Ghee Clove Benefits: चमचाभर तुपामध्ये ‘ही’ पावडर मिसळा आरोग्याला होतील फायदेच फायदे
benefits of eating cloves and ghee: आपल्या घरात आढळणारा प्रत्येक मसाला आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण असतो. ज्यामध्ये लवंग आयुर्वेदिक गुणधर्मांचा खजिना मानला जातो. लवंग तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. चला तर जाणून घेऊया काय आहात तुप आणि लवंग खाण्याचे आरोग्यदायी फायदे.

आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. कामामुळे ताण तणाव वाढतो ज्यामुळे रात्री झोप लागत नाही आणि त्याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होते. स्वयंपाक घरातील काही पदार्थ आहेत ज्यांचे सेवन केल्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की लवंग आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. लवंगामधील गुणधर्म तुमचं शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. लवंगमध्ये शरीरातील बॅक्टिरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ असतात. लवंगमध्ये भरपूर प्रमाणात दाहक-विरोधी गुणधर्म असतात ज्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचा संसर्ग होत नाही. बदलत्या ऋतूमध्ये तुमच्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. बदलत्या ऋतूमध्ये संसर्गाच्या आजारांपासून वाचण्यासाठी तुम्ही तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढवू शकता.
तुमचं शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि संसर्गाच्या आजारांना दूर ठेवण्यासाठी तुमच्या आहारामध्ये पोषक तत्वांचा समावेश करणे गरजेचे आहे. तुम्ही तुमच्या आहारामध्ये लवंग आणि तुपाचा समावेश केल्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. बदलत्या ऋतूमध्ये सर्दी, खोकला आणि ताप यांच्या सारख्या समस्या होत असतील तर तुम्ही तुप आणि लवंग यांचे सेवन करू शकता यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे आजार होणार नाही. चला तर जाणून घेऊया निरोगी शरीरासाठी लवंग आणि तुपाचे सेवन कसे करावे?
आयुर्वेदामध्ये सांगितले आहे की, आपल्या आरोग्याला आवश्यक असलेले मसाले तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. मसाल्यांपैकी एक लवंग तुमच्या आरोग्यासाठी उत्तम मानला जातो. लवंगमध्ये भरपूर प्रमाणात औषधी गुणधर्म असते ज्यामुळे तुम्हाला संसर्गाचे आजार होत नाहीत. लवंग फक्त आपल्या जेवणाची चव वाढवत नाही तर आपल्या पोटाच्या आरोग्याला देखील फायदेशीर असते. तुम्हाला जर सर्दी खोकला किंवा संसर्गाचा त्रास असेल तर लवंग तुमच्यासाठी उत्तम पर्याय मानला जातो. लवंगामध्ये आढळणारे औषधी गुणधर्म केवळ खोकलाच बरा करत नाहीत तर सर्दी देखील बरी करतात. लवंग छातीत जमा झालेला कफ पूर्णपणे काढून टाकते . लवंगामध्ये युजेनॉल आढळते, जे बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि दाहक-विरोधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. त्यामुळे संसर्गही कमी होतो.




एखाद्याला बराच काळ खोकला असेल किंवा त्याच्या छातीत कफ असेल तर तुम्ही तव्यावर तुपामध्ये लवंग तळून खायला द्याव्यात. यासाठी प्रथम एक पॅन गरम करा आणि त्यात एक चमचा गाईचे तूप घाला. आता या तुपात लवंगा घाला आणि थोडा वेळ परतून घ्या. हा पदार्थाचे सेवन केल्यामुळे तुमची छाती मोकळी होते आणि कफ निघून जातो. लवंगा भाजल्यानंतर तुम्ही त्या खाऊ शकता. तुम्ही लवंग चावून खाऊ शकता. तुम्ही हे 6 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कोणत्याही मुलाला खायला देऊ शकता. 6 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना दिवसातून जास्तीत जास्त दोन लवंगा खायला द्याव्यात. तर वृद्धांना दिवसभरात तीन लवंगांपर्यंत खायला द्यावे. यामुळे त्याच्या छातीत साचलेला सर्व कफ निघून जाईल आणि त्याचा दीर्घकाळचा खोकलाही निघून जाईल.