नंबर पोर्टिंग आता चार दिवसांत होणार

मुंबई : तुम्हाला जर मोबाईल नंबर पोर्ट करायाचा असल्यास तुमच्यासाठी खुशखबर आहे. टेलिकॉम रेग्युलेटर अर्थात ट्रायने मोबाईल पोर्टेबिलिटीची (सध्या वापरत असलेल्या कपंनीचा नंबर दुसऱ्या कंपनीमध्ये समाविष्ट करुन त्यांची सेवा घेणे) संपूर्ण प्रक्रिया सोपी केली आहे. तसेच पोर्टिंग प्रक्रियेसाठी लागणारा अवधीही कमी करण्यात आला आहे. ट्रायकडून एका टेलिकॉम कंपनीतून दुसऱ्या कंपनीत नंबर समाविष्ट करण्यासाठी चार दिवसांचा …

नंबर पोर्टिंग आता चार दिवसांत होणार

मुंबई : तुम्हाला जर मोबाईल नंबर पोर्ट करायाचा असल्यास तुमच्यासाठी खुशखबर आहे. टेलिकॉम रेग्युलेटर अर्थात ट्रायने मोबाईल पोर्टेबिलिटीची (सध्या वापरत असलेल्या कपंनीचा नंबर दुसऱ्या कंपनीमध्ये समाविष्ट करुन त्यांची सेवा घेणे) संपूर्ण प्रक्रिया सोपी केली आहे. तसेच पोर्टिंग प्रक्रियेसाठी लागणारा अवधीही कमी करण्यात आला आहे.

ट्रायकडून एका टेलिकॉम कंपनीतून दुसऱ्या कंपनीत नंबर समाविष्ट करण्यासाठी चार दिवसांचा वेळ ठरवण्यात आला आहे. याशिवाय जर एखाद्या कंपनीने मोबाईल नंबर पोर्ट करण्याची रिक्वेस्ट चुकीच्या पद्धतीने नाकारली, तर त्या कंपनीला दहा हजार रुपयांची पेनल्टीही लागणार आहे.

ट्रायने सांगितले आहे की, पोर्टिंग संबधातील काही रिक्वेस्ट (कॉर्पोरेट कॅटेगरी सोडून) कमी कालावधीत पूर्ण करण्यासाठी इंट्रा- लाइसेंस्ड सर्विस नंबरला दोन दिवसांचा अवधी ठेवण्यात आला आहे. तर एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीमध्ये नंबर पोर्ट करण्याच्या रिक्वेस्टसाठी चार दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. हा कालावधी आधी 15 दिवसांचा होता.

याशिवाय यूनीक पोर्टिंग कोड (यूपीसी) च्या अवधीतही बदल करण्यात आला आहे. पहिले 15 दिवसांचा अवधी या कोडसाठी होता. तो आता फक्त चार दिवसांचा करण्यात आला आहे. मात्र जम्मू-काश्मीर, आसाम आणि उत्तर-पूर्वेसाठी यूनिक पोर्टिंग कोड (यूपीसी) चा अवधी 15 दिवसच राहणार आहे. टेक्स्ट मेसेज (SMS) च्या माध्यमातून पोर्टिंग रिक्वेस्ट परत मिळवण्याची प्रक्रियाही सोपी आणि जलद करण्यात आली आहे. तसेच कॉर्पोरेट पोर्टिंगसाठी 50 नंबरची मर्यादा आता 100 नंबरपर्यंत करण्यात आली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *