AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोव्हिड-19 मधून रिकव्हर होताय. अगोदर तुमचा ब्रश बदला आणि पुन्हा करोना संक्रमणापासून स्वतःला दूर ठेवा…

जर तुम्ही करोनाबाधित आहात किंवा करोना होऊन गेला तर सर्वप्रथम तुमचा टुथब्रश बदला. या काळात ब्रश न बदलण्यासाठी अजिबात उशीर करायला नको. कारण करोनाचा व्हायरस प्लास्टिक ब्रशच्या काठावर खूप काळ जीवंत राहू शकतो. त्यामुळे सुरक्षा म्हणून तुम्ही टूथब्रश बदलणे अत्यंत आवश्यक आहे. या काळात तोंडाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करून अजिबात जमणार नाही. याऊलट तोंडाच्या स्वच्छतेकडे जास्त लक्ष द्यायला हवे. या काळात हात तर नियमित धुवा आणि ब्रश करण्यापूर्वी हात स्वच्छ करूनच ब्रश करण्याची सवय ठेवा.

कोव्हिड-19 मधून रिकव्हर होताय. अगोदर तुमचा ब्रश बदला आणि पुन्हा करोना संक्रमणापासून स्वतःला दूर ठेवा...
फाईल फोटो
| Edited By: | Updated on: Jan 22, 2022 | 6:11 PM
Share

मुंबई – संपूर्ण झगात ओमायक्रॉनने (omicron) करोनाची तिसरी लाट (Corona third wave) आणली आहे. अर्थात ही तिसरी लाट जीवघेणी ठरली नसली तरी यावेळी संक्रमण मात्र खूप वाढले आहे. त्यामुळे वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. कारण तिसऱ्या लाटेने लसीकरण (Vaccination) झालेल्या व्यक्तींनाही संक्रमित केले आहे. अशावेळी जर तुम्ही करोनाबाधित असाल किंवा करोना होऊन गेल्यावर रिकव्हर होत असाल तर तोंडाच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या. तुम्हाला माहिती आहे का जर या काळात तुम्ही तुमचा टुथब्रश नाही बदलला तर तुम्हाला गंभीर परिणामाला सामोरे जावे लागू शकते.

विशेषतः एकत्र कुटुंब असणाऱ्या किंवा एकच बाथरूम शेअर करणाऱ्या व्यक्तींवर करोनाचे संकट पुन्हा ओढवू शकते. गुरूग्रामच्या आर्टेमिस हॉस्पिटलच्या डेंन्टिस्ट डॉ. अंजना सत्यजीत यांनी टुथब्रश तातडीने बदला. अन्यथा करोना पुन्हा उद्भवू शकतो असा इशारा दिला आहे. कोव्हिड-19 होऊन गेला आणि तुम्ही त्यातून बरे होत असाल तर सर्वात अगोदर तुमचा टुथब्रश बदला असे त्यांनी सांगितले. डॉ. अंजना यांच्यानुसार प्रत्येक व्यक्तीने एरवी सुद्धा दर तीन महिन्यांनी आपला टुथब्रश बदलायला हवा. त्यात तुम्ही करोनाबाधित किंवा तुम्हाला करोना होऊन गेला आहे तर तुम्ही अगोदर ब्रश बदला असा सल्ला त्यांनी दिला. कारण प्लास्टिकच्या तळाशी व्हायरस दीर्घकाळ जीवंत राहतो. त्यामुळे अगोदर ब्रश बदला. करोनाच्या संक्रमणापासून पुन्हा वाचायचे असेल तर ब्रश बदला. त्यातच तुमच्या कुटुंबातील सगळे जण एकच बाथरूम शेअर करत असतील तर त्यांची सुरक्षा म्हणूनही टुथब्रश नक्की बदलायला हवा असे सांगितले.

तसेच नुसता ब्रश बदलून जमणार नाही तर संक्रमण रोखण्यासाठी नवा टंग क्लीनर वापरा. कोव्हिड -19 सर्वाधिक परिणाम आपल्या प्रतिकारशक्ती सर्वाधिक परिणाम होतो. सोबतच तोंडाच्या स्वच्छेतेवर परिणाम करतो. तोंड सुकणे किंवा तोंड येणे अशा समस्या उद्भवू शकतात.

काय आहे यामागचे विज्ञान : तोंडाची स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक आहे. कारण व्हायरसचा प्रसार हा तोंडावाटे सर्वाधिक होतो. जागतिक आरोग्य संघटनेनुसार करोना व्हायरस हा करोनाबाधित व्यक्तीच्या तोंडावाटे पसारतो. विशेषतः बाधितांच्या थुंकीतून बाहेर येणारे छोटे-छोटे तुषार सुद्धा व्हायरस पसरवतात. या व्यक्तींना जेव्हा शिंक येते, ती खोकतात किंवा बोलतात किंवा हसतात. त्यातूनही व्हायरस पसरू शकतो. याशिवाय व्हायरस तळभागावर जसे हातावर राहू शकतो. व्हायरस अधिक त्रासदायक होण्यापेक्षा हात नियमित धुवा आणि स्वच्छ करा. जर तुम्ही बाहेर काम करत असाल तळ आपला हात वाऱंवार धुवत चला.

करोना संक्रमण काळात कशी घ्याल तोंडाच्या स्वच्छतेची काळजी : दात घासण्यापूर्वी आणि फ्लासिंग करण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. दिवसातून दोनवेळा ब्रश करा, फ्लॉस करा आणि आपली जीभ स्वच्छ ठेवा. माऊथवॉशचा वापर नियमित करा. जर तुमचे बाथरूम एकच असेल तर बेसिनचे सिंक नियमित निर्जंतुकीकरण करा.

कोव्हिड 19  मधून रिकव्हर झालायेत?, आधी तुमचा ब्रश बदला; पुन्हा कोरोना संक्रमणापासून दूर रहा 

तुमच्या मुलीला दिली का ‘ही’ लस? लस द्या कॅन्सरपासून सुरक्षीत रहा

काय तुम्हाला ‘ही’ लक्षणं दिसत आहेत, मग लिव्हरकडे लक्ष देणं गरजेचं आहे…जाणून घ्या ती लक्षणं एका क्लिकवर

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.