AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नातवावरचा वार आजीने झेलला, टोपलीने मारुन बिबट्याला पळवलं

यवतमाळ जिल्ह्यातील चालगणी गावातील एका आजीबाईँच्या धाडसाची गोष्ट सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.

नातवावरचा वार आजीने झेलला, टोपलीने मारुन बिबट्याला पळवलं
| Updated on: Oct 16, 2020 | 10:34 PM
Share

यवतमाळ : येथील चालगणी गावातील एका आजीबाईँच्या धाडसाची गोष्ट सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. चालगणीतल्य आजी तिच्या नातवाला वाचवण्यासाठी थेट बिबट्याला भिडली आणि तिने तिच्या नातवाचे प्राणही वाचवले आहेत. (leopard attacks kid; gets saved by Grandmother)

जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील चालगणी येथील धुरपताबाई सातलवाड ही महिला आपला नातू रितेश सोबत शेतातील सोयाबीन काढण्यासाठी जात होती. त्याच वेळी बाजूला असलेल्या ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक लहानग्या रितेशवर हल्ला केला. त्यावेळी कोणतीही भीती न बाळगता धुरपताबाईंनी हातातील टोपले बिबट्यावर फेकले.

आजींनी केलेल्या प्रतिहल्ल्यानंतर चवताळलेल्या बिबट्याने नातवाला सोडून आजींवर हल्ला केला. बिबट्याने आजींच्या मानेवर पंजाने वार केला. तसेच जबड्याने त्यांच्या हाताचा लचका तोडला. बिबट्याच्या हल्ल्यामुळे आजी विव्हळल्या. तिथे आरडाओरड सुरु झाली. त्यामुळे आजूबाजूच्या शेतशिवारातील लोक एकत्र आले. काहींनी लगेच आजींकडे धाव घेतली.

लोकांची मोठी गर्दी झालेली पाहून बिबट्या घाबरला. लोक बिबट्यावर हल्ला करणार एवढ्यात बिबट्या तिथून पळून गेला. बिबट्याच्या या हल्ल्यामुळे आसपासच्या परिसरातील शेतकरी वर्गात दहशतीचे वातावरण आहे. पण आजींच्या साहसाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

संबंधित बातम्या

घराजवळ खेळताना बिबट्याची झडप, नगरमध्ये चिमुकलीचा मृत्यू

अवघ्या पाच फुटांवर बिबट्या, राधाकृष्ण विखे पाटील यांची पत्नी आणि नातवंडे बचावली

आईसोबत फिरायला गेलेल्या चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला, CISF जवानाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू

पुण्यातील आंबेगावमध्ये बिबट्याची दहशत, पाळीव कुत्र्यावर बिबट्याची झडप

इगतपुरीत मादी बिबट्याचा 5 बछड्यांना जन्म, 20 दिवसानंतर पिलांसह जंगलात स्थलांतर

(leopard attacks kid; gets saved by Grandmother)

पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.