धोनीने निवृत्ती न घेतल्यास, BCCI भाग पाडणार?

टाईम्स ऑफ इंडियाला बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “धोनीला आता टीममध्ये जागा मिळणार नाही, अशा परिस्थितीत धोनीला स्वत:ला निवृत्ती जाहीर करावी लागेल”

धोनीने निवृत्ती न घेतल्यास, BCCI भाग पाडणार?
Follow us
| Updated on: Jul 15, 2019 | 1:23 PM

मुंबई : टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार आणि सध्याचा सर्वात अनुभवी खेळाडू महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीबाबतच्या चर्चा अजूनही सुरुच आहेत. वर्ल्डकपमधील धोनीच्या कामगिरीमुळे त्याच्या निवृत्तीबाबतच्या चर्चांना उधाण आलं. यावर धोनीने अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र टाईम्स ऑफ इंडियाला बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “धोनीला आता टीममध्ये जागा मिळणार नाही, अशा परिस्थितीत धोनीला स्वत:ला निवृत्ती जाहीर करावी लागेल”

धोनीला टीम इंडियात स्थान न देणं म्हणजेच त्याला जबरदस्तीने निवृत्ती घ्यायला भाग पाडणं आहे.

बीसीसीआयमधील काही सदस्यांच्या मते, 38 वर्षीय धोनी आता क्रिकेटमधून निवृत्ती घ्यायला हवी. विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये धोनी सातव्या नंबरवर फलंदाजीला आला होता. त्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं. शिवाय विश्वचषकातील त्याच्या अनेक संथ खेळींवरही टीका झाली. धोनी शेवटपर्यंत मॅच घेऊन जातो आणि विजय मिळवून देतो, असा त्याचा गेमप्लॅन असतो. मात्र त्यातही तो अपयशी ठरला.

टाईम्सच्या वृत्तानुसार, “निवड समितीचे अध्यक्ष MSK प्रसाद यांनी अजूनही धोनीशी संपर्क साधला नसेल, तर ते लवकरच साधतील. या भेटीत ते धोनीला निवृत्तीची वेळ आल्याचं सांगतील”

सध्या युवा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत भारतीय संघात आहे. त्यामुळे त्याला जास्तीत जास्त संधी दिली जाते. भारतीय संघ काही दिवसात वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यातून विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांना विश्रांती देण्यात आली आहे. आता महेंद्रसिंह धोनीलाही या दौऱ्यातून डच्चू मिळू शकतो.

भारतीय क्रिकेटच्या जाणकाराच्या मते, धोनीची यापुढे भारतीय संघात निवड होणं कठीण आहे. आता त्याला निवृत्ती घ्यावी लागेल. केवळ धोनीच नव्हे तर कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्त्वाचीही समीक्षा होईल”.

ही सर्व पार्श्वभूमी पाहता महेंद्रसिंह धोनी कधीही क्रिकेटला अलविदा करु शकतो. भारताला आयसीसीच्या महत्त्वाच्या तीनही ट्रॉफी जिंकून देणारा धोनी हा एकमेव कर्णधार ठरला.

धोनीने 350 वन डे सामन्यात 50.57 च्या सरासरीने 10 हजार 773 धावा केल्या आहेत. 98 टी ट्वेण्टीत धोनीने 37.60 च्या सरासरीने 1617 धावा कुटल्या.

यंदाच्या विश्वचषकात धोनीने 8 डावात 273 धावा केल्या. धोनीच्या धीम्या स्ट्राईक रेटवर टीकाही झाली. इंग्लंड आणि न्यूझीलंडविरुद्ध धोनीकडून जास्त अपेक्षा होत्या. मात्र हे दोन्हीही सामने भारताने गमावले.

संबंधित बातम्या 

वेस्ट इंडिज विरुद्ध विराट, बुमराहला विश्रांती 

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.