AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ करणे योग्य आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या

तुम्ही हिवाळ्यातही थंड पाण्याने अंघोळ करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. हिवाळ्यात गरम पाण्याने आंघोळ केली जाते, हे तुम्हाला माहिती आहे. पण भारतात आजही कडाक्याच्या थंडीतही थंड पाण्याने आंघोळ करण्याची लोकांना सवय आहे. आंघोळीची ही जुनी पद्धत किती फायदेशीर आहे माहित आहे का? हे आम्ही तुम्हाला या सांगणार आहोत. जाणून घेऊया.

हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ करणे योग्य आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या
| Edited By: | Updated on: Dec 23, 2024 | 3:36 PM
Share

भारतात असे लोक आहेत ज्यांना थंड हवामानातही थंड किंवा नॉर्मल पाण्याने आंघोळ करायला आवडते. असे मानले जाते की जिथे गरम पाण्याने आंघोळ केल्यावर थंडी जाणवते, तेथे थंड पाण्याने उलट होते. थंड पाण्याने आंघोळ केल्याने अनेक फायदे होतात, असे म्हटले जाते. याबाबत लोकांमध्ये अनेक गैरसमज सुरू आहेत.

काही लोक रोज आंघोळ करणे टाळतात. भारतातील बहुतांश भागात हिवाळा अधिक त्रासदायक असतो. थंड वारा आणि कडाक्याच्या थंडीमुळे परिस्थिती बिघडते. त्यामुळे आंघोळ करणारे बहुतेक जण गरम पाण्याने आंघोळ करून घराबाहेर पडतात. पण, थंड पाण्याने अंघोळ करण्याचे काय फायदे आहेत, जाणून घेऊया.

काही लोकांचा असा विश्वास आहे की, थंड पाण्यानं अंघोळ केल्यानं स्ट्रोक होऊ शकतो, तर काही लोकांचा असा विश्वास आहे की अशा प्रकारे आंघोळ केल्याने आपल्याला दिवसभर थंडी जाणवत नाही. मात्र तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच आपण हे केले पाहिजे कारण काही वेळा या पद्धतीमुळे नुकसानही होते.

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की हिवाळ्यात थंड पाण्याने आंघोळ केल्यास काय होते? हे कोणते फायदे देते? तसेच, आपण काय लक्षात ठेवले पाहिजे.

थंडीतही थंड पाण्याने आंघोळ करा

अंकित बन्सल (कन्सल्टंट, इंटरनल मेडिसिन अँड इन्फेक्शन डिसीज, श्री बालाजी अ‍ॅक्शन हॉस्पिटल) सांगतात की, दिल्लीच्या हिवाळ्यात अनेकदा लोकांना गरम पाण्याने आंघोळ करायला आवडते, पण जर तुम्ही नॉर्मल ताज्या पाण्याने अंघोळ केली तर ते तुमच्यासाठीही फायदेशीर आहे. हिवाळ्याच्या ऋतूत थंड पाण्याने आंघोळ केल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते.

याशिवाय त्वचा चमकदार आणि निरोगी होते, आपल्या शरीराचे स्नायूही मजबूत असतात, ज्यामुळे या वेळी व्यायाम आणि इतर शारीरिक क्रियांमध्ये तुम्हाला खूप मदत होते, यामुळे तुमचे मानसिक आरोग्यही सुधारते.

गरम पाण्याने अंघोळ करण्याचे तोटे

कडाक्याच्या थंडीतही कोमट पाण्याने आंघोळ करावी, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जास्त गरम पाणी त्वचा आणि केस दोघांनाही नुकसान पोहोचवते. गरम पाणी थेट केसांवर टाकल्याने ते कमकुवत होऊ लागतात. याशिवाय त्यांच्यात कोरडेपणा येतो आणि चमकही कमी होते. त्याचबरोबर त्वचेतील कोरडेपणा आणि चमक कमी होण्याची भीती असते. आंघोळीत गरम पाणी चांगलं वाटत असलं तरी त्यामुळे आणखी अनेक नुकसान होतं.

‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

थंड पाण्याने आंघोळ करताना हे लक्षात ठेवावे की, आंघोळीदरम्यान थेट डोक्यातून थंड पाण्याने आंघोळ करू नये, हाता-पायावर पाणी ओतल्यानंतर प्रथम ते आपल्या शरीरावर घालावे. याशिवाय इतरही काही गोष्टी लक्षात ठेवा, तुमचे आरोग्य लक्षात घेऊन थंड पाण्याने आंघोळ करावी, तुमची तब्येत चांगली नसेल किंवा तुम्हाला आरोग्याची कोणतीही समस्या असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.