Ananth Chaturdashi 2019 : पुण्यात मानाच्या पाचही गणपतीचे जल्लोषात विसर्जन

पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण झाली आहे (Ananth Chaturdashi 2019). विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांनी कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे (Pune Ganesh Visarjan). सकाळी दहा वाजता गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे.

Ananth Chaturdashi 2019, Ananth Chaturdashi 2019 : पुण्यात मानाच्या पाचही गणपतीचे जल्लोषात विसर्जन

पुणे : मुंबईप्रमाणेही पुण्यातही मोठ्या भक्तीमय वातावरणात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप (Ananth Chaturdashi 2019) देण्यात आला. पुण्यातील पहिल्या पाच गणपतींची आरती झाली. त्यानंतर पुण्यातील पहिल्या पाचही गणपतींच्या आरतीनंतर या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. या विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांनी कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे (Pune Ganesh Visarjan). विसर्जन मिरवणुकीत तब्बल सात हजारांपेक्षा जास्त पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता (Pune Police Bandobast).

पुण्यातील मानाचे पाच गणपती

मानाचा पहिला गणपती : श्री कसबा गणपती

मानाचा दुसरा गणपती : श्री तांबडी जोगेश्वरी गणपती

मानाचा तिसरा गणपती : श्री गुरुजी तालीम गणपती

मानाचा चौथा गणपती : श्री तुळशीबाग गणपती

मानाचा पाचवा गणपती : श्री केसरी गणपती

गणपती विसर्जन मिरवणूक लाईव्ह अपडेट

Ananth Chaturdashi 2019, Ananth Chaturdashi 2019 : पुण्यात मानाच्या पाचही गणपतीचे जल्लोषात विसर्जन

पुण्यातील मानाच्या पाचव्या गणपतीचे विसर्जन दिमाखात पार

पुण्यातील पाचवा केसरी गणपतीचे केसरीवाडा येथे विसर्जन, पालिकेने तयार केलेल्या कृत्रिम हौदात केसरी गणपतीचे निर्विघ्न विसर्जन पार

12/09/2019,6:24PM
Ananth Chaturdashi 2019, Ananth Chaturdashi 2019 : पुण्यात मानाच्या पाचही गणपतीचे जल्लोषात विसर्जन

पुण्यातील चौथ्या मानाच्या श्री तुळशीबाग गणपतीचे पर्यावरणपूरक विसर्जन

मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपतीचे पांचाळेश्वर घाटावर विसर्जन, कृत्रिम हौदात तुळशीबाग गणपतीचे विसर्जन

12/09/2019,6:19PM
Ananth Chaturdashi 2019, Ananth Chaturdashi 2019 : पुण्यात मानाच्या पाचही गणपतीचे जल्लोषात विसर्जन

पुण्यातील तिसऱ्या मानाच्या श्री गुरुजी तालीम गणपतीचे पर्यावरणपूरक विसर्जन

पुण्यातील तिसरा मानाचा गणपती श्री गुरुजी तालीम गणपतीचे विसर्जन, पालिकेने तयार केलेल्या कृत्रिम हौदात संध्याकाळी 6 च्या दरम्यान विसर्जन

12/09/2019,6:18PM
Ananth Chaturdashi 2019, Ananth Chaturdashi 2019 : पुण्यात मानाच्या पाचही गणपतीचे जल्लोषात विसर्जन

पुण्यातील दुसऱ्या मानाच्या गणपतीचे दिमाखात विसर्जन

पुण्यातील दुसरा मानाचा गणपती तांबडी जोगेश्वरी गणपतीचे विसर्जन, दरवर्षीप्रमाणे यंदाही विसर्जन मिरवणूक उत्साहात पार

12/09/2019,5:24PM
Ananth Chaturdashi 2019, Ananth Chaturdashi 2019 : पुण्यात मानाच्या पाचही गणपतीचे जल्लोषात विसर्जन

पुण्यातील मानाच्या पहिल्या गणपतीचे विसर्जन

पुण्यातील पहिला मानाचा गणपती कसबा गणपतीचे पर्यावरणपूरक विसर्जन, मुठा नदीपात्रात पालिकेने तयार केलेल्या कृत्रिम हौदात संध्याकाळी 4.30 च्या दरम्यान विसर्जन, विसर्जनापूर्वी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते कसबा गणपतीची आरती

12/09/2019,5:18PM
Ananth Chaturdashi 2019, Ananth Chaturdashi 2019 : पुण्यात मानाच्या पाचही गणपतीचे जल्लोषात विसर्जन

गणपती विसर्जनासाठी 210 ठिकाणी व्यवस्था

पुणे : गणपती विसर्जनासाठी 210 ठिकाणी व्यवस्था, मुळा मुठा नदीवरील 18 घाटांवर विसर्जनाची व्यवस्था, 46 हौद आणि 82 पाण्याच्या टाक्यांची सुविधा, 275 सुरक्षारक्षक आणि 130 जीवरक्षक नदीपात्रात तैनात, पालिकेच्या 15 क्षेत्रीय कार्यालयातील यंत्रणा कार्यरत

12/09/2019,11:39AM
Ananth Chaturdashi 2019, Ananth Chaturdashi 2019 : पुण्यात मानाच्या पाचही गणपतीचे जल्लोषात विसर्जन

कसबा गणपती महात्मा फुले मंडईत दाखल

पुणे : मानाचा पहिला आणि पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपती महात्मा फुले मंडईत दाखल

12/09/2019,11:39AM
Ananth Chaturdashi 2019, Ananth Chaturdashi 2019 : पुण्यात मानाच्या पाचही गणपतीचे जल्लोषात विसर्जन

मानाचे गणपती मंडईतील टिळक चौकाकडे मार्गस्थ

पुणे : मानाचे गणपती मंडईतील टिळक चौकाकडे मार्गस्थ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचा गणपती आकर्षक फुलांची सजावट केलेल्या हत्ती रथात टिळक चौकात पोहोचला

12/09/2019,11:38AM
Ananth Chaturdashi 2019, Ananth Chaturdashi 2019 : पुण्यात मानाच्या पाचही गणपतीचे जल्लोषात विसर्जन

पुण्याचं ग्रामदैवत आणि मानाचा पहिला कसबा गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

पुणे : पुण्याचं ग्रामदैवत आणि मानाचा पहिला कसबा गणपती मंडळातून चांदीच्या पालखीतून मिरवणुकीसाठी रवाना, महात्मा फुले मंडईतील टिळक पुतळ्यापासून तो पुढे मिरवणुकीत अग्रभागी राहिल

12/09/2019,11:38AM

या मिरवणुकीसाठी शहरात तब्बल सात हजारपेक्षा जास्त पोलीस तैनात करण्यात आले आहेत. त्याशिवायस बीडीडीएस पथक, शीघ्र कृती दल, वज्र, दंगल नियंत्रण पथक, स्त्रयकिंग फोर्स, तब्बल तीस हजार प्रशिक्षित स्वयंसेवकही तैनात करण्यात आले आहेत.

दहा दिवस मनोभावे पूजा केलेल्या गणरायाचं विसर्जन मोठ्या थाटामाटात पार पडलं. मोठ्या मनोभावे भक्तिभावाने प्राणप्रतिष्ठापना केलेल्या गणरायाला आज अखेर निरोप दिला. पुण्यातील सर्वच विसर्जन मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. त्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त तैनात केला होता. पुण्यात जवळपास सात हजारपेक्षा जास्त पोलीस या विसर्जन मिरवणुकीवर नजर ठेवून होते. त्यामुळे कोणतीही अघटित घटना घडली नाही.

पुण्यात यंदा तब्बल तीन हजार 97 सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी श्रींची प्रतिष्ठापना केली होती. त्यापैकी 2,154 मंडळांनी नाव नोंदणी केलेली आहे. पुण्यात आज साधारण दोन हजार दोनशे गणपतींचं विसर्जन पार पडत आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी आपलं सर्व कसब पणाला लावलं आहे. मोठ्या प्रमाणात शहरात चौकाचौकात माणसागणिक पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

मिरवणुकीवर पोलिसांसोबतच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही नजर असणार आहे. शहरात तब्बल दोन ते तीन हजार सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. तर, विसर्जन मार्गावर 200 पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे नजर ठेवून आहेत. त्याचबरोबर शहरात वाहतूककोंडी होऊ नये, म्हणून वाहतुकीचंही ही नियोजन करण्यात आलं होतं.

शहरातील 17 रस्ते ठराविक अंतरावर वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. यावेळी पर्यायी मार्गांवरून वाहतूक वळवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रिंगरोडही तयार करण्यात आला आहे.

पुण्यातील मिरवणुकीदरम्यान वाहतुकीसाठी बंद असलेले रस्ते

 • शिवाजी मार्गावरील काकासाहेब गाडगीळ पुतळा ते जेधे चौक वाहतूक बंद
 • बाजीराव रोडवर बजाज पुतळा चौक ते फुटका बुरुज चौकापर्यंत वाहतूक बंद
 • कुमठेकर रोडवर टिळक चौक ते चितळे कॉर्नर चौकापर्यंत वाहतूक बंद
 • गणेश रोड दारूवाला पुल ते जिजामाता चौकापर्यंत वाहतूक बंद
 • केळकर रोडवर बुधवार चौक ते अलका टॉकीज पर्यंत वाहतूक बंद
 • टिळक रोडवर जेधे चौक ते टिळक चौकापर्यंत वाहतूक बंद
 • शास्त्री रोडवर सेनादत्त चौकी ते अलका टॉकीज पर्यंत वाहतूक बंद
 • जंगली महाराज रोडवर जाशी राणी चौक ते खंडोजीबाबा चौकात वाहतूक बंद
 • कर्वे रस्त्यावर नळस्टॉप ते खंडोजीबाबा चौकात वाहतूक बंद
 • फर्ग्युसन रोडवर खंडोजी बाबा चौक ते फर्ग्युसन कॉलेज में गट पर्यंत वाहतूक बंद
 • भांडारकर रस्त्यावर पीवायसी जिमखाना ते गुडलक चौकापर्यंत वाहतूक बंद
 • सातारा रोडवर व्होळगा चौक जेधे चौकात वाहतूक बंद
 • प्रभात रोडवर डेक्कन पोलीस स्टेशन ते शेलार मामा चौकात वाहतूक बंद
 • सोलापूर रोडवर सेव्हन लव्हज चौक ते जेधे चौकात वाहतूक बंद

गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी वेळात आणि शांततेत गणेश विसर्जन मिरवणूक पार पाडणं हे मोठं आव्हान सध्या पुणे पोलिसांसमोर आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी शहरात प्रतिबंधात्मक उपाययोजनाही राबवली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *