असून त्यांच्या पार्थिवावर हिंदी रितीरिवाजानुसार अंत्यसंस्कार पार पडण्यात आले होते. यावर अखेर जायेदने मौन सोडलं आहे.

मुस्लीम असून हिंदू पद्धतीनुसार आईवर अंत्यसंस्कार का? अखेर जायेद खानने सोडलं मौन
जायेद खान, झरीन खानImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 30, 2026 | 1:11 PM
Share

गेल्या वर्षी इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेत्री जरीन खान यांचं मुंबईतल्या राहत्या घरी निधन झालं. त्यानंतर त्यांचा मुलगा आणि अभिनेता जायेद खानने हिंदू पद्धतीनुसार त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. या अंत्यसंस्काराचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावरून काही नेटकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले. मुस्लीम असून हिंदी पद्धतीनुसार का अंत्यसंस्कार केले, असा सवाल नेटकऱ्यांनी केला. त्यावर अखेर जायेदने मौन सोडलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो त्याच्या आईची अंतिम इच्छा सांगताना भावूक झाला होता.

‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत जायेद म्हणाला, “आमचं कुटुंब धर्माला खूपच खासगी मानतं आणि त्याकडे पाहण्याकडे प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगळा असतो. कोणतं उत्तम आणि कोणतं वाईट.. असं त्यात नसतं. या अशा गोष्टी आहेत, ज्यावर चर्चा करणं योग्य नाही. आम्ही स्वत:ला एक धर्मनिरपेक्ष कुटुंब मानतो आणि का मानतो हे सांगण्याची गरज मला वाटत नाही.” आईच्या अंतिम इच्छेविषयी खुलासा करताना त्याने त्या दिवसाच्या आठवणींना उजाळा दिला, जेव्हा जरीन खान एका सुंदर नदीकिनारी बसल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या मनात विचार आला होता की, “जेव्हा मी हे जग सोडून जाईन, तेव्हा माझी राख याच नदीत वाहिली जावी. मला मुक्त व्हायचं आहे.” हा विचार त्यांनी मुलांसमोर मांडला होता.

View this post on Instagram

A post shared by ZAYED KHAN (@itszayedkhan)

आईच्या शेवटच्या इच्छेला प्राधान्य देत जायेद स्पष्टपणे म्हणाला, “आपल्या आईची शेवटची इच्छा काहीही असो, ती पूर्ण करणं हे आपलं कर्तव्य आहे. जग काय म्हणतं किंवा लोकांनी कितीही द्वेष पसरवला, तरी त्याने काही फरक पडत नाही. मी त्यांना दोष देत नाही. कारण सध्याची परिस्थितीच तशी आहे. दुर्दैवाने ती बदलायलाही वेळ लागेल. जेव्हा एखाद्याच्या शेवटच्या इच्छेचा प्रश्न येतो, तेव्हा धर्मापेक्षा माणुसकी आणि प्रेम अधिक महत्त्वाचं ठरतं. आमच्या घरात माणुसकी हाच सर्वांत मोठा धर्म आहे.”

यावेळी जायेदने असंही स्पष्ट केलं की, त्यांच्या घरातील नोकरचाकर वेगवेगळ्या धार्मिक, आर्थिक पार्श्वभूमीतून आलेले आहेत आणि त्यांचं कुटुंब केवळ त्यांच्या उदरनिर्वाहाची किंवा जेवणाचीच काळजी घेत नाही, तर त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि भविष्यासाठीही सर्वतोपरी मदत करतं.

7 नोव्हेंबर 2025 रोजी जायेद खान आणि सुझान खान यांची आई जरीन खान यांचं निधन झालं होतं. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. त्या पारशी वंशाच्या असूनही जायेदने त्यांच्या अंतिम इच्छेचा आदर करत हिंदू रितीरिवाजानुसार त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा