AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रातील असा एक जिल्हा जिथे 9 महिन्यात झाला 42 जुळ्यांचा जन्म, नाव ऐकून व्हाल हैराण; काय आहे कारण

महाराष्ट्रात असं एक ठिकाण आहे, जेथे जुळ्या मुलांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे... महाराष्ट्रातील एका जिल्ह्यात 9 महिन्यात तब्बल 42 जुळ्यांचा जन्म झाला आहे..., जिल्ह्याचं नाव ऐकून तुम्ही देखील हैराण व्हाल... जाणूघ्या का वाढतोय जुळ्या मुलांचा जन्मदर...

महाराष्ट्रातील असा एक जिल्हा जिथे 9 महिन्यात झाला 42 जुळ्यांचा जन्म, नाव ऐकून व्हाल हैराण; काय आहे कारण
फाईल फोटो
| Updated on: Oct 06, 2025 | 12:05 PM
Share

महाराष्ट्रात अनेक सरकारी रुग्णालय आहेत, जेथे मोफत रुग्णांवर उपचार होतात. शिवाय गरोदर महिलांसाठी देखील रुग्णालयात अनेक सुविधा असतात. पण महाराष्ट्रातील एक रुग्णालय सध्या सर्वत्र चर्चेत आहे. कारण या रुग्णालयात 9 महिन्यात तब्बल 42 जळ्या मुलांनी जन्म घेतला असून याचं कारण देखील समोर आहे. सध्या ज्या रुग्णलयाची चर्चा सुरु आहे ते रुग्णालय बीड सरकारी रुग्णालय आहे… जुळ्या मुलांचा वाढत्या जन्मदरावर येथील डॉक्टरांनी देखील मोठा खुलासा केला आहे. 9 महिन्यात एकाच रुग्णालयात 42 जुळ्या मुलांचा जन्म झाल्याची माहिती समोर आल्यानंतर तुम्ही देखील चकित झाले असाल…

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान (एआरटी), इन-व्हिट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) आणि कौटुंबिक इतिहास यासारख्या घटकांमुळे जुळ्या मुलांचा जन्म वाढतो आहे. तज्ज्ञांच्या मते, 30 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांमध्ये जुळी मुले होण्याची शक्यता काही प्रमाणात वाढली आहे.

सांगायचं झालं तर, जुळी मुले बहुतेकदा वेळेपूर्वी जन्माला येतात, त्यामुळे अनेक बाळांच्या जन्मासाठी विशेष काळजी घेणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं. बीड सिव्हिल रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी (आरएमओ) डॉ. एल.आर. तंदळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाढत्या कामाचा ताण हाताळण्यासाठी ही सुविधा पूर्णपणे सुसज्ज आहे.

डॉक्टर म्हणाले, ‘गेल्या काही वर्षात जुळ्या आणि तीन मुलांच्या जन्म दरात मोठ्या संख्येने वाढ झाली आहे. गेल्या 9 महिन्यात आमच्या रुग्णालयात 42 जुळ्या मुलांनी जन्म घेतला आहे. आमचे नवजात शिशु अतिदक्षता विभाग (NICU) यासाठी पूर्णपणे सज्ज आहे.’

‘रुग्णालयात प्रसूतीदरम्यान आणि नंतर माता आणि नवजात बालकांच्या  काळजीसाठी समर्पित एक विशेष वैद्यकीय पथक आहे. एवढंच नाही तर, नवजात बालकांना संसर्गापासून वाचवण्यासाठी आणि त्यांच्या सुरुवातीच्या महत्त्वाच्या दिवसांमध्ये त्यांना पुरेशा सुविधा पुरवण्यासाठी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी विशेष काळजी घेत आहेत.’ असं देखील डॉक्टर म्हणाले आहेत.

सांगायचं झालं तर, 30 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांमध्ये जुळी मुले होण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे. त्यामागे कारण देखील तसं आहे. आता मुली करीयरला प्राधान्य देतात त्यामुळे लग्न आणि मुल होण्यासाठी उशीर होतो.  त्यामुळे 30 वर्षांनंतर फॅमिली प्लॅनिंगचा विचार लग्नानंतर होतो. एवढंच नाही तर, बदलत्या जीवनशैलीमुळे देखील महिलांच्या शरीरात अनेक बदल होत असतात. त्यामुळे प्रेग्नेंसी लवकर राहत नाही.. अशी अनेक कारण आहेत.

महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.