सर्व कर्ज फेडेन, पण ‘ही’ अट मान्य करा : विजय मल्ल्या

नवी दिल्ली : बँकांना कोट्यवधींचा चुना लावून भारतातून फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्या याने भारतीय बँकांना कर्ज फेडण्यासाठी एक ऑफर दिली आहे. त्याने ट्वीट करुन सांगितले की, तो बँकांचे 100 टक्के मुख्य रक्कम (केवळ कर्जाची रक्कम, व्याज नाही) फेडायला तयार आहे. बुधवारी त्याने हे ट्वीट केले. भारतीय माध्यमं आणि नेते माझ्याविरोधात बोलतात, पण कर्नाटक उच्च …

Vijay Mallya twiter, सर्व कर्ज फेडेन, पण ‘ही’ अट मान्य करा : विजय मल्ल्या

नवी दिल्ली : बँकांना कोट्यवधींचा चुना लावून भारतातून फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्या याने भारतीय बँकांना कर्ज फेडण्यासाठी एक ऑफर दिली आहे. त्याने ट्वीट करुन सांगितले की, तो बँकांचे 100 टक्के मुख्य रक्कम (केवळ कर्जाची रक्कम, व्याज नाही) फेडायला तयार आहे. बुधवारी त्याने हे ट्वीट केले. भारतीय माध्यमं आणि नेते माझ्याविरोधात बोलतात, पण कर्नाटक उच्च न्यायालयात कर्ज फेडण्यासाठी मी जो प्रस्ताव दिला होता, त्याबाबत कुणीही बोलत नाही, असेही त्याने या ट्वीटमध्ये म्हटले आहे. मी आताही पूर्ण कर्ज फेडायला तयार आहे, ते बँकेने स्विकार करावे, असेही तो म्हणाला.


मल्ल्याने त्याच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की,

‘नेता आणि मीडिया मला एक असा डिफॉल्टर सांगत आहेत, जो सरकारी बँकेचा पैसा घेऊन पळाला आहे. माझ्यासोबत योग्य व्यवहार होत नाही. मग कर्नाटकच्या उच्च न्यायालयात सेटलमेंटसाठी जो प्रस्ताव मांडला त्याबाबत कुणी का बोलत नाही? हे दुखद आहे.’

 


मल्ल्या सध्या ब्रिटनमध्ये आहे. त्याने कराच्या माध्यामातून सरकारी तिजोरीत करोडो रुपये दिल्याचा दावाही केला आहे. त्याने सांगितले की, मद्य आणि एअरलाईन या दोन्ही व्यवसायात त्याने सरकारला हजोरो कोटी रुपये दिले. तरीही मी भारतीय बँकांना कर्ज परत देण्याची ऑफर देतो आहे.
मल्ल्याने किंगफिशर एअरलाईनच्या तोट्याचं खापर वाढत्या इंधन किमतीवर फोडलं. याबाबत मल्ल्या म्हणतो की,

‘एअरलाईनला ज्या वित्तीय संकटाचा सामना करावा लागला. त्याच कारण इंधनाच्या वाढलेल्या किंमती आहेत. किंगफिशर एक शानदार एअरलाईन होती, पण तेव्हा क्रूड ऑईल हे 140 डॉलर प्रति लिटर बॅरल होते. यामुळे कपंनीचे नुकसान झाले आणि बँकेचे कर्जही वाढले. मी बँकेला त्यांचं मुख्य रक्कम परत करण्याचा ऑफर देत आहे, कृपया स्विकारावा.’

आता यावर भारतीय बँका काय निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *