वेस्ट इंडिज विरुद्ध विराट, बुमराहला विश्रांती

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हे दोघेही वर्षभर सतत खेळत आहेत. त्यामुळे बीसीसीआयने या दोन्ही खेळांडूना वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे.

वेस्ट इंडिज विरुद्ध विराट, बुमराहला विश्रांती

मुंबई : इंग्लंडमध्ये सध्या विश्वचषकाची धामधूम सुरु आहे. विश्वचषकाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या टीम इंडिया सध्या चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हे दोघेही वर्षभर सतत खेळत आहेत. त्यामुळे बीसीसीआयने या दोन्ही खेळांडूना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या वेस्ट इंडिज दौऱ्यातील सामन्यात विराट कोहली आणि बुमराह कोणतेही सामने खेळणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

विश्वचषकानंतर लगेचच टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे.  येत्या 3 ऑगस्टपासून टीम इंडियाचा वेस्ट इंडिज दौरा सुरु होत आहे. यात टीम इंडियाला टेस्ट मॅच, वनडे आणि टी 20 सामने खेळायचे आहे. मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दौऱ्याला विराट कोहली आणि जसप्रीत बुमराहला गैरहजर रहाण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने टीम इंडियाच्या या दोन्ही तगड्या खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे.

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह या दोन्ही टीम इंडियाचे तगडे खेळाडू आहे. या दोन्ही खेळाडू तीन सामने, एक वनडे सामना आणि टी 20 सामने या तिन्ही महत्त्वाच्या सामन्यांसाठी विश्रांती दिली जाऊ शकते किंवा हे दोघेही सराव सामने खेळू शकतात असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह  हे दोघेही ऑस्ट्रेलिया टेस्ट सीरिजपासून सातत्याने खेळत आहेत. त्यामुळे या खेळाडूंना विश्रांती देण्यात येणार आहे. विराट आणि बुमराहासह इतर खेळाडूंना विश्रांती दिली जाणार आहे. जर टीम इंडिया विश्वचषकात अंतिम सामन्यापर्यंत पोहोचली, तर सर्व खेळाडू 14 जुलैपर्यंत खेळणार आहे. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेनंतर काही प्रमुख फलंदाज आणि गोलंदाजांना आराम दिला जाणार आहे. विश्वचषकानंतर टीम इंडिया काही वनडे आणि टी 20 सामने खेळणार आहे.

विराट आणि बुमराहाला वेस्टइंडिज विरुद्धच्या सामन्यात आराम दिला, तर मग टीम इंडियामध्ये खलील अहमद आणि मयंक अग्रवाल या नवीन खेळाडूंचा समावेश केला जाऊ शकतो.

दरम्यान आज (27 जून) टीम इंडियाची लढत जेसन होल्डरच्या वेस्ट इंडिजशी होणार आहे. यंदाच्या विश्वचषकातील हा  टीम इंडियाचा सहावा सामना खेळणार आहे. भारताच्या संघाने आतापर्यंत पाच सामने खेळले आहेत. यातील एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे. तर इतर चार सामान्यात टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवला आहे.

विश्वचषक मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी वेस्ट इंडिजला हा सामना जिंकणे महत्त्वाचे आहे. तर टीम इंडियाने हा सामना जिंकल्यानंतर त्यांचे उपांत्य फेरीची तिकीट पक्कं होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघासाठी हा सामना महत्त्वाचा मानला जात आहे.

संबंधित बातम्या :

World Cup : टीम इंडियाचे सेमीफायनलचे तिकीट आज पक्कं होणार?

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *