AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाकं मुरडणाऱ्या डॉक्टरांना आरोग्यमंत्र्यांचा डोस, भीतीपोटी काम न थांबवण्याचा सल्ला

डॉक्टरांकडे आदर्श म्हणून पाहिलं जातं, त्यांना देव मानलं जातं, त्यामुळे त्यांनी दवाखाने सुरु ठेवावेत, अशा शब्दात राजेश टोपेंनी डॉक्टरांचे कान टोचले. (Rajesh Tope slams Doctors closing clinics)

नाकं मुरडणाऱ्या डॉक्टरांना आरोग्यमंत्र्यांचा डोस, भीतीपोटी काम न थांबवण्याचा सल्ला
| Updated on: Mar 27, 2020 | 2:04 PM
Share

मुंबई : महाराष्ट्रात एकूण 135 कोरोना पॉझिटिव्ह, तर 4 हजार 217 निगेटिव्ह केसेस आढळल्या आहेत. 19 कोरोनाग्रस्तांना आतापर्यंत डिस्चार्ज दिल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. भीतीपोटी काम न थांबवण्याचा सल्ला आरोग्यमंत्र्यांनी नाकं मुरडणाऱ्या डॉक्टरांना दिला. आरोग्यमंत्र्यांनी कोरोनाविषयी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून दैनंदिन अपडेट देण्याचा शिरस्ता कायम ठेवला आहे. (Rajesh Tope slams Doctors closing clinics)

भीतीपोटी अनेक डॉक्टर बंद करत आहेत, हे चुकीचं आहे. डॉक्टरांकडे आदर्श म्हणून पाहिलं जातं, त्यांना देव मानलं जातं, त्यामुळे त्यांनी दवाखाने सुरु ठेवावेत, डॉक्टरांनी तत्परता नाही दाखवली, तर सर्वसामान्यांनी जायचं कुठे? अशा शब्दात राजेश टोपेंनी डॉक्टरांचे कान टोचले.

अहमदनगरच्या आमदारांनी सांगितलेला अनुभव धक्कादायक होता. एका लहान मुलाची आई त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेली होती, परंतु भीतीपोटी काही डॉक्टर तपासत नाहीत. ‘कोरोना’व्यतिरिक्तही अनेक दैनंदिन आजार असतात. राज्यभरातील डॉक्टरांनी दवाखाने सुरु ठेवावेत आणि उपचार करावे, असं टोपेंनी सांगितलं.

हेही वाचा : यकृताच्या उपचारासाठी आला, कोरोना पॉझिटिव्ह निघाला, पुण्यात नवा रुग्ण

रक्तदान करण्याविषयी वारंवार आवाहन केलं जात आहे. फक्त ‘कोविड19’साठीच नाही, तर अनेक आजारांसाठी रक्त लागतं. रक्ताचं शेल्फ लाईफ 35 दिवसांचं आहे. त्यामुळे रक्तसाठा वाढायला हवा. रक्तदान करण्यासाठी शिबीराच्या नियोजनाविषयी आखणी सुरु आहे. सोशल डिस्टन्स आणि शिस्त पाळून रक्तदान करा, असं आवाहन टोपेंनी केलं.

पीपीई आणि एन95 मास्क दिले जातातच, मात्र कोरोना रुग्ण किंवा संशयितांवर उपचार करताना, डॉक्टरांनी त्याचा आग्रह टाळावा. ते उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचं राजेश टोपेंनी सांगितलं. लॉकडाऊनमुळे बाधित देशातून येणारे रुग्ण नसतील. आता कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कातून झालेल्या ‘हाय रिस्क’ संपर्कांचा शोध घ्यावा लागेल, असं राजेश टोपेंनी स्पष्ट केलं. (Rajesh Tope slams Doctors closing clinics)

जीवनावश्यक आणि अत्यावश्यक वस्तू घेताना social distance चा नियम पाळा. गरीब घटकांना मिळणारं मोफत धान्य शिस्तीने दुकानदारांनी द्यावं. सर्वपक्षीय, सामाजिक संघटना किंवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी काही गोष्टी घरपोच द्याव्यात, शेती व्यवसाय सुरु राहिलाच पाहिजे, शेतीमाल बाजारपेठेत आला पाहिजे, प्रशासनाने मदत करावी, असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.

Rajesh Tope slams Doctors closing clinics

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.