CCTV | एपीएमसी मार्केटमध्ये मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या सुरक्षारक्षकाला परप्रांतीय मजुरांची मारहाण

कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) प्रशासनाकडून मार्केटमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहेत.

CCTV | एपीएमसी मार्केटमध्ये मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या सुरक्षारक्षकाला परप्रांतीय मजुरांची मारहाण

मुंबई : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) प्रशासनाकडून मार्केटमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. तर दुसऱ्या बाजूला फळ मार्केटमधील एच आणि एम विंगमध्ये व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून सर्व प्रकारच्या नियमांचे उल्लंघन केलं जात आहे. (Workers beat up a security guard who took action against those who did not wear masks in APMC market Mumbai)

इथले व्यापारी आणि मजूर नियमांचे पालन करत नाहीत, तसेच तिथे असलेल्या सुरक्षारक्षकांशी हुज्जत घालतात. आज इथल्या काही मजुरांनी मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या सुरक्षारक्षाकाला मारहाण केली आहे. याप्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

“मास्क घाला, मास्क घातल्याशिवाय मार्केटमध्ये प्रवेश नाही” असे म्हणणाऱ्या एपीएमसी फळ मार्केटमधील सुरक्षारक्षकाला व्यपाऱ्यांनी परप्रांतीय मजुराच्या साहाय्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आज दुपारी मास्क न घातलेल्या परप्रांतीय मजुरांना दोन सुरक्षारक्षकांनी अडवले. यावेळी तिथल्या व्यापाऱ्यांनी मजुरांची बाजू घेत सुरक्षारक्षाकांशी हुज्जत घातली. त्यानंतर तब्बल 10 ते 15 परप्रांतीय मजुरांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करत त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण केल्याचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. यामध्ये मजुरांचा एक गट सुरक्षारक्षकांना मारहाण करत असल्याचे दिसत आहे.

मुंबई एपीएमसी फळ मार्केटमध्ये व्यापाऱ्यांकडून कोरोनासंदर्भात कोणत्याही प्रकारची काळजी घेतली जात नाही. तिथे काम करणारे परप्रांतीय कामगारही नियमांचे पालन करत नाहीत. फळ मार्केटमधील H आणि M या दोन्ही विंगमध्ये काम करणाऱ्या मजुरांमध्ये परप्रांतीय मजुरांची संख्या जास्त आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या मारहाणीच्या घटना तिथे सर्वात जास्त घडतात. परंतु प्रत्येकवेळी प्रामाणकिपणे काम करणाऱ्यांचाच जीव संकटात सापडतो.

धक्कादायक बाब म्हणजे येथील व्यापाऱ्यांनी भाजीपाला आणि फळ बाजारातील त्यांच्या कार्यालयात आणि गाळ्यांमध्ये परप्रांतीय कामगारांना आश्रय दिला आहे. या कामगारांकडे माथाडी बोर्ड किंवा बाजार समितीचे कुठलेही ओळखपत्र नाही आणि ज्या व्यापाऱ्याकडे हे कामगार काम करतात त्यांच्याकडे त्यांची नोंदही नाही. बिंधास्तपणे कामगार मार्केटमध्ये वास्तव्य करत असून मुक्तपणे फिरत आहेत. मुंबई एपीएमसी फळ मार्केटमध्ये एकूण 985 व्यापारी आहेत. तसेच हे परप्रांतीय कामगार कमी मोबदल्यात काम करत असल्याने त्यांना या व्यापाऱ्यांनी आपल्या गाळ्याच्या वरच्या भागावर अनधिकृतपणे बांधकाम करून तिथे राहण्यास परवानगी दिली आहे. या एकाच खोलीत 5 ते 10 जण एकत्र राहतात. तिथे कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही.

मुंबई एपीएमसीचे सचिव अनिल चव्हाण यांनी एपीएमसी मार्केटमध्ये कडक कारवाई करण्याचा प्रयत्न केला असून फळ मार्केटमध्ये मास्क न वापरणाऱ्या एकूण 1 हजार 550 लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्याद्वारे तब्बल दोन लाख 40 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

कल्याणमध्ये सीएचा संशयास्पद मृत्यू, आत्महत्या, दुर्घटना की घातपात, तपास सुरु

लग्नास नकार दिल्यानं तरुणीला मारहाण, कल्याण पोलिसांनी प्रियकराला 2 तासात ठोकल्या बेड्या

एटीएमच्या माध्यमातून 412 कोटींच्या फसवणुकीचा प्रयत्न; पोलिसांकडून रॅकेट उद्ध्वस्त, दोघांना अटक

(Workers beat up a security guard who took action against those who did not wear masks in APMC market Mumbai)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *