पत्नीला सरप्राईज करण्यासाठी नवी हेअरस्टाईल, रितेश देशमुख ट्रोल

मुंबई : बॉलिवुड अभिनेता रितेश देशमुख नेहमीच आपल्या लुक्ससाठी चर्चेत असतो. त्याच्या हटके लुक्सचे फॅन्सकडून नेहमीच कौतूक होते. मात्र, यावेळी त्याने केलेल्या लुकमुळे रितेश सोशल मीडियावर ट्रोल झाला. रितेशने पत्नी जेनेलिया डिसूजाला सरप्राईज करण्यासाठी नवी हेअरस्टाईल केली होती. मात्र, सोशल मीडियावर ट्रोल झाल्याने रितेशलाच सरप्राईज मिळाल्याची सध्या चर्चा आहे.   View this post on Instagram …

पत्नीला सरप्राईज करण्यासाठी नवी हेअरस्टाईल, रितेश देशमुख ट्रोल

मुंबई : बॉलिवुड अभिनेता रितेश देशमुख नेहमीच आपल्या लुक्ससाठी चर्चेत असतो. त्याच्या हटके लुक्सचे फॅन्सकडून नेहमीच कौतूक होते. मात्र, यावेळी त्याने केलेल्या लुकमुळे रितेश सोशल मीडियावर ट्रोल झाला. रितेशने पत्नी जेनेलिया डिसूजाला सरप्राईज करण्यासाठी नवी हेअरस्टाईल केली होती. मात्र, सोशल मीडियावर ट्रोल झाल्याने रितेशलाच सरप्राईज मिळाल्याची सध्या चर्चा आहे.

 

View this post on Instagram

 

Asked @riteishd to surprise me with a new look & he comes back sporting a Red Squirrel Tail …. COOL isn’t it ????????

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad) on


रितेशने रेड स्क्वायरल टेल लुक केला असून पत्नी जेनेलियाने त्याच्या नव्या हेअरस्टाईलचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावेळी जेनेलियाने लिहिले, ”मी रितेशला नव्या लुकसह सरप्राईज करायला सांगितले होते. तो रेड स्क्वायरल टेलच्या लुकमध्ये समोर आला. कूल आहे ना?” जेनेलियाने फोटोंसह प्रश्न विचारताच त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला. अनेक चाहत्यांनी चेष्टा करत त्याच्या नव्या लुकची खिल्ली उडवली. काही युजर्स तर या लुकवर थेट नाराजच झाले.

एका युजरने रितेशच्या नव्या लुकमधील फोटोवर प्रतिक्रिया देताना माणूस की पोपट अशीच प्रतिक्रिया दिली. दुसऱ्या एका यूजरने हेअरस्टाईलचे शेपूट सोडून सर्व काही ठीक आहे असा टोला मारला. अन्य एकाने कोंबड्याची चोच कशी आहे असाच प्रश्न विचारला. एका युजरने तर रितेशला थेट गे म्हटले.

आगामी काळात रितेश हाउसफुल 4 या कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे. त्याशिवाय तो मरजावा या चित्रपटातही पाहायला मिळेल. या चित्रटात त्याच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्राही असेल. या दोघांनी याआधीही व्हिलन चित्रपटात सोबत काम केले आहे.

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *